Vastu Tips : तुमच्याही देवघरात शंख आहे? मग या चुका टाळाच, जाणून घ्या वास्तुशास्त्र काय संगतं?
जर तुमच्या देवघरात शंख असेल तर काय काळजी घ्यावी? याबाबत अनेक नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत, त्यातील काही नियमांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

आपल्या जीवनात वास्तुशास्त्राचं खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार तुम्ही जेव्हा कोणतंही काम करता, ते काम जर तुम्ही वास्तुशास्त्रांचे सर्व नियम पाळून केलं तर त्याचं दुप्पट फळ मिळतं, अशी मान्यता आहे. तुमच्या घरात वास्तुदोष असेल किंवा तुम्ही जर एखादं काम करताना वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचं व्यवस्थित पालन केलं नाही तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते, तुम्ही जे काम करणार आहात त्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. मात्र तुम्ही जे काम करणार आहात, त्या कामापूर्वी वास्तुशास्त्राचे नियम लक्षात घेतल्यास घरात सरकारात्मक ऊर्जा निर्माण होते, आणि याच सकारात्मक ऊर्जेचा परिणाम हा तुमचं काम पूर्ण करण्यास मदत करतो. तुम्ही जर तुमच्या देवघरात शंख ठेवला असेल तर त्याच्याशी संबंधीत नियम काय आहेत? आणि देवघरात शंख ठेवताना काय काळजी घ्यावी? याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
देवघरात ठेवलेला शंख हा फक्त पूजा करतानाच वाजवा – वास्तुशास्त्रानुसार ज्या शंखाचा उपयोग हा पूजेसाठी केला जातो किंवा तो तुमच्या देवघरात आहे, असा शंख हा केवळ पूजा करतानाच त्याचा शंखनाद करावा, कारण नसताना आणि केव्हाही हा शंख वाजवू नये, यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात.
शंखाची साफ सफाई – तुम्ही तुमच्या देवघरात जो शंख ठेवला आहे, तो नेहमी स्वच्छ ठेवा, त्याची नियमित स्वच्छता करा, पाण्यात गंगेचं पाणी मिसळून नंतर या शंखाची स्वच्छता करा.
शंख जमिनीवर ठेवू नका – वास्तुशास्त्रानुसार शंख कधीही जमिनीवर ठेवू नये, त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
शंखाचं मुख – वास्तुशास्त्रानुसार देवघरात शंख ठेवताना नेहमी त्याचं मुख वरच्या दिशेला ठेवावं, त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
शंखाची दिशा – देवघरात शंख कोणत्या दिशेला ठेवावा? हे देखील वास्तुशास्त्रात सांगितलं आहे, वास्तुशास्त्रानुसार देवघरात शंख देखील त्याच दिशेला ठेवा ज्या दिशेला तुमचं देवघर आहे. तुम्ही उत्तर -पश्चिम दिशेला देखील शंख ठेवू शकता. जर तुम्ही वास्तुशास्त्रांच्या या नियमांचं पालन केलं तर तुमच्या घरात धनाचा वर्षाव होईल, माता लक्ष्मीची कृपा नेहमी तुमच्यावर राहील असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
