पंढरपुरात कडक निर्बंध, मात्र पुत्रदा एकादशी निमित्त तब्बल 50000 भाविक विठ्ठल दर्शनासाठी दाखल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 13 ऑगस्टपासून पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान आज पंढरपुरात संचार बंदी असतानाही भाविकांची श्री विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. आज जवळपास पन्नास हजार भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.

पंढरपुरात कडक निर्बंध, मात्र पुत्रदा एकादशी निमित्त तब्बल 50000 भाविक विठ्ठल दर्शनासाठी दाखल
Pandharpur Pilgrims Crowd
रवी लव्हेकर

| Edited By: Nupur Chilkulwar

Aug 18, 2021 | 11:54 AM

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 13 ऑगस्टपासून पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान आज पंढरपुरात संचार बंदी असतानाही भाविकांची श्री विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. आज जवळपास पन्नास हजार भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.

आज श्रावणी पुत्रदा एकादशी आहे. एकादशीच्या निमित्ताने अनेक भाविक आज पंढरपुरात आले आहेत. सकाळपासूनच चंद्रभागा स्नान आणि संत नामदेव पायरीपासून विठ्ठल दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे एका बाजुला पंढरपूरमध्ये कडकडीत बंद तर मंदिर परिसरामध्ये भाविकांची मांदियाळी असल्याचे चित्र पहायला मिळाले.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहरामध्ये संचारबंदी लागू केली आहे. मात्र एस टी आणि खासगी सेवा सुरु असल्याने अनेक भाविक पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येत आहे त्यामुळे संचार बंदी असतानाही पंढरपूर भाविकांनि फुलले आहे.

Pandharpur Pilgrims Crowd1

Pandharpur Pilgrims Crowd

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट

आज श्रावण शुध्द पुत्रदा एकादशी असल्याने पंढरपूर येथील सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलानि सजवण्यात आले आहे. ही सजावट रांजणगाव येथील विठ्ठलभक्त नानासाहेब पाचुंदकर यांनी केली. श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा सोळखांबी, चारखांबी तसेच मंदिराच्या विविध भागाना झेंडु, आष्टर, ग्लेंडर, केशरी झेंडु, निळ्या रंगाचा ब्ल्यु डिजे, पिवळा झेंडु, कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस, गुलाब, शेवंती, ड्रेसिना, ऑरकिड अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली आहे. यासाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे. विठुरायाचे आजचे गोजिरे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

संबंधित बातम्या :

वारकऱ्यांची पंढरी देशभक्तीच्या रंगात, पाहा विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील आकर्षक फुलांची आरास

सोलापूरमध्ये ‘या’ 5 तालुक्यांमध्ये कडक लॉकडाऊन, व्यापाऱ्यांकडून घंटानाद आंदोलन

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें