AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातील ‘या’ दिशांना ठेवा काही योग्य वस्तू, अन्यथा हिरावले जाईल सुख

वास्तुशास्त्रानुसार घराच्या पाच मुख्य दिशा पंचमहाभूतांशी संबंधित आहेत, ज्या सुख, समृद्धी आणि शांतीवर प्रभाव टाकतात. तर या दिशांना योग्य वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.

घरातील 'या' दिशांना ठेवा काही योग्य वस्तू, अन्यथा हिरावले जाईल सुख
| Edited By: | Updated on: May 13, 2026 | 4:19 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार आपल्या आसपासच्या वस्तू किंवा इतर गोष्टींचा आपल्या नशिबावर देखील फरक पडत असतो. यासाठी आजकाल प्रत्येकजण वास्तू नियमांचे पालन करून घरातील प्रत्येक गोष्टी योग्य ठिकाणी ठेवत असतो. ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. वास्तुशास्त्रानुसार घर आणि त्यांच्या दिशा यांचा सुख आणि समृद्धीशी असलेला संबंध स्पष्ट करते. वास्तु तज्ञांच्या मते घराचे पाच वेगवेगळे कोपरे पंचमहाभूतांशी जसे की अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी संबंधित आहे आणि त्यानुसार घरात वस्तूंची मांडणी केली जाते. अशातच यानुसार नियमांचे पालन न केल्यास व्यक्तीला जीवनात अनेक अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागते.

घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. वास्तुशास्त्रज्ञांच्या मते, घरातील या पाच दिशांना या योग्य वस्तू ठेवली पाहिजे. त्या जागा कधीही रिकाम्या सोडू नयेत. चला तर मग आजच्या लेखात आपण कोणत्या दिशांना कोणत्या वस्तू ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात.

ईशान्य दिशा

घराच्या ईशान्य दिशेला ईशान कोपरा म्हणतात. ही एक अत्यंत पवित्र दिशा मानली जाते. असे मानले जाते की स्वतः देव या दिशेत वास करतात. म्हणूनच या दिशेला घरातील देव्हारा बांधला जातो. जर तुमच्या घरात या दिशेत देव्हारा नसेल, तर तिथे पाण्याने भरलेले एक भांडे ठेवा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह थांबतो.

नैऋत्य ‍ दिशा

घराची नैऋत्य दिशा ही स्थिरतेचे प्रतीक आहे. ही जागा कधीही रिकामी सोडू नका. वास्तूनुसार या दिशेत सजावटीच्या वस्तू किंवा जड वस्तू ठेवाव्यात. येथे फर्निचर, कपाटे, सोफे इत्यादी ठेवता येतात.

आग्नेय दिशा

घराच्या आग्नेय दिशेला अग्नी कोन म्हणतात. ही दिशा ऊर्जेचे प्रतीक मानली जाते. जर ही दिशा रिकामी राहिली, तर कुटुंबातील सदस्यांची ऊर्जा कमी होते आणि त्यांचा आत्मविश्वास क्षीण होतो. म्हणूनच स्वयंपाकघर या दिशेत ठेवले जाते. गॅस स्टोव्ह आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे या दिशेत ठेवणे शुभ मानले जाते.

वायव्य दिशा

घराची वायव्य दिशेला पवनघंटी लावल्याने नात्यांमधील तणाव कमी होतो. मात्र, ही दिशा रिकामी सोडल्यास संघर्ष आणि गैरसमज वाढू शकतात.

उत्तर दिशा

भगवान कुबेर हे उत्तर दिशेचे स्वामी मानले जातात. त्यांना धन आणि समृद्धी देणारे मानले जाते. या दिशेत लक्ष्मी आणि कुबेर देवांच्या मूर्तींची स्थापना करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की ही दिशा रिकामी सोडल्यास जीवनातील आर्थिक समस्या वाढतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...