AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangla Gauri 2022: आज श्रावणातले दुसरे मंगळा गौरी व्रत, महत्त्व आणि पूजा विधी

मंगळा गौरी व्रत देवी पार्वती म्हणजेच गौरीच्या पूजेला समर्पित आहे. मंगला गौरी व्रत घरातील समृद्धी, उत्तम आरोग्य आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळा गौरी व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते.

Mangla Gauri 2022: आज श्रावणातले दुसरे मंगळा गौरी व्रत, महत्त्व आणि पूजा विधी
मंगळा गौरी व्रत Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 09, 2022 | 8:35 AM
Share

आज श्रावण महिन्यातले दुसरे मंगळा गौरी (Mangla Gauri 2022) व्रत आहे.  श्रावण महिना (Shravan 2022) हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. श्रावण महिना (sawan 2022) 29 जुलैला सुरु झाला आहे. हा संपूर्ण महिना भगवान महादेवाला समर्पित आहे. शिव भक्त दर सोमवारी श्रावण सोमवार व्रत पाळतात तर महिला दर मंगळवारी मंगळा गौरी व्रत (Mangla gauri vrat) करातात. असे मानले जाते की, माता पार्वतीने भगवान महादेवाला मिळविण्यासाठी असंख्य उपवास केले होते आणि त्यापैकी एक म्हणजे मंगळा गौरी व्रत आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली चांगला नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात.  एखाद्याच्या वैवाहिक जीवनात काही संकट आले तर तेही माता पार्वतीच्या कृपेने दूर होतात. जर भक्ताची अपत्यप्राप्तीची इच्छा असेल तर हे व्रत केल्याने त्याची मनोकामनाही पूर्ण होते. यासोबतच उपवास करणाऱ्यांना माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो. यंदा श्रावण महिन्यातले पहिले मंगळा गौरी व्रत 2 ऑगस्ट आणि शेवटचे मंगळा गौरी व्रत 23 ऑगस्टला असेल. यामध्ये श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी भगवान शिव आणि पार्वतीची विशेष पूजा केली जाते.

मंगला गौरी व्रताची तिथी

श्रावण महिना यावेळी 29 जुलैपासून सुरू झाला असून तो 27 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.  या श्रावणमध्ये चार मंगळवार आहेत. पहिले मंगळा गौरी व्रत – 2 ऑगस्ट 2022, मंगळवार दुसरे मंगळा गौरी व्रत – 9 ऑगस्ट 2022, मंगळवार तिसरे मंगला गौरी व्रत – 16 ऑगस्ट 2022, मंगळवार चौथे मंगला गौरी व्रत – 23 ऑगस्ट 2022, मंगळवार

मंगला गौरी व्रत म्हणजे काय?

मंगळा गौरी व्रत देवी पार्वती म्हणजेच गौरीच्या पूजेला समर्पित आहे. मंगला गौरी व्रत घरातील समृद्धी, उत्तम आरोग्य आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळा गौरी व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दांपत्य जीवन आनंदी होते. श्रावण  महिन्यात सोमवारचा उपवास भगवान शिवाला समर्पित केला जातो आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी मंगळा गौरीचा उपवास महादेवाची अर्धांगिनी माता पार्वतीला समर्पित केला जातो.

मंगळा गौरी व्रताची पूजा पद्धत

  1. मंगळवारी सकाळी लवकर उठून व्रताचा  संकल्प करावा.
  2. स्नान वगैरे झाल्यावर देव घरासमोर मंगला गौरी मातेचे व्रत करावे.
  3. यानंतर माता मंगला गौरी म्हणजेच पार्वतीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे.
  4. मूर्तीला लाल वस्त्र परिधान करावे.
  5. यानंतर तुपाने भरलेला पिठाचा दिवा लावून आरती करावी.
  6. यानंतर ओम उमामहेश्वराय नमः या मंत्राचा जप करा.
  7. मातेला फुले, लाडू, फळे, सुपारी, वेलची, लवंग, सुपारी, मध आणि पेठे अर्पण करा.
  8. यानंतर मंगला गौरीची कथा ऐका.
  9. पूजेनंतर घरच्यांना प्रसाद वाटप करा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.