AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur Wari : माऊलीच्या जयघोषात भाविकांनी नीरा नदी पोहत केली पार, शिवछत्रपती पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ

17 जूनला पंढरपूरच्या दिशेनं शिवछत्रपती पालखी निघाली होती. ही पालखी इंदापूर तालुक्यातील बावडा या गावी मुक्कामी होती. त्यानंतर या पालखीनं पुढे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी पालखीमधील भाविकांनी नीरा नदी पोहत पार केली.

Pandharpur Wari : माऊलीच्या जयघोषात भाविकांनी नीरा नदी पोहत केली पार, शिवछत्रपती पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ
नीरा नदी पोहून भाविक पंढरपूरकडे मार्गस्थImage Credit source: tv9
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Jul 06, 2022 | 1:36 PM
Share

इंदापूर :आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाण्याची ओढ असंख्य भाविकांना लागली आहे. मराठवाडा (Marathwada), विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र यासह राज्यभरातल्या काना कोपऱ्यातून अनेक भाविक पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाले आहेत. किल्ले रायगड येथून 17 जूनला पंढरपूरच्या दिशेनं शिवछत्रपती पालखी निघाली. ही पालखी इंदापूर तालुक्यातील बावडा या गावी मुक्कामी होती. त्यानंतर या पालखीनं पुढे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी पालखीमधील भाविकांनी नीरा नदी पोहत पार केली. पंढरपूरला जाण्याची ही ओढ त्यांच्यात यावेळी दिसत होती. विठ्ठल विठ्ठल करत आणि शिवरायांचा जयघोष करत हे भाविक, वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहेत. शिवछत्रपती पालखी सोहळा यापुढे श्रीपूर, तोंडले, गार्डी, गोदेगाव मार्गे 9 जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून पालखी निघत असल्यानं राज्यात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय.

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची (Tukaram maharaj palkhi 2022) पालखी 9 जुलैला पंढरपूर नगरीत प्रवेश करेल. पंढरपुरात प्रशासनाने आवश्यक त्या सर्व सोयी वारकऱ्यांसाठी केलेल्या आहेत. वारकरी पावसात चिंब भिजत हरिनामाचा जयघोष करीत पंढरपूरच्या (Pandharpur wari 2022) दिशेने वारकरी मार्गस्थ होत आहेत.

भाविकांसाठी पंढरपूरपर्यंत विशेष रेल्वे (Special train for Pandharpur) सोडण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतलाय. जालना, नांदेड आणि औरंगाबादहून पंढरपूर आणि परतीसाठी विशेष गाड्या चालवल्या जातील. ही विशेष सेवा 07 जुलैपासून सुरु केली जाईल, असे रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. औरंगाबाद, जालना, नांदेड या स्टेशनवरून निघाणाऱ्या गाड्यांमधून वारकरी आणि भक्तांनी योग्य वेळात पंढरपूरला पोहोचावेत, या दृष्टीने रेल्वे विभागाने काळजी घेण्यात आली आहे.

या आहेत मानाच्या 10 पालख्या

  1. संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर )
  2. संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )
  3. संत सोपान काका महाराज ( सासवड )
  4. संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )
  5. संत तुकाराम महाराज ( देहू )
  6. संत नामदेव महाराज ( पंढरपूर )
  7. संत एकनाथ महाराज ( पैठण )
  8. रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )
  9. संत निळोबाराय ( पिंपळनेर – पारनेर अहमदनगर )
  10. संत चांगाटेश्वर महाराज ( सासवड )

Follow Us
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'
लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व
Mumbai Local case : लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व