Tulsi Mala | तुळशी माळ घालण्यापूर्वी त्याचे नियम, महत्त्व आणि फायदे जाणून घ्या

हिंदू धर्मात तुळस ही वनस्पती फार महत्वाची आहे (Tulsi Mala). शास्त्रात तुळस ही सर्वात शुद्ध मानली जाते, म्हणून ती शिळी झाल्यावरही पूजेमध्ये वापरली जाते.

Tulsi Mala | तुळशी माळ घालण्यापूर्वी त्याचे नियम, महत्त्व आणि फायदे जाणून घ्या
tulsi-mala

मुंबई : हिंदू धर्मात तुळस ही वनस्पती फार महत्वाची आहे (Tulsi Mala). शास्त्रात तुळस ही सर्वात शुद्ध मानली जाते, म्हणून ती शिळी झाल्यावरही पूजेमध्ये वापरली जाते. मान्यता आहे की भगवान विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहेत. त्यांच्या पूजेच्या प्रसादात तुळस अर्पण करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय, पूजा करणे अपूर्ण मानले जाते. बहुतेक घरात तुळशीचे रोप लावले जाते. मान्यता आहे की, तुळशीची लागवड केल्यास घरात आनंद आणि समृद्धी येते (Know The Rules Of Wearing Tulsi Mala And Its Importance).

तुळसमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत, जे रोगांना दूर ठेवण्यास मदत करतात. तुळशीच्या रोपाप्रमाणेच तुळशीची माळ देखील अत्यंत शुभ मानली जाते. परंतु ही माळ परिधान करण्यापूर्वी त्याचे नियम जाणून घ्यायला हवे.

तुळशी माळ घालण्याचे नियम

1. तुळशीची माळ घालण्यापूर्वी गंगाजलने ती धुवून घ्यावी आणि कोरडे झाल्यावर ती परिधान करावी.

2. ही माळ परिधान केलेल्या व्यक्तींना दररोज जप करावा लागतो. यामुळे भगवान विष्णूची कृपा कायम राहाते.

3. तुळशीची माळ घातलेल्या व्यक्तीने सात्विक अन्न खावे. याचा अर्थ असा की अन्नात लसूण, कांदा, मांस आणि मासे इत्यादींचे सेवन करु नये.

4. कोणत्याही परिस्थितीत तुळशीचा माळ शरीरापासून विभक्त होऊ देऊ नये.

भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचे भक्त तुळशीची माळ घालतात. मान्यता आहे की ही माळ परिधान केल्याने तुमचे मन शांत आणि आत्मा शुध्द होते. मान्यता आहे की, ही माळ परिधान केल्याने रोगांपासून मुक्तता मिळते शास्त्रांव्यतिरिक्त ज्योतिषातही तुळशी माला महत्वाची मानली जाते. ही माळ घालून बुध आणि गुरु ग्रह मजबूत होतात. तुळशीची माळ परिधान केल्यास कोणत्याही वास्तुतील दोष दूर होतात.

विष्णू भक्तांसाठी तुळशी माळ महत्वाची का आहे?

पौराणिक कथेनुसार, तुळशीला वरदान आहे की भगवान विष्णू केवळ तुळशीची पाने अर्पण केलेलं नैवेद्यच स्वीकारतात. तशाच प्रकारे, जे तुळशी माळ धारण करतात, भगवान विष्णू त्या व्यक्तीला त्यांच्या आश्रयामध्ये घेतात. तुळशीची माळ घातल्याने माणसाला वैकुंठाची प्राप्ती होतो.

कसे ओळखावे

तुळशीची योग्य माळ ओळखण्यासाठी अर्ध्या तासासाठी ही माळ पाण्यात ठेवा. जर त्यांचा रंग सुटला तर समजून घ्या की ही एक बनावट माळ आहे.

Know The Rules Of Wearing Tulsi Mala And Its Importance

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Tulsi Hacks | जर ‘या’ दिवशी तुळशीची पानं तोडत असाल तर सावधान! जाणून घ्या का…

MahaShivratri 2021 | तुळशीची पानं आणि केतकीचं फुलं महादेवाला वर्ज्य, जाणून घ्या या मागील पौराणिक कथा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI