AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Makarsankranti 2025 : मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी का बनवली जाते? काय आहे महत्त्व, जाणून घ्या शास्त्रीय कारण

Makarsankranti 2025 Importance: मकर संक्रांती वर्षातील पहिला हिंदू सण मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि तुमच्या कुंडलितील ग्रहांची दिशा बदलण्यास मदत करते. मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक घरांमध्ये खिचडी बनवली जाते. चला तर जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडीचे दान का करावे?

Makarsankranti 2025 : मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी का बनवली जाते? काय आहे महत्त्व, जाणून घ्या शास्त्रीय कारण
MakarsankrantiImage Credit source: tv9 bharatvarsh
| Edited By: | Updated on: Jan 13, 2025 | 6:48 PM
Share

मकर संक्रांती 14 जानेवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांतीला सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो त्याला सूर्याचा संक्रमण काळ म्हणतात. वर्षातील हा दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जोते. देशामधील अनेक भागांमध्ये मकर संक्रांती हा सण ‘खिचडी’ या नावाने साजरा केला जातो. पुरानांमध्ये, महाभारताच्या वेळी भीष्म पितामहांनी सूर्य उत्तरायणाच्या वेळी आपले देह त्यागले होते. त्यानंतर त्याचं दिवशी त्यांचे श्राद्ध आणि तर्पण विधी केले गेले होते. मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाणे आणि दान करणे याचे विशेष महत्त्व मानले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीला तांदूळ, काळी मसूर, हळद, वाटाणा आणि हिरव्या भाज्यांचे विशेष महत्त्व आहे. अनेत घरांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये तांदळाची खिचडी शिजवली जाते. यामुळे तुमच्या घरामधील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तांदळाची खीचडी तुमच्या कुंडलितील चंद्र आणि शुक्राला शांत करण्यास मदत करते. काळ्या मसूरमुळे शनि, राहू आणि केतू शांत होते. तुमच्या आयुष्यामध्ये गुरुची समस्या असेल तर हळदीचा जास्त प्रमाणात वापर करा. तुमच्या आयुष्यातील बुध मतबूत करण्यासाठी हिरव्या भांज्यांचा वापर करावा. मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी केल्यामुळे तुमचे मंगळ आणि सूर्य मजबूत होण्यास मदत होते. म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी घरामध्ये शिजवल्यामुळे तुमच्या कुंडलितील ग्रह सुधारण्यास मदत करते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी घरात शिजवून दान केल्यामुळे तुम्हाला अधिक पुण्याची प्राप्ती होते.

खिचडीची पौराणिक कथा

बाबा गोरखनाथांचा संबंध मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडीशी आहे. मान्यतेनुसार, खिलजीच्या युद्धामध्ये बाबा गोरखनाथांच्या योगींना अन्न शिजवता येत नव्हते आणि दिवसांदिवस उपाशी राहिल्यामुळे त्यांना अशक्तपणा येत होता. योगींची बिघडलेली अवस्था पाहून बाबांनी अपल्या जवळील भातामध्ये डाळ आणि काही भाज्या मिसळून शिजवण्याचा सल्ला दिला. तांदळाचा हा पदार्थ कमी वेळामध्ये तयार झाला आणि याचे सेवन केल्यामुळे योगींचा अशक्तपणा दूर गेला आणि त्यांच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण झाली. बाबा गोरखनाथांनी डाळी, तांदूळ आणि भाज्यांपासून बनवलेल्या या अन्नाला खिचडी असे नाव दिले. आजही मकर संक्रांतीच्या दिवशी गोरखपूरमध्ये बाबा गोरखनाथ मंदिराजवळ खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्या परिसरात खिचडी दान देखील केली जाते.

मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त

उदयतिथीनुसार मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी ८.४१ वाजता आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, मकर संक्रांती साजरी करण्यासाठी पुण्यकाळाची वेळ सकाळी 9.03 ते सायंकाळी 5.46 पर्यंत असेल आणि महापुण्यकाळाची वेळ संध्याकाळी 9.03 ते 10.48 पर्यंत असेल.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.