तरुणी असो की पुरुष… घरात भाडेकरूची खोली कुठे असावी?; वास्तू शास्त्रातील ही गोष्ट अत्यंत खास
Vastu Tips: वास्तूशास्त्रामध्ये दिशेला खूप महत्त्व दिले आहे. घर बनवताना किंवा कोणतीही नवीन जागा घेताना तिथे असलेली वास्तू, दिशा यांचा अभ्यास केला जातो. त्याचो मुख्य कारण म्हणजे जर कोणतीही वस्तू किंवा ठिवाण योग्य दिशेला किंवा योग्य ठिकाणी नसेल तर त्याचा तुमच्या आयुष्यावर आणि कामांवर परिणाम होण्याची शक्यता असते.

वास्तूशास्त्रामध्ये प्रत्येक दिशेला स्वत:चे विशेष महत्त्व आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण हे चार मुख्य दिशा आहेत. वास्तूशास्त्रामध्ये, या चार दिशांव्यतिरिक्त, दोन मुख्य दिशांमध्ये असलेल्या चार उप-दिशांविषयीच्या श्रद्धा आहेत, ज्यांना ईशान, अग्नि, नैरुत्य आणि वायव्य असे म्हणतात. वास्तुमध्ये आठ दिशांना विशेष महत्त्व आहे, ज्यामध्ये चार मुख्य दिशा आणि चार उपदिशांचा समावोश आहेत. पूर्व आणि उत्तर यांच्यामधील दिशेला ईशान्य कोपरा म्हणतात, तसेच पूर्व आणि दक्षिण यांच्यामधील दिशेला आग्नेय कोपरा म्हणतात, श्चिम आणि दक्षिण यांच्यामधील दिशेला नैऋत्य दिशा म्हणतात आणि पश्चिम आणि उत्तर यांच्यामधील दिशेला वायव्य दिशा म्हणतात. ज्याप्रमाणे ग्रह आकाशावर राज्य करतात, त्याचप्रमाणे ग्रह तुमच्या घरातही राहतात.
तुम्हाला माहिती आहे का? ग्रह घरात आपापल्या दिशेने राज्य करतात, म्हणून, ग्रहांच्या नकारात्मक प्रभावांपासून दूर राहण्यासाठी, घर बांधताना चारही दिशा आणि चार कोपऱ्यांची रूपरेषा तयार करावी. जर वायव्य किंवा वायव्य कोपऱ्यात वास्तुदोष असेल तर चंद्र प्रभावित होतो कारण चंद्र वायव्य दिशेचा स्वामी मानला जातो. जर या कोपऱ्यात वास्तुदोष असेल तर मुलाच्या लग्नात विलंब होतो आणि तुमच्या शेजाऱ्यांशी जास्त भांडणं देखील होतात.
वास्तूशास्त्रानुसार, जर तुमच्या घरातील किंवा कामाच्या ठिकाणी वायव्य दिशेमध्ये वास्तूदोष निर्माण झाला असेल तर तुम्ही तुमच्या भाडेकरूंकढून जास्त भाड्याची वसूली करू शकता. त्याच प्रमाणे ज्या वस्तूची विक्री कमी प्रमाणात होत असेल तर ती वस्तू तुमच्या घरातील किंवा कामाच्या ठिकाणाती वायव्य दिशेला ठेवावीत. यामुळे त्या वस्तूच्या विक्रीवर सकाराचत्मक परिणाम होतो आणि त्या वस्तूला लवकर विकायला सुरूवात होते. त्याचप्रमाणे, ज्या मुलींच्या लग्नात अडथळे येत आहेत त्यांना घराच्या वायव्य दिशेतील खोलीमध्ये राहाण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्यास त्या मुलीचे लग्न लवकर होण्यास मदत होते. त्ययासोबतच, जर तुमच्या कुंडलीमध्ये परदेश प्रवासाची शक्यता असेल आणि त्या कामांमध्ये अडथळे येत असतील तर त्या व्यक्तीनं वायव्य दिशेला झोपणे फायदेशीर ठरू शकते. वास्तूशास्त्रानुसार, वायव्य दिशेला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
तुमच्या घरातील सर्व वस्तू वास्तूशास्त्राप्रमाणे ठेवणे फायदेशीर ठरते. तुमच्या घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी त्याची स्वच्छता राखणे महत्त्वाचे असते. जर संध्याकाळी दिवे लागण्यापूर्वी घरातील केर काढला नाहीत किंवा घरामधील वस्तू योग्य जागेवर ठेवली नाहीत तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी देवीचा वास राहात नाही. त्यासोबतच तुमच्या घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात आणि घरातील वातावरण दूषित होतं. त्यामुळे संध्याकाळी घर स्वच्छ करूण देवा समोर दिवा लावा आणि त्यानंतर गायत्री मंत्राचा जप करा. यामुळे घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते त्यासोबतच घरामधील वातावरण प्रसन्न आणि शांत राहाते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
