AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरुथिनी एकादशीला पडणार पंचकांची सावली, जाणून घ्या कोणत्या कर्मांनी मिळेल पुण्य

या वर्षी 13 एप्रिल रोजी वरुथिनी एकादशी पंचकाच्या प्रभावाखाली आहे. याच दिवशी पंचक काळही सुरू होतो. पंचक काळ शुभ कार्यांसाठी अशुभ मानला जातो. त्यामुळे नेमकी या एकादशीला कोणते कार्ये केल्याने पुजेचे फायदे मिळतील ते जाणून घेऊयात.

वरुथिनी एकादशीला पडणार पंचकांची सावली, जाणून घ्या कोणत्या कर्मांनी मिळेल पुण्य
Varuthini EkadashiImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Apr 11, 2026 | 10:38 AM
Share

सनातन धर्मात एकादशीचा उपवास अत्यंत विशेष मानला जातो. हा उपवास विश्वाचे रक्षक असलेल्या भगवान विष्णूला समर्पित आहे. प्रत्येक महिन्यात दोन एकादशीचे उपवास असतात. पहिला महिन्याच्या कृष्ण पक्षात आणि दुसरा शुक्ल पक्षात येतो. भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उपवास सर्वात शुभ प्रसंग आहे. अशातच वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला वरुथिनी एकादशी म्हणून ओळखले जाते.

तर या वरुथिनी एकादशीच्या दिवशी विहित विधींनुसार भगवान विष्णूचे उपवास आणि पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास आणि भगवान विष्णूची उपासना ही जाणूनबुजून किंवा नकळत केलेली सर्व पापे नष्ट करण्यासाठी केला जातो. मात्र यंदा ही वरुथिनी एकादशी पंचकाच्या प्रभावाखाली देखील येत आहे. वरुथिनी एकादशी १३ एप्रिल रोजी आहे. याच दिवशी पंचक काळ देखील सुरू होतो. तर हा पंचक काळ शुभ कार्यांसाठी अशुभ मानला जातो. म्हणून वरुथिनी एकादशीच्या दिवशी कार्ये करण्याचे फायदे आपण जाणून घेऊयात.

वरुथिनी एकादशी 2026 तारीख आणि उपवास वेळ

पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी तिथी 12 आणि 13 एप्रिल रोजी पहाटे 1 वाजून 16 मिनिटांनी सुरू होते. ते ही तिथी 13 आणि 14 एप्रिल रोजी पहाटे 1 वाजून 08 मिनिटांनी संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार वरुथिनी एकादशीचा उपवास 13 एप्रिल, 2026 रोजी पाळला जाईल. या एकादशीचा उपवास 14 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजून 5‍4 मिनिटांनी ते 8 वाजून 31 मिनिटांपर्यंत या वेळेत सोडता येईल.

पंचक म्हणजे काय?

हिंदू पंचांगानुसार नक्षत्राला घटक मानले गेले आहे. यामध्ये काही नक्षत्र शुभ तर काही अशुभ मानली जातात. ज्योतिष्यानुसार धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती ही पाच नक्षत्र एकत्र आल्याने अशुभ मानले जाते. नक्षत्रांच्या या स्थितीला पंचक असे म्हटले जाते. तसेच या पंचक काळात लग्न, गृहप्रवेश, नवीन बांधकाम, मुंडण संस्कार यांसारखी शुभ कामे करणे वर्ज्य मानले जाते. ऐवढेच नाहीतर या काळात मृत्यू होणे अशुभ मानले जाते.

एप्रिल 2026 वरुथिनी एकादशीच्या दिवशी सुरू होणारा पंचक काळ

वैदिक पंचांगानुसार पंचक 13 एप्रिल रोजी पहाटे 03वाजून 4‍4 मिनिटांनी सुरू होत आहे. ते 17 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजून 02 मिनिटांनी संपेल. हे पंचक सोमवारपासून सुरू होत असल्याने याला राजपंचक म्हटले जाईल.

वरुथिनी एकादशीला या गोष्टी केल्याने आशीर्वाद मिळतील

पंचक काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, परंतु या काळात पूजा आणि उपवास करण्यास मनाई नाही. म्हणून वरुथिनी एकादशीचा उपवास पूर्ण विधीपूर्वक पाळा आणि भगवान विष्णूची पूजा करा. या एकादशीला केलेल्या दान आणि पुण्यकर्मांचे फळ शाश्वत मिळते. म्हणून वरुथिनी एकादशीला आपल्या ऐपतीनुसार दान करा. पाण्याने भरलेले एक भांडे दान करा. गरीब आणि गरजू लोकांना भोजन द्या. त्यांना सुती कपडे दान करा. या सर्व कर्मांचे पुण्य अनेक पटींनी वाढेल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा