Vastu Shastra : ऑफिसच्या डेस्कवर कधीच नसावीत ही रोपं, प्रगतीमध्ये येतो अडथळा
अनेकदा आपण आपलं घर सुंदर दिसावं यासाठी घरात काही रोपं लावतो, त्याचप्रमाणे आपला डेस्क सुंदर दिसावा यासाठी आपण ऑफिसमध्ये देखील डेस्कवर काही रोपं ठेवतो, मात्र अशी काही रोप आहेत, जी तुमच्या डेस्कवर ठेवल्यावर अशुभ परिणाम देतात. जाणून घेऊयात वास्तुशास्त्र काय सांगतं? त्याबद्दल.

वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं असतात जी नेहमी आपल्याला शुभ परिणाम देतात, अशी झाडं किंवा रोपं आपण जेव्हा आपल्या घरात लावतो, किंवा ऑफिसमध्ये डेस्कवर ठेवतो, तेव्हा त्याच्यापासून सदैव सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या सकारात्मक ऊर्जेमुळे वास्तुदोष दूर होतो, तुमच्या प्रगतीमधील सर्व अडथळे दूर होतात, तुम्हाला अपेक्षित यश मिळतं. तसेच ही झाडं अध्यात्माच्या दृष्टीने देखील शुभ मानली जातात. मात्र अशी देखील काही झाडं असतात, जी घरात किंवा ऑफिसच्या डेस्कवर ठेवणं हे अशुभ मानलं जातं. अशा रोपांमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जर ही झाडं तुमच्या घरात असतील तर त्यामुळे तुमची आर्थिक प्रगती थंडावते, घरात काहीही कारण नसताना वाद होतात, एवढंच नाही तर आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात, तसेच ही रोपं जर तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर ठेवले तर त्यामुळे त्याचा तुमच्या कामावर परिणाम होतो, अपेक्षित यश मिळत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे, आज आपण अशाच काही झाडांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
निवडूंगाचं झाड – वास्तुशास्त्रानुसार निवडूंगाचं झाडं हे घरी किंवा ऑफिसमध्ये देखील नसावं, हे झाडं काटेरी असतं, काटेरी झाडं घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवणं अशुभ मानलं जातं, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम हा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर होतो. जर निवडूंगाचं झाड हे तुमच्या घरात असेल तर काहीही कराण नसताना भांडणं होतात, आर्थिक स्थिती स्थिर राहत नाही, आणि जर निवडूंगाचं झाडं हे तुमच्या ऑफिसच्या डेस्केवर असेल तर कामात अडथळे निर्माण होतात, असं वास्तुशास्त्र सांगतं.
बोन्साय केलेलं वृक्ष – घरात किंवा ऑफिसमध्ये कधीही बोन्साय केलेले वृक्ष ठेवू नका, वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानलं गेलं आहे. जर तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये बोन्साय केलेले वृक्ष किंवा रोप असतील तर त्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो, असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
