AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : विवाहित महिलांनी कधीच करू नये या चुका, अन्यथा घर बरबाद होतं

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण होणार्‍या विविध वास्तुदोषांवर उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार महिलांनी आपल्या लग्नानंतर काही गोष्टी करणं हे अशुभ मानलं जातं. त्याच गोष्टींबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : विवाहित महिलांनी कधीच करू नये या चुका, अन्यथा घर बरबाद होतं
Vastu ShastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 01, 2026 | 8:18 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा तुम्हाला विविध प्रकारच्या समस्या जाणवू लागतात. जसं की अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं, किवा काहीही कारण नसताना पती-पत्नीमध्ये भांडणं होतात. यावर वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकदा काहीही कारण नसताना पती-पत्नीमध्ये भांडणं होतात. जर पती-पत्नीचं पटत नसेल, दररोज भांडणं होत असतील तर भविष्यात परिस्थिती गंभीर बनू शकते. त्याचा परिणाम हा आपल्या मुलांवर देखील होतो. तर असं का होतं? यामागे नेमकं काय कारण असू शकतं? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? वास्तुशास्त्रानुसार जर शुक्रदोष निर्माण झाला तर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. शुक्रदोष नाहीसा करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

शुक्रदोष कधी निर्माण होतो?

वास्तुशास्त्रानुसार आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार शुक्र ग्रह हा सौंदर्याचा कारक ग्रह आहे. जेव्ह लग्न झालेल्या महिला आपली कोणतीही वस्तू जसं की लग्नाची अंगठी, किंवा आपली एखादी साडी, पायातील जोडवे अशा गोष्टी इतरांसबोत शेअर करतात, तेव्हा घरात शुक्रदोष निर्माण होतो. जेव्हा तुम्ही आपल्या वस्तू इतरांना देतात तेव्हा तुमच्या कुंडलीमधील शुक्र ग्रह हा कमजोर होतो. शुक्र ग्रह कमजोर झाल्यास तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे लग्न झालेल्या महिलांनी कधीही आपल्या वस्तू इतरांना देऊ नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

शुक्रदोषामुळे काय अडचणी येतात?

जर तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह कमजोर असेल तर काहीही कारण नसताना पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होत राहतात. घर सतत अशांत असतं. ज्या घरात सतत भांडणं होतात, त्या घरात कधीही पैसा टिकत नाही. घरातील बरकत चालली जाते. एवढंच नाही तर त्याचा परिणाम हा तुमच्या कामावर देखील होतो. जर घरात लहान मुलं असतील तर अशा भांडणांमुळे त्यांच्या मानसिक विकासामध्ये बाधा निर्माण होते. अचानक काही मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

काय उपाय करावेत?

घरात शुक्रदोष निर्माण होऊ नये यासाठी विवाहित महिलांनीच नाही तर कोणत्याही व्यक्तीने आपल्या वैयक्तिक गोष्टी जसं की रुमाल, दागिने किंवा इतर गोष्टी दुसऱ्याला वापरायला देऊ नयेत, कारण त्यामुळे शुक्रदोष निर्माण होतो. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला आपल्या वैयक्तिक गोष्टी वापरण्यास दिल्या तर त्याच्या आयुष्यात काही समस्या असतील तर त्याचा परिणाम हा तुमच्यावर देखील होऊ शकतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आपल्या वैयक्तिक गोष्टी शक्यतो इतरांना देणं टाळावं हा शुक्रदोषावरील उपाय आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?