AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हातातून या वस्तूंचे पडणे मानले जाते अशुभ, देते आर्थिक संकटाचा इशारा

शास्त्रानुसार हातातून काही वस्तू पडणे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की या गोष्टी व्यक्तीच्या आगामी वाईट काळाकडे निर्देश करतात. तुमच्या हातूनही अशी काही वस्तू पडली तर लगेच सावध व्हा.

हातातून या वस्तूंचे पडणे मानले जाते अशुभ, देते आर्थिक संकटाचा इशारा
अपशकुनImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: May 15, 2023 | 9:33 PM
Share

मुंबई : अनेकदा आपण घाईत असतो आणि वस्तू आपल्या हातातून निसटून पडतात. ही गोष्ट अगदी सामान्य असली तरी वास्तुशास्त्रात ती अशुभ मानली जाते. हातातून वस्तू पडणे हे येऊ घातलेल्या संकटाचे लक्षण आहे असे म्हणतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. ज्योतिष शास्त्रानुसार या गोष्टी हातातून पडणे हे अशुभ लक्षण आहे, ते तुम्हाला अचानक येणा-या संकटांचा इशारा देत आहेत. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याचे पडणे वास्तुशास्त्रात (Vastu Shastra) अशुभ मानले जाते.

मीठ

आपल्या जीवनात मीठ खूप महत्वाचे आहे. मिठाचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठीच केला जात नाही, तर त्याचा नशिबाशीही खोलवर संबंध आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र आणि शुक्र या ग्रहांचे प्रतिनिधी मानले जाते. म्हणूनच असं म्हणतात की हातातून मीठ पडलं तर ते अशुभ लक्षण आहे. म्हणजे आयुष्यात संकटे येणार आहेत.

दूध

दूध हा चंद्राचा कारक आहे. गॅसवर ठेवलेले दूध उकळले आणि सांडले किंवा दुधाचा ग्लास हातातून पडला तर ते चांगले मानले जात नाही. असे म्हटले जाते की दुधाची गळती आर्थिक संकट दर्शवते.

काळी मिरी

काळी मिरी हातातून पडणे हे अशुभ लक्षण मानले जाते. हातातून काळी मिरी पडली आणि विखुरली तर नात्यात दुरावा येतो, असं म्हणतात. हातातून काळी मिरी पडल्याने नकारात्मकता वाढते.

तृणधान्ये

अन्न खाताना किंवा वाढतांना धान्य पडणे अशुभ आहे असे म्हणतात. जेवतांना हातातून अन्नपदार्थ पडल्यास अन्नपूर्णा देवी माता लक्ष्मीचा अपमान होतो. हे घरातील गरिबी दर्शवते.

तेल

वास्तुशास्त्रात तेल सांडणे हे अशुभ लक्षण आहे. तेल हे शनिदेवाचे प्रतिक आहे असे म्हणतात. त्यामुळे हातातून तेल वारंवार पडणे हे धनहानी होण्याचे लक्षण आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?