AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रावण महिन्यात उपवास करताना तुमच्या आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश, दिवसभर शरीरात राहील ऊर्जा

हिंदू धर्मात पवित्र श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा संपूर्ण महिना भगवान शंकर यांना समर्पित आहे. या महिन्यात काहीजण हे उपवास देखील करतात. जर तुम्हीही श्रावण महिन्यात उपवास करत असाल तर दिवसभर थकवा आणि अशक्तपणा टाळण्यासाठी तुमच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा.

श्रावण महिन्यात उपवास करताना तुमच्या आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश, दिवसभर शरीरात राहील ऊर्जा
श्रावण महिन्यात उपवास करताना तुमच्या आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश, दिवसभर शरीरात राहील ऊर्जाImage Credit source: TV9 Network
| Edited By: | Updated on: Jul 24, 2025 | 11:04 PM
Share

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात भगवान महादेवाची पूजा केली जाते आणि बरेच लोकं यामहिन्यात उपवास देखील करतात, विशेषतः श्रावणी सोमवारी आणि शनिवार. या दिवसांमध्ये उपवासात सात्विक आणि पौष्टिक अन्न खाणे महत्वाचे आहे, जेणेकरून शरीराला ऊर्जा मिळेल आणि पचनसंस्था देखील निरोगी राहील.

जर तुम्हीही श्रावण महिन्यात उपवास करत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात काही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करावा. चला तर मग आजच्या लेखात आपण उपवासाचे काही आरोग्यदायी पदार्थांबद्दल जाणून घेऊयात.

फळ

फळे उपवासासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत कारण ती पौष्टिक आणि सहज पचण्याजोगी असतात. केळी, सफरचंद, डाळिंब, आंबा आणि नासपती यांसारख्या फळांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जी शरीराला ऊर्जा प्रदान करतात. त्यामुळे या पदार्थांचे सेवन करा किंवा फळांचा चाट बनवून देखील खाऊ शकतात.

साबुदाणा

उपवासासाठी बनवलेल्या पदार्थांमध्ये साबुदाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात आणि ते त्वरित ऊर्जा देतात. साबुदाणा खिचडी, वडे किंवा खीर बनवून खाऊ शकतात. साबुदाण्यात बटाटे आणि शेंगदाणे टाकून शिजवल्याने त्याचे पौष्टिक मूल्य वाढते.

नारळ पाणी

उपवासा दरम्यान नारळ पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. ते शरीराला हायड्रेट ठेवते आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता पूर्ण करते. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी असते, जे उपवास करताना अशक्तपणा दूर करण्यास मदत करते.

मखाना

मखाना हा प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. मखाना तुपात भाजून त्यात मीठ किंवा साखर टाकून खाऊ शकतात. तसेच मखानापासून खीर देखील बनवली जाते, जी चविष्ट आणि पौष्टिक असते. वजन नियंत्रित करण्यास देखील मदत करते .

राजगिरा

राजगिरा हे प्रथिने, कॅल्शियम आणि लोहाने समृद्ध आहे. उपवासाच्या वेळी त्यांच्या पीठापासून पदार्थ बनवून सेवन करू शकता. तसेच राजगिरा लाडुचे सेवन करू शकतात. यामुळे हाडे मजबूत होतात आणि शरीरात ऊर्जा वाढवते.

काकडी

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते आणि याच्या सेवनाने शरीर हायड्रेट राहते. काकडीपासून सॅलड किंवा दह्यासोबत रायता बनवून खाऊ शकतात.यामुळे तुमची पचनक्रिया निरोगी राहील.

शेंगदाणे

शेंगदाणे हे प्रथिने आणि हेल्दी फॅट्सचा चांगला स्रोत आहे. शेंगदाणे भाजून मीठ टाकून खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची चटणी बनवून उपवासाच्या पराठ्यांसोबत खाऊ शकता. यांच्या सेवनाने शरीराला ताकद व ऊर्जा मिळते आणि भूक भागवते.

दूध आणि दही

दूध आणि दही हे कॅल्शियम आणि प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. उपवासाच्या वेळेस फळांसोबत दही किंवा फळांपासून मिल्कशेक देखील सेवन केले जाऊ शकते. दह्याची लस्सी किंवा ताक प्यायल्याने पचनसंस्था देखील निरोगी राहते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.