Ganesh Chaturthi 2024: आजच्या दिवसाचे शुभ संयोग, पूजेसाठी फक्त इतके तास, जणून घ्या मुहुर्त, मंत्र
Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीसाठी खास मुहुर्त, फक्त दोन तास करता येणार पूजा, जणून घ्या मुहुर्त, मंत्र आणि बरंच काही..., सध्या सर्वत्र गणरायाच्या स्वागताची तयारी...
Ganesh Chaturthi 2024: देशात सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे कारण आजपासून पुढचे 10 दिवस भक्त गणरायाची मनोभावे भक्ती करतील. आज गणेश चतुर्थी आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी सहाव्या शुभ संयोगात आहे. ही गणेश चतुर्थी ब्रह्म, इंद्र, रवि आणि सर्वार्थ सिद्धी योगात आहे, तर या दिवशी चित्रा आणि स्वाती नक्षत्राचा सुंदर संयोगही आहे. आज गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी अडीच तासांचा शुभ मुहूर्त आहे. याच वेळात गणरायाची स्थापना करा. तर जाणून घ्या पूजेसाठी शुभ मुहूर्ता आणि मंत्र…
गणेश चतुर्थीसाठी 6 शुभ योग
1. ब्रह्म योग: सकाळी 06:02 पासून रात्री 11:17 वाजेपर्यंत
2. इंद्र योग: सकाळी 11:17 पासून उद्यापर्यंत पूर्ण दिवस
3. रवि योग: सकाळी 06:02 पासून दुपाररी 12:34 वाजेपर्यंत
4. सर्वार्थ सिद्धि योग: दुपारी 12:34 पासून उद्या सकाळी 06:03 वाजेपर्यंत
5. चित्रा नक्षत्र: पहाटे पासून दुपारी 12:34 वाजेपर्यंत
6. स्वाती नक्षत्र: दुपारी 12:34 पासून दुपारी 03:31 वाजेपर्यंत
गणेश चतुर्थी 2024 मुहूर्त
भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथीची सुरुवात : 6 सप्टेंबर, शुक्रवार, दुपारी 03:01 वाजेपासून
भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी समाप्ती: 7 सितंबर, शनिवार, संध्याकाळी 05:37 वाजेपर्यंत
गणेश पूजा मुहूर्त: सकाळी 11:03 वाजेपासून 01:34 वाजेपर्यंत
गणेश चतुर्थी 2024 शुभ मुहूर्त
शुभ-उत्तम मुहूर्त: सकाळी 07:36 पासून ते 09:10 पर्यंत
चर-सामान्य मुहूर्त: दुपारी 12:19 पासून 01:53 पर्यंत
लाभ-उन्नती मुहूर्त: दुपारी 01:53 पासून दुपारी 03:27 पर्यंत
अमृत-सर्वोत्तम मुहूर्त: दुपारी 03:27 पासून ते संध्याकाळी 05:01 पर्यंत
गणेश चतुर्थी 2024 पूजा मंत्र
1. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
2. ॐ गं गणपतये नमः।
गणेश चतुर्थीचं महत्त्व
पौराणिक कथांनुसार, माता पार्वतीने तिच्या एक मूल निर्माण केले आणि त्याच्यात प्राण फुंकले. त्या बालकाचं नाव गणेश ठेवलं गेलं. गणपती बुद्धीचे आराध्या दैवेत आहेत. कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी गणरायाची पूजा केली जाते. जो गणरायाची आराधना करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.. असं देखील म्हणतात.