AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंपर लॉटरी की साडेसाती, 2026 वर्ष कसं जाणार? तुमच्या जन्मतारखेनुसार लगेच जाणून घ्या

२०२६ हे वर्ष अंकशास्त्रानुसार सूर्याच्या प्रभावाखाली असून नेतृत्व व नव्या संधी घेऊन येईल. जन्मतारखेनुसार तुमचे करिअर, आर्थिक स्थिती, प्रेमसंबंध आणि आरोग्याचे भविष्य जाणून घ्या.

बंपर लॉटरी की साडेसाती, 2026 वर्ष कसं जाणार? तुमच्या जन्मतारखेनुसार लगेच जाणून घ्या
Numerology
| Updated on: Nov 21, 2025 | 9:35 PM
Share

२०२५ हे वर्ष संपण्यासाठी अवघे ४० दिवस शिल्लक राहिले आहेत. यानंतर आपण २०२६ या नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत. नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी अनेक जण ते कसे असेल? आपल्यासाठी चांगले असेल का? आपल्याला नवीन संधी मिळेल का? लग्न जमेल का? याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतो. आज आम्ही तुम्हाला तुमच्या जन्मतारखेनुसार येणारे नवीन वर्ष तुम्हाला कसे जाईल, याबद्दल सांगणार आहोत.

अंकशास्त्रानुसार २०२६ हे वर्ष अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि ऊर्जेने भरलेले वर्ष असणार आहे. या वर्षाच्या अंकाची बेरीज केल्यास ती १ येते, म्हणजेच त्याचा एकूण मूलांक १ येतो. १ हा अंक थेट सूर्य ग्रहाशी जोडलेला आहे. १ हा अंक आरंभ, नेतृत्व आणि आत्मविश्वास दर्शवतो. यामुळे, आगामी वर्षात अनेकांना जीवनात मोठी झेप घेण्याची, धैर्य दाखवण्याची आणि स्वतःच्या कर्तृत्वाने नवीन अध्याय सुरू करण्याची संधी मिळणार आहे.

जन्मतारीख: १, १०, १९, २८

हे वर्ष तुमच्यासाठी नेतृत्वाच्या भूमिकेत येण्याची संधी घेऊन येईल. तुमचा आत्मविश्वास उच्च असेल, ज्यामुळे तुम्ही सहजपणे अडथळे पार कराल. कामात ओळख आणि यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थिती स्थिर राहील, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रेम जीवन रंगतदार असेल, पण अहंकार आणि मीपणा टाळा, अन्यथा नात्यात तणाव येऊ शकतो. आरोग्य चांगले राहील, पण वाढलेल्या कामामुळे थकवा जाणवू शकतो.

जन्मतारीख: २, ११, २०, २९

२०२६ हे वर्ष तुमच्यासाठी भावनिक गुंतागुंतीचे असेल. तुम्ही थोडे शांत आणि स्वतःच्या विचारात रमलेले असाल. नोकरीत स्थिरता जाणवेल. व्यवसायिकांसाठी प्रगतीचे योग आहेत. आर्थिक गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे. नात्यात भावनिक जवळीक वाढेल. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. काही वेळा मूड स्विंग्स आणि गोंधळ जाणवू शकतो. मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

जन्मतारीख: ३, १२, २१, ३०

हे वर्ष तुम्हाला नव्या उंचीवर घेऊन जाणारे ठरेल. तुम्हाला कामातून प्रेरणा मिळेल. मोठे प्रोजेक्ट्स मिळू शकतात. नोकरीत बढती आणि उत्पन्नात वाढ होईल. उच्च शिक्षण किंवा संशोधनासाठी अनुकूल वेळ आहे. आर्थिक उत्पन्न वाढेल, पण धार्मिक किंवा व्यवसायानिमित्त प्रवासखर्च वाढू शकतो. प्रेमसंबंध सुधारतील, पण जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. अहंकारामुळे मतभेद निर्माण होऊ शकतात.

