AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Grahan 2025: मार्चमध्ये ‘या’ दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार; जाणून घ्या योग्य वेळ, तारीख

Solar Eclipse 2025 Date In India: ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना मानली जाते. यामध्ये सुतक काळावर विशेष लक्ष दिले जाते. या काळात काही नियमांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे, म्हणून वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी आणि कोणत्या वेळी होईल आणि सुतक काळाची वेळ देखील जाणून घेऊया.

Surya Grahan 2025: मार्चमध्ये 'या' दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार; जाणून घ्या योग्य वेळ, तारीख
surya grahan 2025Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Mar 03, 2025 | 3:36 PM
Share

हिंदू धर्मामध्ये तुमच्या कुंडलीतील ग्रहांच्या हालचालींवर तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी घडतात. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि चंद्रग्रहण दोन्ही सर्व 12 राशींच्यया लोकांवर परिणाम करतात. नविन वर्षामध्ये अद्यापही कोणतेही सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण झालेला नाही. मार्चमध्ये होणारे चंद्रग्रहण वर्षातील पहिले सूर्यग्रहण वर्षातील पहिले सूर्यग्रहण असणार आहे. परंतु सर्वांना माहिती आहे, कोणत्याही ग्रहणाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे महत्त्वाचे कामे करायचे नसते. ग्रहणाच्या काळामध्ये कोणतेही शुभकार्य केल्यामुळे त्याच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये ग्रहणाच्या दिवशी कोणती कामे करावे? चला जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण 29 मार्च 2025 रोजी दुपारी 2:20 ते 6:13 या वेळेत होईल. यंदा होणाके सूर्यग्रहण आंशिक सूर्यग्रहण असेल. वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर 2025 रोजी होईल. सप्टेंबर महिन्यातील सूर्यग्रहण देखील आंशिक सूर्यग्रहण असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सुतकचा काळ सुरू होतो. जे ग्रहण कालावधी संपल्यानंतर संपते. सूतक काळ फक्त त्या ठिकाणीच वैध आहे जिथे ग्रहण दिसते. वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. ज्यामुळे सुतक काळ देखील वैध राहणार नाही.

ग्रहण काळात अन्न खाणे देखील शुभ मानले जात नाही. सूर्यग्रहण कधीही उघड्या डोळ्यांनी पाहू नये आणि या काळात कोणत्याही ठिकाणी जाऊ नये. तसेच, सूर्यग्रहणाच्या वेळी केस आणि नखे कापू नयेत आणि या काळात बाहेर प्रवास करू नये. परंतु या काळात श्राद्ध इत्यादींशी संबंधित कामे करता येतात. ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षातील पहिले सूर्यग्रहण काही राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरू शकते. सूर्यग्रहणानंतर, कर्माचे फळ देणारा शनिदेव मीन राशीत प्रवेश करेल. ज्यामुळे मिथुन, तूळ, धनु आणि मीन राशीच्या लोकांना प्रचंड फायदा होऊ शकतो. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांचे बिघडलेले काम पूर्ण होईल. नोकरीत पदोन्नती मिळू शकते. याशिवाय, आरोग्याच्या दृष्टीनेही या राशींसाठी हे चांगले राहील. एवढेच नाही तर परदेश प्रवासाचीही शक्यता आहे.

सूर्यग्रहणाच्या दिवशी ‘या’ गोष्टी करू नयेत

  • सूर्यग्रहणाच्या वेळी लोकांनी झोपू नये , त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
  • या काळात तुम्ही अन्न शिजवणे किंवा खाणे टाळावे, कारण ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
  • या काळात देवी-देवतांना स्पर्श करणे किंवा त्यांची पूजा करणे निषिद्ध मानले जाते.
  • गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे टाळावे.
  • सूर्यग्रहणाच्या वेळी, गर्भवती महिलांनी बाहेर जाणे किंवा सूर्यप्रकाशात येण्यासारखे काहीही करणे टाळावे.
  • शास्त्रांनुसार, सूर्यग्रहण नंतर, प्रत्येकाने आपले घर स्वच्छ करावे आणि स्नान करावे.
  • सूर्यग्रहण सुरू होण्यापूर्वी तुळशीची पाने अन्न आणि पाण्यात ठेवावीत.
  • ग्रहणानंतर, संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे.
  • ग्रहणाच्या वेळी उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे थेट पाहणे टाळावे.
  • या काळात कोणत्याही प्रकारचे अन्न शिजवणे आणि खाणे जीवनात अशुभता आणते.
  • ग्रहण दरम्यान तीक्ष्ण वस्तू वापरणे टाळावे.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.