AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir : भगवान रामाच्या  प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अक्षतांचा वाडा कोलमला मान, शेतकऱ्यांसाठी मानाची बाब

हिंदू धर्मात अक्षतला विशेष महत्त्व आहे. अक्षत ही तांदूळ हळद, कुंकू आणि तूप घालून तयार केली जाते. धार्मिक कार्यक्रमात प्रत्त्येक विधीत मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. वडा कोलम तांदळाची 10 टन खेप दोन दिवसांपूर्वी पालघरहून निघाली, अशी माहिती शेतकरी सहकारी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दिली.

Ram Mandir : भगवान रामाच्या  प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अक्षतांचा वाडा कोलमला मान, शेतकऱ्यांसाठी मानाची बाब
राम मंदिर अक्षतImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 20, 2024 | 6:22 PM
Share

मुंबई : अयोध्येमध्ये 22 जानेवारीला भव्यदिव्य मंदिरात प्रभू रामाची प्राण प्रतिष्ठा (Ramlala Pranpratishtha) होणार आहे. त्यासाठी 10 टन अक्षता वाडा येथून अयोध्येकडे रवाना झाल्या आहेत. वाडा कोलमच्या अक्षता अयोध्येत लाखो भाविकांच्या हातात जाणार असल्याने वाडा कोलमचा हा मोठा सन्मान असल्याचे वाड्यातील वाडा कोलम उत्पादक शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. भगवान रामाचा  प्रसाद म्हणून विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशभरामध्ये जवळपास 62 कोटी लोकांपर्यंत वाडा कोलमच्या अक्षता पोहोचवणार आहेत. वाडा तालुक्यातील एका शेतकरी पुत्राने स्थापन केलेल्या बीज उत्पादक कंपनीकडून राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 10 टन  तांदूळ दान करण्यात आला असून हा तांदूळ श्री राम जन्मभूमी न्यासाकडे पाठविण्यात आला आहे. सध्या वाडा कोलम तांदळाचे भौगोलिक मानांकन(GI) अंतिम टप्प्यात असताना वाडा तालुक्यातील या जगप्रसिद्ध तांदळाला मिळालेला मान नक्कीच येथील शेतकऱ्यांची मान उंचवणारा आहे.

यासाठी प्रसिद्ध आहे वाडा कोलम तांदूळ

वडा कोलम तांदूळ, ज्याला झिनी असेही म्हणतात, हा मुख्यत: आदिवासी प्रदेशात उगवला जातो. वाडा कोलम हा पांढर्‍या रंगाच्या लहान दाण्यांसाठी आणि अद्वितीय सुगंधासाठी प्रसिद्ध आहे. या तांदळासाठी भौगोलिक संकेत (GI) अर्ज जुलै 2020 मध्ये दाखल करण्यात आला आणि ऑक्टोबर 2021 मध्ये वस्तूसाठी GI ऑर्डर प्राप्त झाली.

हिंदू धर्मात अक्षतला विशेष महत्त्व आहे. अक्षत ही तांदूळ हळद, कुंकू आणि तूप घालून तयार केली जाते. धार्मिक कार्यक्रमात प्रत्त्येक विधीत मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. वडा कोलम तांदळाची 10 टन खेप दोन दिवसांपूर्वी पालघरहून निघाली, अशी माहिती शेतकरी सहकारी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दिली. स्थानिक शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. भगवान रामाचा  प्रसाद म्हणून विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशभरामध्ये जवळपास 62 कोटी लोकांपर्यंत वाडा कोलमच्या अक्षता पोहोचवणार आहेत.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.