तुम्हालाही दारातच बूट आणि चप्पल काढण्याची सवय आहे? वास्तुशास्त्रानुसार घरावर याचे काय परिणाम होतात?
वास्तुशास्त्रानुसार, घराचं मुख्य प्रवेशद्वार पवित्र असते आणि त्यावर बूट-चप्पल ठेवल्याने काय होते? घरातील वातावरावर त्याचा काही परिणाम होतो का? चला जाणून घेऊयात.

वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टीची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. वास्तुशास्त्रानुसार घरात शांती आणि आनंद राखण्यासाठी प्रत्येक कोपऱ्याचे योग्य वास्तु असणे देखील फार महत्त्वाचे असते. काहीवेळेला आपण घरातील काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो किंवा वास्तुनुसार त्या गोष्टी खरोखरच तेवढ्या महत्त्वाच्या असू शकतात हे आपल्या लक्षात येत नाही. अशीच एक गोष्ट म्हणजे बूट आणि चप्पल काढणे.
घराच्या दारात किंवा उंबऱ्यावर चप्पल काढणे अशुभ असते का?
अनेकदा आपण हे ऐकलं असेल की घराच्या दारात किंवा उंबऱ्यावर चप्पल काढू नये. पण त्यामागचं कारण फार कमी जणांना माहित असेल. तर चला जाणून घेऊयात की नक्की त्यामागील कारण काय आहे ते.
घराच्या प्रत्येक खोली आणि कोपऱ्यासाठी वास्तुशी संबंधित काही नियम ठरलेले असतात. यापैकी एक म्हणजे मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवणे. सहसा घरांमध्ये असे दिसून येते की मुख्य दरवाजावर बरेच बूट आणि चप्पल काढून ठेवलेले असतात. वास्तुनुसार, असे करणे अजिबात योग्य मानले जात नाही.
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची वास्तू वाईट आहे.
खरंतर, असे मानले जाते की घराच्या मुख्य दारावर देवता वास करतात. तसेच, लक्ष्मी माता देखील येथूनच घरात प्रवेश करते. जर तुम्ही घराच्या मुख्य दारावर तुमचे बूट आणि चप्पल काढले तर हळूहळू अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. त्याच वेळी, राहूचा घरातील वातावरणावर आणि घरातील लोकांवर नकारात्मक परिणाम होऊ लागतो. वास्तुशास्त्रानुसार, अशा घरांमध्ये भांडणे होऊ लागतात. तसेच, हळूहळू घरातील लोक वारंवार आजारी पडू लागतात. जर असा दोष दूर करायचा असेल तर राहूवर उपाय केले पाहिजेत. तसेच, घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
तुमचे बूट योग्य ठिकाणी ठेवा
तुम्ही तुमचे बूट आणि चप्पल स्वच्छ करून शूज रॅकमध्ये ठेवू शकता. बाहेर घालवलेले बूट आणि चप्पल कधीही घरात आणू नका. ते व्यवस्थित स्वच्छ करा आणि शूज रॅकमध्ये ठेवा. ते दाराजवळ विखुरलेले ठेवू नका. ते घरात अशा ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा जिथे ते दिसत नाहीत.
