तुमच्या हातावर ही रेषा असेल होतील एकापेक्षा अधिक विवाह; सासूरवाडीबाबत… पटापट चेक करा हातावरच्या रेषा
Hast Rekha Shashtra: हस्तरेषाशास्त्रानुसार, तळहातावरील लग्न रेषा तुमच्या लग्नाबद्दल, प्रेमाबद्दल आणि जीवनसाथीबद्दल अनेक संकेत देते. हाताच्या बाहेरील भागापासून करंगळीच्या खाली आणि हृदयरेषेच्या वरपासून सुरू होऊन बुध पर्वताकडे जाणाऱ्या रेषेला 'विवाहरेषा' म्हणतात. लग्न रेषा दाखवते की तुमचे किती लग्न होतील आणि तुम्हाला किती चांगले सासर मिळेल. चला, लग्न रेषेशी संबंधित खास गोष्टी जाणून घेऊया.

जगातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या आयुष्यामध्ये नेमकं काय घडणार आहे या बद्दल जाणून घेण्याची उत्सुक्ता असते. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे असते की त्यांचे लग्न प्रेमविवाह होणार आहे की अरेंज्ड विवाह. हस्तरेषाशास्त्रानुसार तुमच्या जीवनसाथी संबंधित सांगितले गेले आहेत. त्यांच्या मते, तुमच्या हाताच्या तळहातावरील विवाह रेषांवरून तुमचं लग्न नेमकं कोणत्या पद्धतीनं होणार? तुमच्या प्रेमासंबंधित, जोडीदारा संबंधित अनेक रहस्यमय गोष्टी सांगितल्या जातात. तुमच्या कुंडलीतील ग्रहांप्रमाणे हस्तरेषाशास्त्राच्या माध्यमातून तुमच्या भविष्याबद्दल खासकरून तुमच्या लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल तुम्हाला सांगितले जाते. चला तर तुमच्या हस्तरेषांच्या अनुशंघाने जाणून घेऊया लग्नाबद्दल हस्तशास्त्र काय म्हणतं.
तुमच्या आयुष्याबद्दल माहिती घेण्यापूर्वी तुमच्या तळहातावरील नेमकं कोणती रेष लग्नाची असते हे जाणून घेणे अत्यंत फायदेशीर ठरेल. हस्तरेषाशास्त्रानुसार, हाताच्या बाहेरील भागापासून करंगळीच्या खाली आणि हृदयरेषेच्या वरपासून सुरू होऊन बुध पर्वताकडे जाणाऱ्या रेषेला ‘विवाह रेष’ असे म्हटले जाते. तळहातावरील या रेषांची संख्या आणि त्यांची रचना तुमच्या लग्न आणि प्रेमाशी संबंधित माहिती देते. या रेषांमुळे तुमचं विवाह नंतर आयुष्य नेमकं कसं असे याबद्दल सांगितले जाते.
लग्नाची रेषा पातळ किंवा तुटलेली असेल तर …. जर तुम्हाला तळहातातील लग्न रेष पातळ किंवा तुटलेली असेल तर तुमच्या वैवाहित आयुष्यामध्ये अडचण येण्याची शक्यता असते. अशा लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये अशांतता आणि भांडणं होत राहातात ज्यामुळे जोडीदारांमध्ये नेहमीच संघर्षाचे वातावरण पाहायला मिळते.
लग्न रेषेच्या लाल आणि गुलाबी रंगाची असेल तर…. जर तुमच्या तळहातातील लग्न रेषा सुरुवातीला स्पष्ट दिसत नसेल परंतु पुढे जाताना ती गुलाबी आणि खोल होत असेल, तर याचा अर्थ असा की सुरुवातीला तुमच्या वैवाहिक जीवनात उत्साह आणि उत्साहाचा अभाव असेल परंतु कालांतराने, तुमच्या दोघांमधील नाते अधिक मजबूत आणि खोल होत जाईल. तुमच्या जोडीदाराच्या मनामध्ये तुमच्या विषयी प्रेम आदर आणि आपुल्की वाढेल.
लग्न रेषा खोल आणि स्पष्ट असेल तर…. जर तुमच्या तळहातावरील लग्नाची रेषा खोल आणि स्पष्ट असेल तर तुमच्यासाठी ही खूप चांगली बातमी आहे. हस्तरेषाशास्त्रानुसार, तळहातामध्ये स्पष्ट आणि वेगळी लग्न रेषा असणे शुभ असते. विशेषतः जेव्हा चंद्र पर्वतातून एखादी रेषा निघते आणि भाग्य रेषेला मिळते, तेव्हा ती श्रीमंत कुटुंबात लग्नाचे आणि सासरच्या लोकांकडून पूर्ण पाठिंबा मिळण्याचे लक्षण मानले जाते.
एकापेक्षा जास्त विवाह रेषा असतील तर…. जर तुमच्या तळहातावर दोन किंवा तीन लग्नाच्या रेषा एकत्र असतील तर याचा अर्थ असा की तुमचे एकापेक्षा जास्त लग्न असू शकतात. याशिवाय, ही रेषा असेही दर्शवते की तुमचे एक किंवा दोनपेक्षा जास्त गंभीर प्रेमसंबंध असू शकतात. याचा अर्थ असा की तळहातावर एकापेक्षा जास्त लग्न रेषा असणे हे तुमच्या विवाहाचे तसेच प्रेम संबंधांचे सूचक आहे.
डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही