सरकार लगेच होतं बरखास्त? … म्हणून ‘या’ 5 ठिकाणी राजकारणी पाय सुद्धा ठेवत नाही, मान्यता ऐकून व्हाल अवाक्
देशातील 'या' 5 ठिकाणी जाण्यास राजकारण्यांचा विरोध, सरकार लगेच होतं बरखास्त? ... म्हणून राजकारणी याठिकाणी पाय सुद्ध ठेवत नाहीत... नक्की काय आहे मान्यता? जाणून तुम्ही देखील व्हाल थक्क

समाजात प्रत्येक जागेबाबात काही धर्मिक मान्यता आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणांसंबंधी अंधश्रद्धा देखील जोडल्या आहेत. ज्यावर फक्त सामान्य जनताच नाही तर, राजकारणी आणि राज घराण्यातील लोकं देखील विश्वास ठेवतात. दिल्ली एनसीआरमधील नोएडा शहर देखील याच अंधश्रद्धेशी जोडलेलं आहे. असं मानलं जातं की, ज्या कोणत्याही नेत्याने नोएडाला भेट दिली, त्या मुख्यमंत्र्यांचं सरकार एका रात्रीत कोसळलं. याच कारणामुळे येथील जनता मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाही. पण दिल्ली मेट्रोच्या मॅजेन्टा लाईनच्या उद्घाटनानिमित्त, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींसोबत येथे येऊन ही अंधश्रद्धा मोडली. पण केवळ नोएडाच नाही तर देशात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे राजकारणी सत्ता गमावण्याच्या भीतीने जाणं टाळतात असं म्हणतात.
अनेकांचा अंधविश्वास
1. उज्जेन येथील महाकाल मंदिर जगप्रसिद्ध आहे. पण येथे कोणताच राजकारणी व्यक्ती किंवा राज घराण्यातील व्यक्ती फिरकत देखील नाही. येथील लोकांचं असं म्हणणं आहे की महाकाल उज्जेनचे राजा आहेत त्यामुळे दुसरा कोणताच व्यक्ती येथे राजा होऊ शकत नाही. त्यामुळे मंत्री किंवा राजघराण्यातील व्यक्ती उज्जन मंदिराय येत नाहीत.
2. तामिळनाडूतील बृहदीर मंदिरात कोणत्याही राजकारण्याला जाण्यास मनाई आहे. या मंदिराशी संबंधित अंधश्रद्धेनुसार, या मंदिरात येणाऱ्या राजकारण्याचा भविष्यात लवकर मृत्यू होतो, त्यामुळे कोणताही राजकारणी येथे जाण्याची चूक करत नाही. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे इंदिरा गांधी आणि मुख्यमंत्री रामचंद्र यांचे निधन. सांगायचं झालं तर, 1984 मध्ये आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधी या मंदिरात गेल्या होत्या, त्यानंतर त्यांचं निधन झालं. तेव्हापासून ही अंधश्रद्धा या मंदिराशी जोडली गेली.
3. मध्ये प्रदेश येथील अशोक नगर हे ठिकाणी देखील मंत्र्यांसाठी कमनशिबी मानलं जातं. इथे जाणारे राजकारणी कधीच सत्तेत परत येत नाहीत. कारण 1975 मध्ये काशचंद सेठी, 1977 मध्ये श्यामशुक्ला आणि 2003 मध्ये दिग्विजय सिंह आणि त्यादरम्यान इथे गेलेले अनेक नेते पुन्हा कधीही मुख्यमंत्री झाले नाहीत.
4. मध्य प्रदेशातील कामदगिरी पर्वताशी एक अंधश्रद्धा जोडली गेली आहे. असं मानलं जातं की नेते त्यांचे हेलिकॉप्टर येथे थांबवत नाहीत. अन्यथा, त्यांची सत्ता आयुष्यभरासाठी हिरावून घेतली जाते. सांगायचं झालं तर, खरंतर, पौराणिक कथेनुसार, भगवान रामाने त्यांच्या वनवासात या ठिकाणी वेळ घालवला होता. त्यामुळे, येथे आलेले मंत्र्यांची सत्ता जाते अशी देखील मान्यता आहे.
5. गेल्या 12 वर्षांत मध्य प्रदेशातील इच्छावार येथे कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली नाही. कारण तिथे जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांना त्यांची खुर्ची गमवावी लागते, त्यामुळे कोणताही मुख्यमंत्री येथे भेट देत नाही. अशी देखील मान्यता आहे. सांगायचं झालं तर, जे भविष्यात होणार आहे, त्याला कोणी टाळू शकत नाही… असं देखील म्हटलं जातं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
