Vijaya Ekadashi 2022 | कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी विजया एकादशीच्या दिवशी व्रत नक्की करा, जाणून घ्या या दिवसाची महती

विजया एकादशीचे व्रत शत्रूंवर विजय मिळवून देणारे आहे. असे म्हणतात की या व्रताचे महत्त्व भगवान कृष्णाने स्वतः युधिष्ठिराला सांगितले होते, त्यानंतर महाभारताचे युद्ध पांडवांनी जिंकले होते.

Vijaya Ekadashi 2022 | कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी विजया एकादशीच्या दिवशी व्रत नक्की करा, जाणून घ्या या दिवसाची महती
lord-vishnu
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 2:03 PM

मुंबई : शास्त्रात एकादशीचे (Ekadashi) व्रत फार महत्वाचे मानले जाते. असे मानले जाते की, हे व्रत माणसाच्या पापांचे निराकरण करते आणि त्याचे जीवनात मोक्ष (Moksh) मिळवून देते. एकादशी व्रत दर महिन्याला दोनदा ठेवले जाते. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व असते. (Vijaya Ekadashi 2022) विजया एकादशीचे व्रत ठेवल्यास एखाद्याला पूर्वीच्या आणि या जन्माच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. तुमच्या आयुष्यात अशाच काही समस्या असल्यास आणि बर्‍याच प्रयत्नांनंतरही तुमचे काम बिघडत असेल, तर तुम्ही विजया एकादशीच्या व्रतासोबत काही उपाय देखील केले पाहिजेत , असे शास्त्रात सांगितले आहे.

प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षांतील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधिली जाते. विष्णूची अत्यंत प्रिय तिथी, अशी तिची प्रसिध्दी आहे. वैष्णव, शैव, सौर आदी सर्व हिंदूंना व विशेषत: सर्व विष्णुभक्तांना एकादशी हे व्रत करावयास सांगितले आहे. नित्य व काम्य असे हे उभयविध व्रत आहे. व्रतविषयक सामान्य नियम यालाही लागू आहेत. एकादशीच्या बाबतीत ‘स्मार्त’ व ‘भागवत’ असे दोन संप्रदाय आहेत. ही तिथी दिनद्वयव्यापिनी असल्यास द्वादशीविद्धा वैष्णवांकरिता विहित आहे. या संबंधीचे सूक्ष्म विवेचन निर्णयसिंधुत केलेले आहे. प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून २४ एकादश्या येतात.

शुक्ल पक्षातील एकादश्यांची नावे : कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, पुत्रदा, जया व आमलकी. कृष्ण पक्षातील : वरूथिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, उत्पत्ती, सफला, षट्‌तिला, विजया व पापमोचनी. अधिक मासातील दोन्ही एकादश्यांना कमला असे नाव आहे.

विशिष्ट कामात यश मिळवण्यासाठी सकाळी स्नानानंतर सूर्याला गंगेचे पाणी अर्पण करा. यानंतर श्री राम परिवाराची पूजा करा. अकरा-अकरा केळी, लाडू, लाल फुले अर्पण करा. अकरा चंदन अगरबत्ती, धूप आणि दिवे प्रज्वलित करा. अकरा खजूर आणि बदाम अर्पण करा. यानंतर ‘ॐ सिया पतिये राम रामाय नमः’ या मंत्राचा जप करावा.

व्रताची आख्यायिका लंकापती रावणावर विजय मिळवण्यापूर्वी, श्रीरामांनी स्वतः विजया एकादशीचे व्रत ठेवले होते. त्याच वेळी भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिराला या व्रताचा महिमा सांगितला होता, त्यानंतर युधिष्ठिराने हे व्रत ठेवले. यानंतर महाभारताचे युद्ध पांडवांनी जिंकले. द्वापरयुगात धर्मराज युधिष्ठिराला फाल्गुन एकादशीचे महत्त्व जाणून घेण्याची उत्सुकता होती. भगवान कृष्णाकडे आपली इच्छा त्याने प्रकट केली. मग, भगवान श्रीकृष्णाने त्याला फाल्गुन एकादशीचे महत्त्व व कथा सांगितली.

जेव्हा, सीतेच्या हरणानंतर भगवान श्रीरामांनी सुग्रीवाची सेना रावणाशी लढायला नेली आणि लंकेच्या दिशेने गेले तेव्हा विशाल समुद्राने लंकेच्या पुढे मार्ग अडवला. समुद्रामध्ये खूप धोकादायक समुद्री प्राणी होते, ज्यामुळे मर्कट सैन्यास हानी पोहोचू शकते. श्री राम मानवी स्वरुपाचे होते, त्याचप्रकारे त्यांना ही समस्या सोडवायची होती.

जेव्हा, त्यांना लक्ष्मणकडून समुद्र पार करण्याचा मार्ग जाणून घ्यायचा होता, तेव्हा लक्ष्मण म्हणाले की, तुम्ही सर्वज्ञानी आहात. प्रभु, तुम्हाला जर हे जाणून घ्यायचे असेल, तर मला वाटते की येथून काही अंतरावर वकदलभ्य मुनिचे वास्तव्य आहे, त्यांच्याकडे यावर नक्कीच काही उपाय असतील.

त्यावेळी भगवान श्री राम त्यांच्याकडे पोहोचले. त्यांच्यासमोर मांडली. मग, ऋषींनी त्यांना सांगितले की, जर आपण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला तुमच्या सेनेसह व्रत ठेवले, तर सर्व सैन्यासह आपण समुद्र पार करू शकाल.तसेच, यामुळे आपल्याला लंकेवर विजय मिळेल. ऋषीच्या सांगण्यानुसार भगवान राम आणि त्यांच्या सेनेने हे व्रत केले आणि त्याचे इच्छित फळ त्यांना मिळाले.

(टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही.)

संदर्भ : मराठी विश्वकोश

संबंधीत बातम्या :

निर्मला श्रीवास्तव ते श्री माताजी पर्यंत 98 वर्षांचा प्रेरणादायी प्रवास, अध्यात्म गुरू निर्मला श्रीवास्तव स्मृती दिन

Gajanan Maharaj Revealed Day 2022 ‘गण गण गणात बोते’ अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराज प्रगट दिन

Anganewadi Bharadi Devi jatra : येवा कोंकण आपलोच आसा , 24 फेब्रुवारीला आंगणेवाडी भराडी देवी यात्रा सुरु , ‘अशी’ असेल नियमावली

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.