AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वप्नात केस कापताना पाहणे शुभ संकेत आहे की अशुभ, जाणून घ्या

झोपेत असताना प्रत्येकाला अनेक प्रकारची स्वप्ने पडतात. काही स्वप्ने लक्षात राहतात, तर काही सकाळपर्यंत विसरली जातात. स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला केस कापण्याचे स्वप्न पडलं असेल तर हे स्वप्न पाहिल्यानंतर अनेक लोकांना प्रश्न पडतो की याचा अर्थ काय आहे आणि हे शुभआहे की अशुभ. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

स्वप्नात केस कापताना पाहणे शुभ संकेत आहे की अशुभ, जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Jul 24, 2026 | 9:02 PM
Share

रात्री दिसणारी स्वप्ने केवळ कल्पना नसतात तर स्वप्नशास्त्रानुसार ती भविष्यातील घटना दर्शवतात. कधीकधी आपल्याला अशी विचित्र स्वप्नं पडतात की ती पाहताचं क्षणी जागं येते आणि आपल्या मनात विचार येत राहतात. असेच एक स्वप्न म्हणजे स्वतःचे केस कापताना पाहणे. आपल्यापैकी अनेकजणांना असे स्वप्न पाहल्यानंतर काहीतरी वाईट घडणार आहे या भीतीने लोकं अनेकदा या स्वप्नामुळे घाबरतात. चला तर मग स्वप्नशास्त्रानुसार केस कापण्याचे स्वप्न पाहणे शुभ आहे की अशुभ, आणि वेगवेगळ्या परिस्थितीत त्याचा अर्थ काय आहे हे जाणून घेऊयात. स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वतःचे केस कापण्याचे स्वप्न पडले, तर ते जीवनातील एका मोठ्या बदलाचे लक्षण मानले जाते . हा बदल नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध किंवा जीवनशैलीशी संबंधित असू शकतो. कधीकधी हे स्वप्न भूतकाळातील समस्यांवर मात करून एका नवीन सुरुवातीचेही संकेत देते.

तुमचे केस जबरदस्तीने कापले जात असल्याचे स्वप्नात पाहणे

जर तुम्हाला स्वप्नात कोणीतरी तुमच्या मनाविरुद्ध तुमचे केस कापत असल्याचे दिसले, तर ते शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की हे स्वप्न तणाव, आत्मविश्वासाची कमतरता किंवा कोणामुळे तरी निर्माण झालेल्या त्रासाचे संकेत देऊ शकते. अशा वेळी घाईचे निर्णय घेणे टाळावे असा सल्ला दिला जातो.

दुसऱ्याचे केस कापताना पाहणे

जर तुम्हाला स्वप्नात कोणीतरी तुमचे केस कापत असल्याचे दिसले, तर हे तुमच्या सभोवतालच्या बदलांचे लक्षण मानले जाते. हे नातेसंबंध, कुटुंब किंवा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलाचे संकेत असू शकते. याचा अर्थ नेहमीच नकारात्मक असतो असे नाही.

लांब केस कापणे

स्वप्नशास्त्रानुसार लांब सडक केस कापण्याचे स्वप्न पाहणे हे अनेकदा जुन्या जबाबदाऱ्या किंवा मानसिक ओझ्यातून सुटका होण्याचे प्रतीक मानले जाते. जर एखादी समस्या बऱ्याच काळापासून सुरू असेल, तर ती सुटते असेही मानले जाते.

लहान केस कापणे

जर तुम्हाला स्वप्नात तुमचे केस टप्प्याटप्प्याने कापले जात असल्याचे दिसले, तर हे तुमच्या आयुष्यातील लहान पण महत्त्वपूर्ण बदलांचे लक्षण असू शकते. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात किंवा एका नवीन संधीची सुरुवात होऊ शकते.

स्वप्नात केस कापल्यानंतर आनंदी दिसणे

जर तुम्हाला स्वप्नात केस कापल्यानंतर आनंद आणि समाधान वाटत असेल, तर हे एक शुभ चिन्ह मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार, हे यश, वाढलेला आत्मविश्वास आणि सकारात्मक बदलाचे लक्षण असू शकते.

स्वप्नात केस कापल्यानंतर वाईट वाटणे

स्वप्नात केस कापल्यानंतर तुम्हाला दुःख, पश्चात्ताप किंवा चिंता वाटत असल्यास, हे एक गमावलेली संधी, मानसिक ताण किंवा भविष्याबद्दलची चिंता यांचे लक्षण मानले जाते. अशा वेळी संयम बाळगण्याचा आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सल्ला दिला जातो.

प्रत्येक स्वप्न साकार होते का?

स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्न हे भविष्याचे संकेत मानले जात नाही. कारण अनेकदा स्वप्नं ही दैनंदिन क्रिया, मानसिक स्थिती आणि विचारांचा परिणाम देखील असू शकतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप