Marathi News » Photo gallery » Vastu Tips in hindi Plant Harsingar plant in house for Maa Lakshmi blessings know more
Vastu Tips | तणाव दूर करणारा पारिजात, जाणून घ्या ओंजळीभर प्राजक्ताच्या फुलांची कमाल
प्राजक्ताच्या फुलांना पारिजात असेही म्हणतात. सामान्यतः लोक पूजेसाठी प्राजक्ताच्या फुलांचा वापर करतात. पारिजात या झाडाला वास्तुशास्त्रात खूप महत्त्व आहे.
प्राजक्ताच्या फुलांना पारिजात असेही म्हणतात. सामान्यतः लोक पूजेसाठी प्राजक्ताच्या फुलांचा वापर करतात. पारिजात या झाडाला वास्तुशास्त्रात खूप महत्त्व आहे. चला जाणून घेऊया पारिजात रोप लावण्याचे फायदे.
1 / 5
तुम्ही घरी पारिजात रोप लावू शकता. वास्तुशास्त्रानुसार जिथे हे झाड असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. पारिजातामुळे घरात सुख-समृद्धी येते. ही वनस्पती वास्तुदोष दूर करते.
2 / 5
वास्तुशास्त्रानुसार ही वनस्पती नकारात्मकता दूर करते. जिथे ही वनस्पती आहे तिथे सकारात्मक उर्जेचा संचार होतो. पारिजात फुलांच्या सुगंधाने मन शांत होते आणि मानसिक तणाव दूर होतो.
3 / 5
प्राजक्ताची फुले रात्रीच उमलतात. त्याची फुले सकाळी कोमेजतात. अंगणात ही फुले जिथे उमलतील तिथे सदैव सुख-शांती नांदते. याच्या फुलाचा सुगंध जीवनातील तणाव दूर करतो. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते.
4 / 5
पौराणिक कथेनुसार पारिजात वृक्षाची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाली. देवी लक्ष्मीला पारिजातची फुले अर्पण करा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सदैव वास करते.