Vastu Tips : घरात लावा फक्त हे 4 फोटो, नशीब घोड्यासारखं धावेल, वास्तुशास्त्र काय सांगतं?
अशा काही प्रतिमा, छायाचित्र आहेत, जे घरात लावणं शुभ मानलं गेलं आहे, वास्तुशास्त्रात अशा अनेक छायाचित्रांबद्दल माहिती देण्यात आली आहे, त्यातीलच काही प्रतिमा आणि छायाचित्रांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

आपल्या घरात सुख शांती राहावी, घर स्थिर राहावं आणि घरात पैशांचा ओघ सुरू राहावा, कोणतंही आर्थिक संकट आपल्यावर येऊ नये, कुटुंबातील सर्व लोकांचं आरोग्य उत्तम असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी अनेक जण विविध उपाय करत असतात. काही जण आपल्या घरात विशिष्ट प्रकारचे झाडं लावतात तर काही जण आपल्या घराच्या भिंतीवर विविध प्रकारच्या प्रतिमा लावतात. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घरात ज्या प्रतिमा लावतात त्या फक्त सजावटी पर्यंतच मर्यादीत नाहीत, तर त्या प्रतिमांचा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यावर सकारात्मक आणि नकारात्मक असा दोन्ही प्रकारचा प्रभाव पडत असतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. आज आपण अशा काही फोटो आणि प्रतिमांबद्दल माहिती घेणार आहोत, ज्या घरात लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. अशा प्रतिमांमुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन, सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते.
घोड्याची प्रतिमा – वास्तुशास्त्रामध्ये पळत असलेल्या सात घोड्यांच्या प्रतिमेला अत्यंत शुभ मानलं गेलं आहे, ही प्रतिमा ऊर्जा, प्रगती आणि गती यांचं प्रतिक आहे. घराच्या दक्षिण दिशेला ही प्रतिमा लावल्यास त्याचा अधिक चांगला प्रभाव हा आपल्या घरात दिसून येतो. मात्र अशी पेंटिग खरेदी करताना एक गोष्ट आवश्य लक्षात ठेवा, या प्रतिमेमधील घोडे हे पांढऱ्या रंगाचे पाहिजे, तसेच ते सर्व एकाच दिशेनं धावत आहेत, असं दिसलं पाहिजे. या प्रतिमेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असा दावा वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आला आहे.
निसर्गाचं छायाचित्र – वास्तुशास्त्रानुसार निसर्ग चित्र जसं, डोंगर, वाहता झरा, सूर्योदय, किंवा हिरवीगार शेतं अशी छायाचित्र घरात लावल्यास घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात सकारात्मक ऊर्जा राहते. निसर्ग चित्रांना सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत माण्यात आलं आहे. अशी छायाचित्र बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये लावावीत, उगवत्या सूर्याचं छायाचित्र हे सर्वात शुभ मानलं जातं, कारण हे छायाचित्र नव्या सुरुवातीचं आणि प्रगतीचं प्रतिक माण्यात आलं आहे.
पक्ष्यांची छायाचित्र – घरात पक्ष्यांची छायाचित्र लावणं देखील शुभ मानलं गेलं आहे, खास करून बेडरूममध्ये हंसाच्या जोडीचं छायाचित्र लावावं, यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम वाढंत असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.
देवी, देवतांचे छायाचित्र – घरामध्ये देवी -देवतांची छायाचित्र लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. मात्र अशी छायाचित्र लावताना ती दक्षिण दिशेला लावली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी, शक्यतो देवी -देवतांची छायाचित्र हे पूर्व दिशेलाच लावावीत.
