AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाशिवरात्रीला कडक उपवास करताय? ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम

यंदा महाशिवरात्री उत्सव 26 फेब्रुवारी 2025 बुधवार रोजी साजरा केला जाईल. शिवभक्त महाशिवरात्रीच्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. काही लोक या खास सणाला उपवासही ठेवतात. पण उपवासासोबतच तुमच्या आरोग्याचीही काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

महाशिवरात्रीला कडक उपवास करताय? 'या' गोष्टी ठेवा लक्षात अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम
| Edited By: | Updated on: Feb 25, 2025 | 3:42 PM
Share

Mahashivratri 2025 : महाशिवरात्री हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. भगवान शंकराची आराधना उपासना करण्यासाठी या दिवशी अनेक शिवभक्त उपवास करतात. यंदा महाशिवरात्री हा सण 26 फेब्रुवारी म्हणजे बुधवारी मोठ्या उत्साहात जगभरात साजरा केला जाणार आहे. विशेषतः महादेवाच्या भक्तांसाठी हा दिवस खूप खास आहे.

यावेळी पोषणतज्ञ नमामी अग्रवाल सांगतात की उपवासाचे धार्मिक महत्व आहे पण त्यामुळे शरीरालाही त्याचे अनेक फायदे होत असतात. पचनक्रिया चांगली राखण्यापासून ते विषारी पदार्थ काढून टाकण्यापर्यंत उपवासाचे विशेष फायदे सांगितले आहेत. पण उपवास करताना मात्र अनेकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही पहिल्यांदाच महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे.

भरपूर पाणी प्या

अनेकदा काही लोकं महाशिवरात्रीचा उपवास करताना पाणीही पीत नाहीत. त्यामुळे तुम्ही असे अजिबात करू नका. उपवास करताना नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवणे महत्वाचे आहे. दिवसभरात कमीत कमी 8 ग्लास पाणी प्या. यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल आणि डिहायड्रेशन देखील टाळता येईल.

वारंवार चहा पिऊ नका

आपण पाहतोय अनेकजण उपवासाच्या वेळी वारंवार चहा पिण्याची खूप सवय असते. पण तुम्ह अशी चूक करू नका. कारण उपवासाच्या दिवशी पोटाचा अन्न नसते, त्यामुळे वारंवार चहा पिल्याने गॅस आणि अ‍ॅसिड रिफ्लक्स सारख्या समस्या उद्भवू शकतात. तेव्हा तुम्ही सुद्धा उपवासाच्या दिवशी दिवसातून फक्त एकदाच चहा प्यावा.

आहाराची काळजी घ्या

तुम्ही जेव्हा पहिल्यांदा महाशिवरात्रीचा उपवास करता तेव्हा त्यादिवशी फळांचा आहार घ्यावा. यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीर डिहायड्रेट होत नाही. तसेच उपवासाच्या दिवशी जास्त तळलेले किंवा जड अन्न खाणे टाळा कारण त्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. तुम्ही फळे, साबुदाणा, मखाना किंवा हलका उपवासाचा नाश्ता खाऊ शकता.

त्याचवेळी जर तुम्हाला आधीच मधुमेह, हृदयरोग, यकृत-मूत्रपिंडाच्या समस्या अशा कोणत्याही आजाराने ग्रासले असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय उपवास करू नका. उपवासाच्या काळात औषधांमधील अंतरामुळे आजार वाढू शकतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल