Money Vastu Tips: तुमच्या पर्समध्ये ‘या’ 5 वस्तू ठेवल्यास आर्थिक चणचण होईल दूर….
keep these things in purse : तुम्हाला पण आर्थिक समस्या उद्भवतात का किंवा घरामध्ये पैसा येतोय परंतु तो टिकत नाहीये तर वास्तूशास्त्रातील हे उपाय ठरेल फायदेशीर. वास्तुशास्त्रानुसार, अशा काही गोष्टी पर्समध्ये ठेवाव्यात जेणेकरून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहील. जर तुम्हाला आयुष्यात प्रगती करायची असेल तर कठोर परिश्रम करण्यासोबतच या गोष्टी तुमच्या पर्समध्ये ठेवा.

वास्तूशास्त्रानुसार, देवी लक्ष्मीला धन संपत्तीची देवी मानले जाते. तुम्हाला जर घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी हवी असेल तर तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा केली पाहिजेल. हिंदू धर्मामध्ये आणि वास्तूशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितले आहेत ज्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती मिळण्यास फायदे होतात. देवी लक्ष्मीची पूजा केल्यामुळे तुम्हाला ऐश्वर्याची प्राप्ती होते. पौराणिक मान्यतेनुसार, ज्या व्यक्तीवर लक्ष्मी देवीचा आशिर्वाद असतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्याही प्रकारच्या गोष्टींची कमतरता भासत नाही. वास्तूशास्त्रानुसार, काही विशेष गोष्टी केल्यामुळे तुमची उर्जा सकारात्मक होते आणि तुम्हाला धनप्राप्ती होण्यास मदत होते.
हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार, वास्तूशास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे तुमच्या घरामधील सदस्यांमध्ये सकारात्मक गोष्टी घडतात आणि धनसंपत्ती मिळण्यास मदत होते. वास्तूशास्त्रानुसार, तुमच्या पर्समध्ये काही गोष्टी ठेवल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढते. तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये प्रगती होते आणि कामे लवकर होण्यास मदत होते. या गोष्टी पर्समध्ये ठेवल्यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रहांवर भरपूर प्रभाव पडतो आणि तुमच्या कामामध्ये चांगल्या गोष्टी होण्यास सुरूवात होते. चला जाणून घेऊया पर्समध्ये कोणत्या गोष्टी ठेवाव्यात.
कुबेर यंत्र – कुबेर देवाला यांना धनाची देवता मानले जाते. कुबेर यंत्र धनप्राप्तीसाठी खूप शुभ आहे. कुबेर यंत्र तुमच्या पर्समध्ये ठेवल्याने संपत्ती आणि समृद्धी येते. कुबेर यंत्र पिवळ्या कापडात गुंडाळून ठेवावे. कुबेर यंत्र ठेवल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते. त्यासोबतच तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतात.
हळदीचे तांदूळ – वास्तुशास्त्रानुसार, हळदीचे तांदूळ पर्समध्ये ठेवल्याने संपत्ती वाढते. तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, गुरुवारी तांदळावर हळद लावा आणि ती भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसमोर ठेवा. यानंतर, शुक्रवारी तुमच्या पर्समध्ये हळदीचे दाणे ठेवा. यामुळे संपत्ती वाढते आणि जीवनात चांगल्या गोष्टी घडतात.
गोमती चक्र – वास्तुशास्त्रानुसार, गोमती चक्र देवी लक्ष्मीला प्रिय आहे. गोमती चक्र तुमच्या पर्समध्ये ठेवल्याने तुम्ही कर्जमुक्त व्हाल आणि संपत्ती मिळवाल. गोमती चक्र तुमच्या पर्समध्ये ठेवण्यापूर्वी त्यावर लाल रंगाचा टिळक लावा. यानंतर, ‘ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाये प्रसीद प्रसीद, श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः’ या लक्ष्मी मंत्राचा जप करा आणि गोमती चक्र तुमच्या पर्समध्ये ठेवा.
चांदीच नाणी – चांदीची नाणी समृद्धीचे प्रतीक मानली जाऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार, पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवल्याने आर्थिक स्थिती सुधारते. देवी लक्ष्मीला नाणे अर्पण केल्यानंतर ते पर्समध्ये ठेवावे. यामुळे आर्थिक फायदा होतो. चांदीचे नाणे पर्समध्ये ठेवण्यापूर्वी ते कच्च्या दुधात भिजवा आणि काही वेळ ठेवा.
कवड्या – लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी, तुमच्या पर्समध्ये कवड्या ठेवा. असे केल्याने आर्थिक समस्या सुटतात. असे मानले जाते की कवड्या पर्समध्ये ठेवल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते. जर तुम्हाला तुमच्या घरी लक्ष्मी यावी असे वाटत असेल तर तुमच्या पर्समध्ये कवड्या ठेवा. शुक्रवारी पर्समध्ये कढई ठेवून तुम्ही लक्ष्मी मिळवू शकता.
