AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांनी मासिक पाळीत तीर्थयात्रा करावी का? प्रेमानंद महाराजांनी दिलं मोठं उत्तर

मासिक पाळीमध्ये महिलांनी मंदिरामध्ये प्रवेश करावा की नाही? प्रेमानंद महाराजांनी थेट सांगूनच टाकलं. जाणून घ्या सविस्तर

महिलांनी मासिक पाळीत तीर्थयात्रा करावी का? प्रेमानंद महाराजांनी दिलं मोठं उत्तर
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 07, 2026 | 5:25 PM
Share

Premanand Maharaj : मासिक पाळी (पीरियड्स) आणि महिलांच्या मंदिरप्रवेशाबाबत समाजात अनेक वर्षांपासून विविध समज-गैरसमज प्रचलित आहेत. पारंपरिक दृष्टिकोनानुसार, या काळात महिलांनी पूजा-पाठ किंवा मंदिरात जाणं टाळावं अशी धारणा होती. मात्र, अनेक विद्वानांच्या मते ही प्रथा धार्मिक ग्रंथांपेक्षा सामाजिक परंपरांमधून निर्माण झाली आहे.

याच संदर्भात एका महिला भक्ताने प्रेमानंद महाराज यांना प्रश्न विचारला. ती म्हणाली की, अनेक महिलांना तीर्थयात्रेदरम्यान मासिक पाळी सुरू होते. अशा वेळी त्यांनी दर्शन घ्यावं का टाळावं याबाबत संभ्रम निर्माण होतो. यावर उत्तर देताना प्रेमानंद महाराज यांनी स्पष्ट सांगितलं की, मासिक पाळी ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यासाठी महिलांनी धार्मिक अनुभवापासून पूर्णपणे दूर राहण्याची गरज नाही.

त्यांच्या मते, जर अशा परिस्थितीत पुन्हा त्या तीर्थस्थळी जाणं शक्य नसेल तर महिलांनी स्नान करून, प्रसाद, चंदन किंवा पवित्र जल शिंपडून श्रद्धेने दूरून दर्शन घ्यावं. मात्र, परंपरांचा आदर राखत मंदिरातील वस्तूंना स्पर्श टाळावा.

ही निंदनीय नाही तर स्वीकारण्यासारखी गोष्ट

प्रेमानंद महाराजांनी पुढे सांगितलं की, मासिक पाळी ही कोणतीही निंदनीय गोष्ट नसून ती स्वीकारण्यासारखी नैसर्गिक प्रक्रिया आहे. काही पौराणिक मान्यतांनुसार, देवेंद्राने वृत्रासुराचा वध केल्यानंतर लागलेल्या दोषाचे चार भाग करण्यात आले होते. त्यातील एक भाग स्त्रियांनी स्वीकारला, ज्याला मासिक पाळी मानलं जातं.

या कथेनुसार, ही प्रक्रिया अपवित्रतेचं नाही तर त्याग आणि सहनशीलतेचं प्रतीक मानलं जाते. प्रेमानंद महाराज यांनी स्पष्ट केलं की, महिलांना अशा कारणामुळे पूर्णपणे धार्मिक लाभांपासून वंचित ठेवणं योग्य नाही. त्यांनी सांगितलं की, परिस्थितीनुसार महिलांनी स्वतःची स्वच्छता राखून, नियमांचं पालन करत दूरून दर्शन घेणं हा देखील एक प्रकारचा आध्यात्मिक अनुभव आहे.

आजच्या काळात या विषयावर नव्याने विचार करण्याची गरज आहे. श्रद्धा आणि परंपरा यामध्ये संतुलन राखत महिलांना त्यांच्या श्रद्धेनुसार निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळणं आवश्यक आहे. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून, त्याला अपवित्रतेशी जोडण्याऐवजी संवेदनशील आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे.

Follow Us
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ
ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
Dharashiv : ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...