AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : घरातील या तीन जागांवर चुकूनही ठेवू नका पैसे, व्हाल कर्जबाजारी

अनेकदा आपल्यासोबत असं होतं, की आपण खूप कष्ट करतो, प्रचंड पैसा कमावतो परंतु तो आपल्या हातात टिकत नाही? यावर देखील वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastu Tips : घरातील या तीन जागांवर चुकूनही ठेवू नका पैसे, व्हाल कर्जबाजारी
Image Credit source: social media
| Updated on: Aug 14, 2025 | 5:58 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या वास्तु अर्थात घराशी संबंधित शुभ-अशुभ विचार सांगितले आहेत. हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. धर्मशास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार नसेल तुमच्या आयुष्यात अनेक संकटं येऊ शकतात. जसं की अकस्मात धन हानी, वारंवार आजारी पडणे यासारख्या समस्या तुमच्या आयुष्यात येऊ शकतात.

वास्तुशास्त्रामध्ये तुमचं घर कसं असावं? तुमच्या घराची रचना कशी असावी? स्वयंपाक घर, बेडरूम, देवघर यांची दिशा कोणती असावी? घराच्या मुख्य दरवाजाचं तोंड कोणत्या दिशेला असावं? यासारख्या अनेक गोष्टी सांगितल्या आहोतच, सोबतच घारत कोणत्या गोष्टी ठेवणं शुभ आहे? कोणत्या गोष्टी अशुभ आहेत? हे देखील सांगतिलं आहे.

दरम्यान अनेकदा आपल्यासोबत असं होतं, की आपण खूप कष्ट करतो, प्रचंड पैसा कमावतो परंतु तो आपल्या हातात टिकत नाही? यावर देखील वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार घरात अशा तीन जागा असतात जिथे पैसै कधीही ठेवू नये, ज्यामुळे तुम्ही कर्जबाजारी होण्याची शक्यता असते. जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगीतलं आहे.

अंधारी जागा – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराचा असा भाग जिथे सतत अंधार असतो अशा ठिकाणी तुम्ही चुकूनही तिजोरी ठेवू नका, त्यामुळे तुमच्या घरात पैसा टिकत नाही.

शौचालयाला लागून असलेली भिंत – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जिथे शौचालय आहे, त्याला लागून असलेल्या भिंतीच्या शेजारी कधीही तिजोरी ठेवू नये, ते अशुभ मानलं जातं.

दक्षिण दिशा – वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते, त्यामुळे दक्षिण दिशेला तिजोरी ठेवणं अशुभ मानलं गेलं आहे.

तिजोरी ठेवण्यासाठी उत्तम जागा कोणती? 

वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही ऊर्जेची आणि धनाची दिशा असते, तुम्ही तुमची तिजोरी उत्तर दिशेला ठेवू शकतात,

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बापरे! थेट पूलच कोसळला, खडीने भरलेला ट्रक दरीत, पण ड्रायव्हर...
Video | बापरे! थेट पूलच कोसळला, खडीने भरलेला ट्रक दरीत, पण ड्रायव्हर...
लोकलचा दरवाजा बंद कर म्हणणं जीवावर बेतलं! 22 वर्षीय तरुणाची चाकूने....
मोठी बातमी! लोकलचा दरवाजा बंद कर म्हणणं जीवावर बेतलं! 22 वर्षीय तरुणाची चाकूने हत्या, नेमकं घडलं काय?
पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच
पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच भयंकर घडलं...
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! कुर्ला-सायनमध्ये पाण्यामुळे वाहतूक कोलम
Mumbai Rain Traffic | पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! कुर्ला-सायनमध्ये पाण्यामुळे वाहतूक कोलमडली
टीका, ट्रोलिंग अन् राजकीय गदारोळ; वाद वाढताच नार्वेकरांनी मागितली माफी
Rahul Narvekar | टीका, ट्रोलिंग अन् राजकीय गदारोळ; वाद वाढताच राहुल नार्वेकरांनी मागितली माफी, जे घडलं ते चुकीचं...
अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का?
अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का? बड्या नेत्याचं ते तुफान विधान चर्चेत
ते नार्वेकर नाही, नॉर्वेकर! राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल
Sanjay Raut UNCUT | ते नार्वेकर नाही, नॉर्वेकर! संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल, थेट पदावरून...
तर मी पेपरवेटच फेकून मारला असता; संजय राऊतांचं थेट विधानसभा अध्यक्ष...
Sanjay Raut | तर मी पेपरवेटच फेकून मारला असता; संजय राऊतांचं थेट विधानसभा अध्यक्षांबाबत खळबळजनक विधान
मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या...
CM Fadnavis | मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या आंदोलनानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार, नेमकं काय घडलं?
लोकल लेट, रस्ते जाम! मुसळधार पावसाने मुंबईकरांची सकाळ केली बेहाल
Railway Updates | लोकल लेट, रस्ते जाम! मुसळधार पावसाने मुंबईकरांची सकाळ केली बेहाल