Premanand Maharaj : कोणाच्या पाया पडणं चूक की बरोबर? पहा प्रेमानंद महाराज काय म्हणतात?
प्रेमानंद महाराज हे एक प्रसिद्ध संत आहेत, त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी देशभरातून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. प्रेमानंद महाराज यांचं वैशिष्ट म्हणजे छोटे-छोटे आणि अधात्माचा आधार असलेली उदाहरणं देऊन ते आपला उपदेश भक्तांपर्यंत पोहोचवत असतात.

हिंदू धर्मामध्ये आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीच्या पाया पडून त्याचे आशीर्वाद घेतले जातात, आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीच्या पाया पडणं, त्यांचा आदर करणं यातून आपले संस्कार दिसून येतात. आपण आपल्या पेक्षा मोठ्या व्यक्तीच्या पाया का पडतो? तर तो आपल्यापेक्षा वयानं आणि अनुभवानं मोठा असतो, त्याने या जगात अनेक गोष्टी पाहीलेल्या असतात. त्याच्याकडे जे ज्ञान असतं त्याचा मान राखण्यासाठी आपण मोठ्या व्यक्तींच्या पाया पडतो. मात्र काही लोक असे देखील असतात जे कोणालाही आपल्या पाया पडू देत नाहीत. पाया पडावं किंवा पडू नये? याबाबत प्रत्येक व्यक्तीचं मत हे वेगवेगळं असू शकतं. जाणून घेऊयात याबाबत प्रेमानंद महाराज यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?
पाया पडणं चूक की बरोबर?
प्रेमानंद महाराज यांना त्यांच्या एका भक्तानं त्यांच्या प्रवचनामध्ये प्रश्न केला होता की, आपण जर एखाद्या व्यक्तीच्या पाया पडलो तर आपलं पुण्य नष्ट होतं का? त्यावर बोलताना प्रेमानंद महाराज म्हटले की जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्यापेक्षा मोठ्या माणसाच्या पाया पडू शकता. जर तुमची मनातून इच्छा असेल तर तुम्ही एखाद्या आपल्यापेक्षा मोठ्या माणसाच्या पाया पडल्यानं तुमचं पुण्य नष्ट होत नाही, उलट त्या व्यक्तीचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात.
मात्र जेव्हा तुम्ही तुमच्या मनात श्रेष्ठत्वाची भावना आणता, तुम्हाला वाटतं की मी याच्या पाया कसं पडू? आणि त्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीच्या पाया पडता किंवा त्याला नमस्कार करता तेव्हा अशावेळी तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही, त्यामुळे देव असेल, गुरु असतील किंवा तुमचे आई-वडील किंवा आणखी कोणी मोठी माणसं असतील जेव्हा तुम्ही त्यांच्या पाया पडता तेव्हा मनामध्ये सदैव नम्रतेची भावना ठेवा, असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला आदरपूर्वक नमस्कार केला तर त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
