Vastu tips | अहो काय सांगताय , नवीन कपडे घालण्यासाठी सुद्धा आहेत वास्तु नियम, जाणून घ्या रंजक माहिती

Vastu tips | अहो काय सांगताय , नवीन कपडे घालण्यासाठी सुद्धा आहेत वास्तु नियम, जाणून घ्या रंजक माहिती
clothes

माणसाचा पेहराव त्याला नविन ओळख निर्माण करुन देतो.समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी लोक चांगले कपडे (New Clothes) घालण्याचा प्रयत्न करतात . ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने कपडे खरेदी करताना किंवा परिधान करताना काही महत्त्वाचे नियम लक्षात ठेवले पाहिजेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 25, 2022 | 10:46 PM

मुंबई : माणसाचा पेहराव त्याला नविन ओळख निर्माण करुन देतो.समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी लोक चांगले कपडे (New Clothes) घालण्याचा प्रयत्न करतात . ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने कपडे खरेदी करताना किंवा परिधान करताना काही महत्त्वाचे नियम लक्षात ठेवले पाहिजेत. उदाहरणार्थ, नवीन कापड कोणत्या दिवशी घ्यायचे आणि कोणत्या रंगाची खरेदी करायची. नवीन कापड खरेदी केल्यानंतर ते परिधान करण्याचे नियम ज्योतिषशास्त्रात दिले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत ते नियम.

ज्योतिष शास्त्रानुसार नवीन कपडे खरेदी करण्यासाठी शुक्रवार हा दिवस सर्वात शुभ मानला जातो. असे मानले जाते की शुक्रवारी विकत घेतलेले कपडे भरपूर पैसे घेऊन येतात. त्याचप्रमाणे शनिवारी नवीन कपडे खरेदी करणे टाळावे.

ज्योतिष शास्त्रानुसार ज्याप्रमाणे नवीन कपडे खरेदी करण्याचा दिवस निश्चित असतो, त्याचप्रमाणे कपडे घालण्याचे आणि न घालण्याचे सविस्तर सांगितले आहे. असे मानले जाते की सोमवार, बुधवार आणि गुरुवार नवीन कपडे घालणे खूप शुभ मानले जाते.

विसरुनही मंगळवारी नवीन कपडे घालू नयेत. असे मानले जाते की मंगळवारी नवीन कपडे परिधान केल्याने व्यक्तीमध्ये राग आणि तणाव वाढण्याची शक्यता असते. नवीन कपडे घालायचे असल्यास, मंगळवारप्रमाणे, शनिवार आणि रविवारी देखील ते परिधान करणे टाळावे.

जर तुम्हाला रविवारी, मंगळवार किंवा शनिवारी नवीन कपडे घालून कुठे जायचे असेल तर त्यासाठी सोमवार, बुधवार किंवा गुरुवारी एकदा नवीन कपडे घाला आणि मग तुमच्या आवडीच्या दिवशी घाला.

ज्योतिष शास्त्रानुसार कधीही फाटलेले किंवा जळलेले कपडे घालू नयेत. ज्योतिष शास्त्रानुसार फाटलेल्या कपड्यांमध्ये राहूचा अशुभ प्रभाव असतो.

ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुम्हाला धनदेवतेचा आशीर्वाद मिळवायचा असेल, तर घाणेरडे किंवा एकदा वापरलेले कपडे न धुता पुन्हा घालू नका.

ज्योतिष शास्त्रानुसार नेहमी स्वच्छ आणि इस्त्री केलेले कपडे घालावेत.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

Somavati Amavasya 2022 | सोमवती अमावस्येची आख्यायिका काय? जाणून घ्या पूजेची पद्धत

Debt Relief | आज चुकूनही कर्ज घेऊ नका, नाहीतर तुमच्यावर संक्रांत आलीच म्हणून समजा

Vastu Tips | तणाव दूर करणारा पारिजात, जाणून घ्या ओंजळीभर प्राजक्ताच्या फुलांची कमाल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें