Lord Vishnu | भगवान शंकराने विष्णूंच्या पुत्रांचा वध केला होता, जाणून घ्या ही पौराणिक कथा

हिंदू धर्मात भगवान विष्णूला मोठं महत्त्व आहे. नारायणाची प्रामाणिकपणे पूजा (Mahadev Killed Lord Vishnu Sons) करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.

Lord Vishnu | भगवान शंकराने विष्णूंच्या पुत्रांचा वध केला होता, जाणून घ्या ही पौराणिक कथा
lord vishnu

मुंबई : हिंदू धर्मात भगवान विष्णूला मोठं महत्त्व आहे. नारायणाची प्रामाणिकपणे पूजा (Mahadev Killed Lord Vishnu Sons) करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. शिव पुराणात अशी एक आख्यायिका आढळून आली आहे की तिन्ही जगांना राक्षसांपासून वाचवण्यासाठी महादेवांनी भगवान विष्णूच्या पुत्रांचा वध केला. चला जाणून घेऊ ही संपूर्ण कथा (Mahadev Killed Lord Vishnu Sons Know The Pouranik Story) –

काय आहे आख्यायिका?

शिव पुराणानुसार, अमृत मंथनाच्या वेळी समुद्रातून बाहेर आलेले अमृत धारण करण्यासाठी देवता आणि राक्षस यांच्यात भयंकर युद्ध झाले. ते थांबविण्यासाठी भगवान विष्णू मोहिनीचं स्वरुप घेत पोहोचले. जेव्हा राक्षसांनी मोहिनीचे असे सुंदर रुप पाहिले तेव्हा ते तिच्यावर मोहून गेले. मोहिनीचे स्वरुप घेतलेल्या भगवान विष्णूने कपट करत असुरांना अमृत प्राशन करण्यापासून रोखले. यामुळे निराश झालेल्या राक्षसांनी पुन्हा देवांशी युद्ध करण्यास सुरवात केली. आपला पराभव होताना पाहून राक्षस पाताळाच्या दिशेने गेले. श्री विष्णूने तिथेही त्यांचा पाठलाग केला.

जेव्हा भगवान विष्णू राक्षसांच्या मागे पाताळात पोहोचले, तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या कैदेत काही अप्सरा आहेत. त्या सर्व शिवभक्त होत्या. भगवान विष्णूने त्यांला राक्षसांपासून मुक्त केले. सर्व अप्सरा त्यांच्या अनोख्या रुपावर मोहित झाल्या. अप्सरांनी भगवान शिवची भक्ती केली आणि वरदान म्हणून भगवान विष्णूला आपल्या पतीरुपात मागितले.

भोलेनाथ यांनी माया रचली आणि भगवान विष्णूला त्यांचा पती बनविला. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू लग्नानंतर काही दिवस पाताळात थांबले. त्यानंतर, अप्सरांनी विष्णूच्या पुत्रांना जन्म दिला, परंतु या सर्वांमध्ये राक्षसी गुण होते. हळूहळू त्या पुत्रांनी तिन्ही जगाला दहशत निर्माण करण्यास सुरवात केली. सर्व देवता आणि मानव त्रस्त होऊन महादेवाच्या आश्रयाला गेले.

देवता आणि मनुष्यांच्या विनंतीवरुन महादेवांनी यांनी वृषभ म्हणजे बैलाचे स्वरुप धारण केले आणि ते पाताळात पोहोचले. यानंतर, महादेवाने भगवान विष्णूच्या सर्व पुत्रांचा एक एक करुन संहार केला. अशाप्रकारे शिवजींनी विष्णूच्या राक्षसी पुत्रांच्या दहशतीतून तिन्ही जगाचे रक्षण केले.

शिवपुराणातील आख्यायिकेनुसार, जेव्हा भगवान विष्णूला वृषभने त्यांच्या पुत्रांचा संहार केल्याची माहिती मिळाली तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले. रागाच्या भरात ते वृषभशी युद्ध करायला पोहोचला. परंतू, दोघेही देवता असल्याने या युद्धाचा शेवट होत नव्हता. त्यानंतर अप्सरांनी भगवान विष्णूला आपल्या वरदानातून मुक्त करण्यासाठी प्रार्थना केली. भगवान विष्णू त्याच्या वास्तविक रुपात येताच त्यांना संपूर्ण घटना लक्षात आली. यानंतर, त्यांनी शिवजींना त्यांच्या लोकात जाण्याची आज्ञा मागितली आणि विष्णुलोकाकडे परतले.

Mahadev Killed Lord Vishnu Sons Know The Pouranik Story

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

सतयुगातील कन्येचा द्वापारयुगातील श्रीकृष्णाचा भाऊ बलदाऊशी विवाह, जाणून घ्या ही पौराणिक कथा

May Month Ekadashi 2021 | एकादशीला भात का खाऊ नये? जाणून घ्या धार्मिक महत्व