जन्मतारीख: ४, १३, २२, ३१

हे वर्ष तुमच्यासाठी चढ-उतारांचे आणि अनपेक्षित बदलांचे असेल. संयम हा यशाचा मंत्र ठरेल. अचानक मोठे फेरबदल किंवा नोकरी बदल शक्य आहेत. व्यवसायात जोखीम असेल, पण योग्य निर्णय लाभदायक ठरतील. आर्थिक खर्च जास्त होऊ शकतो, त्यामुळे बचतीकडे लक्ष द्या. प्रेमसंबंधांत मतभेद संभवतात. ताण टाळा आणि स्पष्ट संवाद ठेवा. ताण आणि थकवा जाणवेल.

जन्मतारीख: ५, १४, २३

२०२६ तुमच्यासाठी रोमांचक, गतिशील वर्ष ठरणार आहे. नोकरी बदलाचे संकेत आहेत. त्यामुळे नव्या संधींचा पुरेपूर फायदा घेऊ शकाल. आर्थिक नियोजन करा, अनावश्यक खर्च टाळा. प्रेमसंबंधात चढ-उतार असतील. पण संवाद टिकवून ठेवा. कार्यस्थळी गॉसिपपासून दूर राहा. ऊर्जावान राहाल. मात्र योग्य आहार आणि विश्रांती आवश्यक आहे.

जन्मतारीख: ६, १५, २४

२०२६ हे वर्ष तुमच्यासाठी प्रेम, आनंद आणि कुटुंबाची जबाबदारी घेऊन येईल. वैयक्तिक आयुष्यात खूप शांतता अनुभवाल. ग्लॅमर, फॅशन, मीडिया, सौंदर्य किंवा कलेच्या क्षेत्रातील लोकांसाठी हे वर्ष सोन्यासारखे आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुमचे उत्पन्न निश्चितपणे वाढेल, पण कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि घरात सोई वाढवण्यासाठी खर्चही तितकाच वाढेल. लव्ह लाइफ सुधारेल. घरात सुख-शांती नांदेल आणि तुम्ही जबाबदारीने नाती सांभाळाल. फक्त जास्त गोड पदार्थ खाणे टाळा आणि खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा.

जन्मतारीख: ७, १६, २५

२०२६ हे वर्ष तुमच्यासाठी आध्यात्मिक आत्मचिंतनाचे आणि संशोधनाचे ठरेल. करिअरमध्ये स्थिरता असेल. व्यवसायात हळूहळू, पण निश्चित प्रगती होईल. अनपेक्षित उत्पन्नाचे योग आहेत, पण जोखमीच्या गुंतवणुकीपासून सावध राहा. नातेसंबंधांमध्ये अंतर वाढू देऊ नका. मतभेद विसरून संवाद साधा. सकारात्मकता जपा आणि पुरेशी झोप घ्या, अन्यथा आरोग्य बिघडू शकतं.

जन्मतारीख: ८, १७, २६

२०२६ हे वर्ष तुमच्या कष्टाचे सोनं करणारे ठरेल. संयम, शिस्त आणि मेहनत तुम्हाला मोठे यश देईल. उत्पन्नात वाढ होईल. तसेच व्यवसायही वाढेल. तुम्हाला मोठा सन्मान किंवा अधिकार मिळू शकतो. दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रेमसंबंधात हट्ट टाळा. अविवाहितांना स्थिर साथीदार मिळू शकतो. थकवा आणि कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे नियमित विश्रांती आवश्यक आहे.

जन्मतारीख: ९, १८, २७

२०२६ हे वर्ष उर्जा आणि धैर्याने भरलेले आहे, मात्र भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. करिअरमध्ये प्रगती, नवीन संधी आणि आर्थिक वाढ होईल. परदेश प्रवासाचे योग आहेत. आर्थिक स्थिती सुधारेल. नात्यांमध्ये आदर ठेवा. राग आणि उतावळेपणा नुकसान करू शकतो, विचारपूर्वक निर्णय घ्या. तणाव आणि किरकोळ जखमांची शक्यता आहे.

दरम्यान २०२६ हे वर्ष सूर्याच्या तेजाने उजळलेलं वर्ष आहे. ज्यांच्याकडे आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल, ते या वर्षात मोठे यश मिळवतील. तुम्ही स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि कोणत्याही गोष्टीत अतिरेक (जास्तपणा) करू नका, मग तो राग असो, खर्च असो किंवा उत्साह. संतुलन राखल्यास २०२६ हे वर्ष तुमच्यासाठी निश्चितच भाग्यवान ठरेल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.