AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

First Surya Grahan 2021 | यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण, कधी लागणार, कुठे दिसणार, पाहा संपूर्ण माहिती

वर्षाचे पहिले सूर्यग्रहण आज म्हणजेच गुरुवार 10 जून रोजी होणार आहे (First Surya Grahan 2021). अमावस्येच्या दिवशी चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधोमध येतो, तेव्हा त्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. यावेळी पूर्ण सूर्यग्रहण होईल. सूर्यग्रहणाच्या दिवशी रिंग ऑफ फायर दिसून येईल. भारतात आंशिक सूर्यग्रहण दिसेल.

First Surya Grahan 2021 | यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण, कधी लागणार, कुठे दिसणार, पाहा संपूर्ण माहिती
सूर्यग्रहण
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 8:21 AM
Share

मुंबई : वर्षाचे पहिले सूर्यग्रहण आज म्हणजेच गुरुवार 10 जून रोजी होणार आहे (First Surya Grahan 2021). अमावस्येच्या दिवशी चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधोमध येतो, तेव्हा त्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. यावेळी पूर्ण सूर्यग्रहण होईल. सूर्यग्रहणाच्या दिवशी रिंग ऑफ फायर दिसून येईल. भारतात आंशिक सूर्यग्रहण दिसेल. म्हणून सूर्यग्रहणाच्या दिवशी सुतक काळ मानला जाणार नाही (First Surya Grahan 2021 What To Do And What Not To Do During Solar Eclipse).

धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या ग्रहणाला एक महत्वाची घटना मानली जाते. ग्रहणकाळात राहू-केतूचा प्रभाव वाढतो आणि सूर्य, चंद्राचा प्रभाव कमी होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. जेव्हा राहू-केतूचा वाईट प्रभाव सूर्यावर होतो, त्यानंतर तो सूर्यग्रहण होते तेव्हा आणि चंद्रावर प्रभाव वाढतो तेव्हा चंद्रग्रहण होते. ग्रहण काळात सूर्य किंवा चंद्र पीडित असतात आणि अशक्त होतात. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावरही होतो.

ज्योतिषांच्या मते या ग्रहणाचा परिणाम काही राशींवर दिसून येईल. या सूर्यग्रहणाचा परिणाम वृषभ राशीवर होईल. शास्त्रानुसार सूर्यग्रहणादरम्यान काय करावे, काय करु नये, कोणावर याचा जास्त परिणाम होईल, जाणून घ्या सर्व माहिती –

सूर्यग्रहणाचा कालावधी काय?

10 जून रोजी सूर्यग्रहण गुरुवारी दुपारी 1 वाजून 42 मिनिटांनी लागेल आणि संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी संपेल. सुतक कालावधी सूर्यग्रहणापूर्वी 12 तास आधी सुरु होईल. हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, युरोप, उत्तर कॅनडा आणि रशिया आणि आशियामध्ये अंशतः दिसेल. या ग्रहणाचा कोणताही परिणाम भारतात होणार नाही. त्यामुळे धार्मिक कार्ये होतील.

सूर्यग्रहण 2021 कुठे दिसेल?

कंकणाकृती सूर्यग्रहण ग्रीनलँड, उत्तर-पूर्व कॅनडा, उत्तर ध्रुव आणि रशियन फास्ट पूर्वेकडील भागांमधून दिसून येईल. तर युरोप, उत्तर अमेरिका, आशिया, आर्कटिक आणि अटलांटिक प्रदेशात अर्धवट सूर्यग्रहण असेल. भारतात अरुणाचल प्रदेश आणि लदाखचा भाग वगळता, सूर्यग्रहण दिसणार नाही.

ग्रहणात काय करु नये –

1. सूर्यग्रहणाच्या दिवशी सुतक काळात काहीही खाऊ नये. मान्यता आहे की याचा नकारात्मक प्रभाव पडतो.

2. सूर्यग्रहणाच्या वेळी कोणतीही पूजा करु नये. त्याने देवाच्या मूर्ती दुषित होतात.

3. सूर्यग्रहणावेळी सूर्याला थेट डोळ्यांनी पाहू नये. हे आपल्या डोळ्यांना नुकसान पोहोचवू शकते.

4. सूर्यग्रहण सुरु असताना गर्भवती महिलांनी काहीही खाऊ-पिऊ नये. याशिवाय सुई-धागाही वापरु नये.

– भारतात ग्रहणाचा परिणाम दिसून येणार नाही, तरीही ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी आणि काही कामे न करण्याचा सल्ला दिला आहे.

1. ग्रहण होण्यापूर्वी स्नान करा. या दरम्यान, शक्य तितक्यावेळा परमेश्वराचे स्मरण करा.

2. सूर्य मंत्रांचा जप करावा.

3. ग्रहण काळात राग किंवा कोणाचीही निंदा करु नये.

4. ग्रहणावेळी कात्री, चाकू इत्यादी वापरु नयेत.

चंद्राचं स्वामित्व असलेल्या राशीच्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगली पाहिजे

ज्योतिषाचार्य प्रज्ञा वशिष्ठ म्हणतात की, सूर्यग्रहणावेळी सूर्य कमकुवत असतो आणि चंद्रग्रहणावेळी चंद्र अशक्त असतो हे सर्वांना माहिती आहे. परंतु, प्रत्यक्षात चंद्र हा सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दोन्हीवेळी कमकुवत असतो. याचे कारण असे आहे की सूर्यग्रहण नेहमी अमावस्येच्या दिवशी होते आणि अमावास्येला चंद्र नेहमीच कमकुवत असतो. यावेळी सूर्यग्रहणादरम्यान सूर्यापेक्षा जास्त परिणाम चंद्रावर होणार आहे. कारण हे आंशिक ग्रहण आहे. तसेच सूर्य आणि राहू यांच्यातही काही प्रमाणात फरक आहे. या परिस्थितीत, ज्यांच्या राशींवर चंद्रावर परिणाम होतो त्यांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

काय करावं –

1. मन शांत ठेवा. यासाठी ध्यान, गायत्री मंत्र, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा किंवा फक्त ओमचा जप करावा.

2. पाण्यातून प्रवास करु नका आणि कोणत्याही प्रकारचे व्यसन करण्यास टाळा, कारण व्यसन केल्याने राहू-केतु, शनिचे दुष्परिणाम वाढवते आणि त्याचा चंद्रावरही वाईट परिणाम होतो.

3. मनात नकारात्मक किंवा अशुभ विचार येऊ देऊ नका. ग्रहण दरम्यान प्रवास टाळा.

4. हे ग्रहण वृषभ राशीत होत आहे, म्हणून सूर्य, चंद्र, राहू, बुध ग्रहणाच्या दिवशी वृषभ राशीत असतील. राहू आणि बुध या दोन्ही गोष्टींमुळे चंद्राचा परिणाम होतो, म्हणून कर्क राशीच्या व्यक्तींनी या काळात विशेष काळजी घ्यावी.

5. उपाय म्हणून प्रत्येकाने सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्य मंत्र किंवा गायत्री मंत्राचा जप करा.

First Surya Grahan 2021 What To Do And What Not To Do During Solar Eclipse

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Surya Grahan 2021 : 10 जूनला वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण, चुकूनही ही कामं करु नका

Surya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’ कुठे दिसेल आणि कसे पाहावे?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.