.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : आयुष्यातील अडचणी संपतच नाहीयेत? मग शनिवारी शनी देवांशी संबंधित करा हे सोपे उपाय

कधी-कधी आयुष्यात असा प्रसंग येतो की, आपल्या पाठीमागच्या अडचणी संपतच नाही, एक झालं की दुसरं संकट येतं. यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : आयुष्यातील अडचणी संपतच नाहीयेत? मग शनिवारी शनी देवांशी संबंधित करा हे सोपे उपाय
shani devImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 28, 2026 | 9:29 PM
Share

आपल्या आयुष्यात असा एक काळ येते की आयुष्याच्या या टप्प्यावर आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी संपतच नाही. यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र जेव्हा घरात वास्तुदोष निर्माण होतो. जेव्हा शनीची साडेसाती सुरू असते, तेव्हा देखील असा वाईट काळ आपल्या आयुष्यात येऊ शकतो. आपल्या आयुष्यात येणारी संकट दूर व्हावेत आणि शनी देवांची कृपा सदैव आपल्यावर राहावी यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. शनी देवांना न्यायाची देवता म्हटलं जातं, जसं व्यक्तीचं कर्म असंत, तसं फळ शनी देव त्या व्यक्तीला देतात. म्हणून शनी देवांना कर्मफळ दाता देखील म्हटलं जातं. वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे शनी देव तुमच्यावर प्रसन्न होतील, तुमच्या पाठीमागचे सर्व संकट दूर होतील.

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी – जर तुम्हाला पैशांशी संबंधित समस्या येत असतील तर वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. एक रुपयाचं नाणं घ्या, त्याला मोहरीचं तेल लावा आणि तो रुपया शनी मंदिरात ठेवा, तसेच घराला आर्थिक स्थैर्य लाभावं यासाठी शनी देवांकडे प्रार्थना करा. या उपायामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतील, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

पती, पत्नी आजारी असेल तर – जर एखाद्या व्यक्तीचा पती किंवा पती सतत आजारी राहत असेल तर अशावेळी सत्तूचे पीठ तयार करावे, जी व्यक्ती आजारी आहेत, त्या व्यक्तीच्या हाताचा स्पर्श या पिठाला करावा आणि हे पीठ एखाद्या धर्मशाळेत किंवा गरजू व्यक्तीला दान करावे, या उपायामुळे संबंधित व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहतं, असा दावा वास्तुशास्त्रात करण्यात आला आहे.

पती -पत्नीमध्ये भांडणं होत असतील तर – जर पती पत्नीमध्ये सतत भांडण होत असतील तर यामुळे घर नेहमी अशांत राहतं. या भांडणाचा परिणाम हा तुमच्या मुलांवर देखील होतो. मुलांचा मानसिक विकास होत नाही, ते देखील सतत चिडचिड करतात, त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. एखाद्या शुद्ध जल स्त्रोताजवळ जा, एखादं तळं किंवा नदीवर देखील तुम्ही जाऊ शकता. तिथे तुमच्या हातात पाणी घ्या, तुमचं दाम्पत्य जीवन मजबूत व्हावं यासाठी वरून देवाकडे प्रार्थना करा आणि हे पाणी परत त्या जल स्त्रोतामध्ये सोडून द्या, हा उपाय दर शनिवारी केल्यास तुमची समस्या दूर होईल, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर