AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येचा राजा अवतरला… गर्भगृहात प्रभू रामचंद्र विराजमान, चार तास पूजाअर्चा; मूर्ती पाहिलीय का?

प्राणप्रतिष्ठेनंतर रामललाची दिव्य मूर्ती पाहता येईल. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रामाची मूर्ती गर्भगृहाच्या आसनावर ठेवण्यात आली होती. रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी एकूण चार तासांपेक्षा जास्त वेळ लागला.

अयोध्येचा राजा अवतरला... गर्भगृहात प्रभू रामचंद्र विराजमान, चार तास पूजाअर्चा; मूर्ती पाहिलीय का?
रामलला Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 18, 2024 | 6:11 PM
Share

अयोध्या : अयोध्येत राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा विधी सुरू आहे. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी शास्त्रानुसार एकामागून एक पूजा केली जात आहे. याच अनुषंगाने गुरुवारी नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिराच्या गाभाऱ्यात श्री रामलालाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी रामललाच्या मूर्तीची गर्भगृहात प्रतिष्ठापना करून हा शुभ सोहळा संपन्न झाला. एक प्रकारे, शतकांनंतर, रामललाला त्यांच्या जन्मस्थानी विराजमान केले गेले आहे, आता 22 जानेवारीला अभिषेक होणार आहे.

मूर्तीचे दर्शन कधी होणार आहे

प्राणप्रतिष्ठेनंतर रामललाची दिव्य मूर्ती पाहता येईल. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रामाची मूर्ती गर्भगृहाच्या आसनावर ठेवण्यात आली होती. रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी एकूण चार तासांपेक्षा जास्त वेळ लागला. भगवान रामाची ही मूर्ती मंत्रोच्चार आणि पूजाविधीसह पीठावर ठेवली होती. यावेळी शिल्पकार योगीराज यांच्यासह अनेक संत उपस्थित होते. तथापि, अंतिम अभिषेक 22 जानेवारी रोजी होणार आहे. गुरुवारी गाभाऱ्यात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली, तेव्हा पूर्ण झाकलेली रामलल्लाची मूर्ती आता गाभाऱ्यावर विराजमान झाली आहे.

पंतप्रधान मोदी 11 दिवस धार्मिक विधी करत आहेत

दुसरीकडे, पंतप्रधान मोदी प्राण प्रतिष्ठापणेपर्यंत विशेष अनुष्ठाण करत आहेत. त्यांचा 11 दिवसांचा विधी सुरू झालेला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राम मंदिरात राम लल्लाच्या अभिषेकासाठी पंतप्रधान मोदींनी आयोजित केलेल्या 11 दिवसांच्या विधीमध्ये ते जमिनीवर ब्लँकेटवर झोपतात आणि फक्त नारळ पाणी पितात. तर दूसरीकडे अयोध्येत प्राणप्रतिष्ठा करण्याचे विधी सुरू आहेत. अयोध्या राम मंदिरात तिसर्‍या दिवसाच्या विधींना सुरुवात झाली आहे. आज गणेश अंबिका पूजा, वरुण पूजा, चतुर्वेदो पुण्य पठण, मातृका पूजा, सप्तधृत मातृका पूजा, आयुष मंत्र जप, नंदीश्राद्ध, आचार्यदिग्भ्रगवर्णन, मधुपर्क पूजा, मंडप प्रवेश आदी विधी केले जात आहेत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!