AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाथरूममध्ये ठेवा फक्त ‘ही’ एक वस्तू , सर्व नकारात्मक ऊर्जा क्षणात होईल दूर

वास्तुशास्त्रानुसार बाथरूम हे तुमच्या आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित समस्यांचे कारण देखील बनू शकते, असं घडू नये, यासाठी या लेखात आपण एका सोप्या आणि प्रभावी वास्तू उपायाबद्दल जाणून घेणार आहोत.

बाथरूममध्ये ठेवा फक्त 'ही' एक वस्तू , सर्व नकारात्मक ऊर्जा क्षणात होईल दूर
vastushtra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Jul 29, 2026 | 10:18 PM
Share

वास्तूशास्त्रानुसार घराचा प्रत्येक कोपरा खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो. लोकं वास्तूनुसार घरातील मुख्य दरवाजा, बेडरूम किंवा स्वयंपाकघर हे योग्य प्रमाणे बांधतात. तसेच त्यामध्ये कोणत्या वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात हे देखील वास्तूनुसार ठरवतात. जेणेकरून त्यांचा चांगला परिणाम कुंटूबातील सदस्यांवर होतो. पण अनेकदा काहीजण बाथरूमकडे दुर्लक्ष करतात. वास्तूशास्त्रानुसार बाथरूमलाही खूप खास मानले जाते. बाथरूम हे घरातील असे ठिकाण आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास ते अनेक वास्तू दोषांचे केंद्र बनू शकते, ज्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीवर आणि आरोग्यावर होतो.

जर तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल आणि तुम्ही आर्थिक अडचणींचा सामना करत असाल, तर एका साध्या आणि प्रभावी बाथरूम वास्तू उपाय आहे. हा उपाय तुमचे नशीब बदलू शकतो. चला तर मग आजच्या लेखात आपण या उपायाबद्दल अधिक जाणून घेऊयात.

बाथरूममध्ये मीठ ठेवा

वास्तुशास्त्रानुसार मीठ घरातून नकारात्मक ऊर्जा आणि दृष्ट काढून टाकते. वास्तुशास्त्रज्ञ बाथरूममध्ये मीठ ठेवण्यास सांगतात . कारण मीठ हे राहू आणि केतूचे स्थान किंवा नकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानले जाते. त्यामुळे बाथरूममध्ये ठेवलेले मीठ हवेतील आणि सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. ज्यामुळे तुमचे आरोग्य आणि आर्थिकस्थिती चांगली राहण्यास मदत होते.

घरातून नकारात्मकता दूर झाल्यावर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. यामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतात. शिवाय बाथरूम ईशान्य कोपऱ्यात किंवा मुख्य दरवाजासमोर असल्यास, त्यामुळे एक गंभीर वास्तू दोष निर्माण होतो. मिठाच्या वापरामुळे हा दोष लक्षणीयरीत्या कमी होतो.

काचेच्या वाटीत मीठ ठेवा

बाथरूममध्ये साध्या मिठाऐवजी किंवा टाटा मिठाऐवजी समुद्री मीठ किंवा सैंधव मीठ वापरा. ​​मीठ एका काचेच्या भांड्यात ठेवा. आठवड्यातून एकदा किंवा किमान दर पंधरा दिवसांनी ते बदला. जुने, ऊर्जा शोषून घेणारे मीठ बाथरूमच्या कमोडमध्ये ओतून टाका आणि त्याजागी ताजे मीठ ठेवा. हा सोपा वास्तू उपाय एकदा नक्की करून पहा.

(डिस्क्लेमर:वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल