Raksha Bandhan 2022: रक्षा बंधनाचा मुहूर्त चुकला? केव्हा बांधता येईल राखी?

12 ऑगस्टला राखीचा शुभ मुहूर्त फार कमी काळासाठी होता, तर असे बरेच जण  असतील ज्यांनी हा शुभ मुहूर्त गमावला असेल. तुमच्यासोबतही असेच काही घडले असेल तर तुम्हाला फार काळजी करण्याची गरज नाही. रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त संपल्यानंतर तुम्ही राखी कधी बांधू शकता याबद्दल जाणून घेऊया.

Raksha Bandhan 2022: रक्षा बंधनाचा मुहूर्त चुकला? केव्हा बांधता येईल राखी?
नितीश गाडगे

|

Aug 12, 2022 | 6:26 PM

रक्षाबंधन (Raksha bandhan 2022) हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर रेशीमधागा बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, मात्र यंदा रक्षाबंधनाच्या सणाबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. रक्षाबंधन हा सण पौर्णिमेला साजरा केला जातो. अशा स्थितीत या वर्षी पौर्णिमा 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.37 वाजता सुरू झाली आणि आज म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7.06 वाजता संपली. भद्रा कालावधीमुळे 11 ऑगस्ट रोजी अनेकांनी राखी सण साजरा केला नाही. जेव्हा भाद्रा अधोलोकात असते तेव्हा अशा वेळी राखी बांधणे खूप शुभ मानले जाते. अशा स्थितीत 12 ऑगस्टलाच सकाळी अनेकांनी राखीचा सण साजरा केला. कारण 12 ऑगस्टला राखीचा शुभ मुहूर्त फार कमी काळासाठी होता, तर असे बरेच जण  असतील ज्यांनी हा शुभ मुहूर्त गमावला असेल. तुमच्यासोबतही असेच काही घडले असेल तर तुम्हाला फार काळजी करण्याची गरज नाही. रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त (Subha Muhurat) संपल्यानंतर तुम्ही राखी कधी बांधू शकता याबद्दल जाणून घेऊया.

  1. जोतिषतज्ञांच्या मते  जर तुम्हाला शुभ मुहूर्तावर राखी बांधता आली नसेल, तर त्यानंतरही तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. राहुकाळ वगळता  तुम्ही कोणत्याही शुभ मुहूर्तावर राखी बांधू शकता.
  2. प्रतिपदा ही पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी असते, त्यामुळे यावेळी राखी बांधणे टाळावे. येत्या आठवड्यात 15 दिवसांच्या आत राखी बांधणे योग्य ठरेल.
  3. याशिवाय चतुर्थी,  शनिवार आणि मंगळवार या दिवशी राखी बंधने टाळावे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें