कान्हाची ‘छठी पूजा’ कशी केली जाते, जाणून घ्या पद्धत आणि धार्मिक महत्त्व…
तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल आणि खूप मेहनत आणि प्रयत्न करूनही पैशाची कमतरता असेल तर धन आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही चांदीची बासरी आजच्या पूजेत अर्पण करा. असे मानले जाते की जो माणूस खऱ्या मनाने भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करतो.

मुंबई : बाळाच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी संध्याकाळी (Evening) विशेष पूजा करण्याचा नियम आहे. ज्याला आपण छठी पूजा असे म्हणतो. जन्माष्टमीनंतर सहाव्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या षष्ठीशी संबंधित पवित्र सण साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या पवित्र सणाप्रमाणे कान्हाच्या षष्ठीपूजेचा हा पवित्र सणही मोठ्या उत्साहात (Excitement) साजरा केला जातो. षष्ठी पूजेत बाळासाठी मंगळाची कामना केली जाते. आज भगवान श्रीकृष्णाच्या पूजेत गीते गाण्याचा आणि त्यांना सर्व प्रकारचे भोग अर्पण केले जातात. या पूजला एक खास महत्व आहे. चला जाणून घेऊयात या पूजेशी संबंधीत सर्व माहिती (Information) आणि पूजा नेमकी कशी करायची हे सर्व.
बालकाच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी केली जाते पूजा
सनातनच्या परंपरेनुसार, बालकाच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी त्याला नवीन कपडे घालून त्याचे नाव ठेवले जाते. त्याच पद्धतीने कान्हाच्या सहाव्या दिवशी त्याला विधीपूर्वक आंघोळ घालण्यात येते. पिवळ्या रंगाचे कपडे नवीव कपडे घातले जातात. लोक त्यांच्या श्रद्धेनुसार कान्हा, कन्हैया, लड्डू गोपाळ, मुरली मनोहर इत्यादी नावे ठेवतात.
तुळशीच्या पानांचे पूजेला विशेष महत्व
आपल्या गोपाळांना पंचामृताने स्नान घालावे. यानंतर शंखात गंगाजल भरून कान्हाचा अभिषेक करून स्वच्छ कपड्याने पुसून पिवळ्या रंगाचे नवीन कपडे कान्हाला घालावीत. श्रृंगारानंतर कान्हाला पिवळे चंदन किंवा कुंकू तिलक लावावे आणि पिवळी फुले, फळे इत्यादी अर्पण करून धूप-दीप दाखवावा. कान्हाच्या भोगात आज दही-मिश्री सोबत तुळशीची पाने देखील मिक्स करावीत.
खऱ्या मनाने भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करा
तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल आणि खूप मेहनत आणि प्रयत्न करूनही पैशाची कमतरता असेल तर धन आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही चांदीची बासरी आजच्या पूजेत अर्पण करा. असे मानले जाते की जो माणूस खऱ्या मनाने भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करतो. त्याला कोणत्याही गोष्टीची कमी देव होऊ देत नाही. यामुळेच आजच्या पूजेला एक खास महत्व नक्कीच आहे.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.)
