AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shukrawar Upay : शुक्रवारच्या दिवशी अवश्य करा हा सोपा उपाय, होतील सर्व आर्थिक समस्या दूर

शुक्रवारी जर तुम्ही काही उपायांचा अवलंब केलात तर तुम्हाला पैसे कमावण्याच्या संधी, पैसे वाचवण्याच्या संधी आणि हरवलेले किंवा रखडलेले पैसे मिळण्यास मदत होते.

Shukrawar Upay : शुक्रवारच्या दिवशी अवश्य करा हा सोपा उपाय, होतील सर्व आर्थिक समस्या दूर
माता लक्ष्मीImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 28, 2023 | 9:20 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित मानला जातो. तसेच शुक्रवार (Shukrawar Upay) हा दिवस लक्ष्मीच्या पूजेचा दिवस मानला जातो. शुक्रवारचा स्वामी शुक्र आहे. त्याचा स्वभाव राजेशाही मानला जातो. असे म्हणतात की ज्या लोकांच्या कुंडलीत शुक्राची स्थिती बलवान असते, त्यांना आयुष्यभर धन, सुख-समृद्धी मिळते. शुक्रवारी पूर्ण लाभ मिळण्यासाठी काही ज्योतिषीय उपाय लाभदायक मानले जातात.

शुक्रवारी अवश्य करा हे उपाय

माता लक्ष्मीला नमस्कार करा

ज्योतिष शास्त्रानुसार सर्व प्रथम शुक्रवारी उठून रोजच्या विधीनंतर स्नान करावे. यानंतर पांढरे वस्त्र परिधान करून लक्ष्मीची पूजा करावी आणि श्री सुक्त पाठ करावे. यासोबतच देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करायला विसरू नका.

आज, शुक्रवारी जर तुम्ही संपत्तीशी संबंधित कोणत्याही कामासाठी निघत असाल तर त्यापूर्वी गोड दही खा. हा उपाय केल्याने ते कार्य यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

काळ्या मुंग्यांना साखर खायला द्या

ज्या लोकांना कामात सतत अडथळा येत असेल त्यांनी शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घालावी. असे केल्याने सर्व रखडलेली कामे सुरळीत पार पडतात. तुम्ही हे पुण्य कार्य सलग 11 शुक्रवारपर्यंत करू शकता.

पती-पत्नीमध्ये सुरू असलेला दुरावा दूर करण्यासाठी शुक्रवारीही उपाय केले जाऊ शकतात. यासाठी शुक्रवारी तुमच्या बेडरूममध्ये पक्ष्यांच्या जोड्यांचे चित्र लावावे. असे केल्याने दोघांमधील प्रेम वाढू लागते.

कुमारीकांना अन्नदान करा

कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत करण्यासाठी शुक्रवारी 3 कुमारीकांना तुमच्या घरी बोलवा आणि त्यांना खीर खाऊ घाला. तसेच त्यांना दक्षिणा आणि पिवळे वस्त्र दान करा. असे म्हणतात की हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.