AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Garud Puran : दुसऱ्यांचे पैसे लुटणाऱ्यांना मृत्यूनंतर काय मिळते शिक्षा? थेट नरकात…

Garud Puran Punishments: आजकाल अनेकजण चुकीच्या गोष्टी करतात. दुसऱ्याचे पैसे लुटण्याचा प्रयत्न देखील करतात. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याच्या मृत्यूनंतर नेमकं काय घडणार आहे याविषयी गरूड पुराणामध्ये सांगितले आहे. चला तर जाणून घेऊया मत्यूनंतर पापी लोकांना नेमकं काय शिक्षा दिली जाते.

Garud Puran : दुसऱ्यांचे पैसे लुटणाऱ्यांना मृत्यूनंतर काय मिळते शिक्षा? थेट नरकात...
Garud Puran
| Edited By: | Updated on: Jan 18, 2025 | 4:37 PM
Share

हिंदू धर्मामध्ये ऐकुन 18 पुराणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे पवित्र गरूड पुराण. या पुराणामध्ये फक्त व्यक्तीच्या जीवनाविषयीच सांगितले नाही तर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेमकं काय होते म्हणजेच मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या आत्म्याचे नेमकं काय होते याबद्दल देखील सांगितलले आहे. जे व्यक्ती प्रामाणिक जीवन जगतात त्यांच्या आत्म्याचे नेमकं काय होते आणि ज्या लोकांनी वागणूक वाईट असते मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याचे नेमकं काय होते याबद्दल गरूड पुराणामध्ये सांगितले आहे.

असे म्हटले जाते की, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भोगावी लागतात. मग त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये पाप केले असतात किंवा काही चांगले कर्म केलेले असतात त्यांना त्याप्रकारे कर्माची फळ मिळतात. अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या व्यक्तिंचे पैसे लुटणाऱ्यांना मृत्यूनंतर नेमकं कोणती शिक्षा दिली जाते याबद्दल अगदी सविस्तर माहिती गरूड पुराणामध्ये माहिती दिली जाते.

दुसऱ्यांचे पैसे लुटणे याला घोर पाप मानले

जे व्यक्ती दुसऱ्यांचे पैसे लुटतात आणि मौजमस्ती करतात अशा लोकांना असे वाटते की त्यांना सगळं काही भेटलं आहे. परंतु जे दुसऱ्यांचे पैसे हडप करतात ते खूप मोठे पापी असतात. अशा लोकांना मृत्यूनंतर यमदूत दोरीने बांधून नरकात घेऊन जातात. त्यानंततर त्यांना खूप मारहाण केली जाते. या मारहानी दरम्यान ते बेशुद्ध होतात आणि ते पुन्हा शुद्धीत आल्यावर त्यांना मुठीने मारहाण केली जाते. दुसऱ्यांचे पैसे लुटणे याला घोर पाप मानले जाते.

असं करणं टाळावे…

गरूड पुराण हिंदूधर्मातील 18 महापुराणांपैकी एक आहे. या पुराणामध्य विष्णू भगवान आणि पक्षि राज यांच्यामधील एका संवादाचा उल्लेख केला आहे. पुराणानुसार, पृथ्वीवर जन्मलेला प्रत्येक व्यक्ती, प्राणी यांची मृत्यू होणारच, मग त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याचे काय होणार हे पूर्णत: त्यांच्या कर्मावर अवलंबून आहे. जन्म, मृत्यू, नरक, स्वर्ग, यमलोक अशा अनेक गोष्टींबाबत गरूड पुराणात सांगितले आहे. कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीचे पैसे लुटल्यावर मृत्यूनंतर गंभीर शिक्षा दिली जाते. त्यामुळे असं करणं टाळावे आणि कोणालाही त्रास होईल असे वागू नये.

मृत्यूनंतर नरकात खूप कठोर शिक्षा

गरूड पुराणानुसार, जे व्यक्ती आपल्या वडिलांचा किंवा आईचा अपमान करतात किंवा त्यांना घरातून बाहेर काढतात अशा लोकांना मृत्यूनंतर नरकाच्या आगीमध्ये बुडून त्या आत्म्याला त्रास होईल अशी शिक्षा दिली जाते. त्यामुळे आपल्या आई-वडिलांचा आदर करणे गरजेचे असते. त्यांच्या सर्व गोष्टी समजून घेणे आणि त्यांच्या सर्व गोष्टी ऐकणे महत्त्वाचे असते. आजकालच्या काळामध्ये अनेकजण प्राण्यांना त्रास देत आहेत. जे लोकं स्वताच्या स्वार्थासाठी निष्पाप जीवांची हत्या करतात आणि त्यांना त्रास देतात अशा लोकांना मृत्यूनंतर नरकात खूप कठोर शिक्षा दिली जाते.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....