AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayodhya Ram Mandir : त्रेतायुग थीमनुसार सजतेयं राम नगरी अयोध्या, त्रेतायुग नेमकं कसं होतं?

त्याचबरोबर संपूर्ण अयोध्या त्रेतायुग थीमने (Tretayuga Theme Ayodhya) सजवली जात आहे. रस्त्याच्या कडेला बसवलेले सूर्यस्तंभ प्रभू राम हे सूर्यवंशी असण्याचे प्रतीक आहेत. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, धर्मपथाच्या रस्त्याच्या कडेला भिंती बांधल्या जात असून त्यावर रामायण काळातील घटनांचे चित्रण करण्यात येणार आहे.

Ayodhya Ram Mandir : त्रेतायुग थीमनुसार सजतेयं राम नगरी अयोध्या, त्रेतायुग नेमकं कसं होतं?
अयोध्या मंदिरImage Credit source: Social Media
| Updated on: Dec 29, 2023 | 9:58 AM
Share

मुंबई : अयोध्येत राम मंदिराची तयारी जोरात सुरू आहे. श्री रामाचे बाल रूप रामललाचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. रामललाच्या या अभिषेक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहेत. अयोध्येत 70  एकर जागेवर राम मंदिर बांधले जात आहे. त्यांची उंची अंदाजे 162 फूट असेल. प्रभू राम मंदिरासोबतच या संपूर्ण मंदिर परिसरात आणखी 6 मंदिरे बांधली जात आहेत. मंदिराचा मुख्य दरवाजा सिंह द्वार या नावाने ओळखला जाईल. त्याचबरोबर संपूर्ण अयोध्या त्रेतायुग थीमने (Tretayuga Theme Ayodhya) सजवली जात आहे. रस्त्याच्या कडेला बसवलेले सूर्यस्तंभ प्रभू राम हे सूर्यवंशी असण्याचे प्रतीक आहेत. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, धर्मपथाच्या रस्त्याच्या कडेला भिंती बांधल्या जात असून त्यावर रामायण काळातील घटनांचे चित्रण करण्यात येणार आहे. त्रेतायुगाची आठवण करून देणार्‍या टेराकोटा मातीच्या म्युरल कलाकृतींनी भिंती सुशोभित केल्या जातील. आता अयोध्येत सर्वत्र चित्रकला, साफसफाई आणि कलाकृतींचे काम दिसत आहे.

दुसरीकडे, नयाघाट ते सहदतगंजकडे जाणाऱ्या रस्त्याला रामपथ असे नाव देण्यात आले आहे, कारण त्रेतायुग या थीमने अयोध्या सजवली जात आहे, तर त्रेतायुग नेमके कसे होते हे आपण जाणून घेऊया.

त्रेतायुग नेमके कसे होते?

त्रेतायुग हे हिंदू मान्यतेनुसार चार युगांपैकी एक आहे. त्रेतायुग हे मानवयुगाचे दुसरे युग म्हटले जाते. सतयुग संपल्यावर त्रेतायुग सुरू झाले आणि हे युग सनातन धर्माचे दुसरे युग होते. पुराणानुसार त्रेतायुग हा अंदाजे 12 लाख 96 हजार वर्षांचा होता. त्रेतायुगात माणसाचे सरासरी वय 10 हजार वर्षे होते. त्रेतायुगात धर्म 3 स्तंभांवर उभा होता. त्रेतायुगात लोकं कर्म तसे फळ या मान्यतेवर विश्वास ठेवत. या काळात लोकं धर्माचेही पालन करत होते.

शेवटी श्रीरामाचा त्रेतायुगाशी काय संबंध होता?

त्रेतायुगात भगवान विष्णूंचा जन्म वामन, परशुराम आणि शेवटी श्रीराम म्हणून झाला. श्रीरामांचा जन्म त्रेतायुगात झाला. मर्यादापुरुषोत्तम श्री राम हे भगवान विष्णूचे अवतार होते. महर्षि वाल्मिकींच्या रामायणानुसार, मर्यदपुरुषोत्तम श्री रामचंद्रजी हे अयोध्येचे राजा दशरथ यांचे पुत्र होते. श्री राम देखील आपल्या वडिलांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी 14 वर्षे वनवासात गेले. दैत्यांचा नाश करण्यासाठी श्री राम अवतरले होते त्यांनी रावणाचा वध केला. त्याचवेळी श्री राम 14 वर्षांच्या वनवासानंतर परतले तेव्हा अयोध्येतील लोकांनी आनंदाने संपूर्ण शहर दिव्यांनी सजवले होते.

22 जानेवारी रोजी अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामलला म्हणजेच श्री रामाच्या बालरूपाच्या अभिषेकासाठी 84 सेकंदांचा अत्यंत सूक्ष्म मुहूर्त असेल, ज्यामध्ये रामलालाचा अभिषेक केला जाईल. काशीचे ज्योतिषी पंडित गणेशवर शास्त्री द्रविड यांनी हा शुभ काळ निवडला आहे. हा शुभ मुहूर्त केवळ 84 सेकंदांचा असेल जो 12.29 मिनिटे 8 सेकंद ते 12.30 मिनिटे 32 सेकंदांपर्यंत असेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....