घर, दुकानाबाहेर लिंबू-मिरची का लावतात? अंधश्रद्धा नाही तर…,ही आहेत खरी कारणे; जाणून आश्चर्य वाटेल
बहुतेक लोकांचा असा विश्वास असतो की घर, दुकानला लावलेल्या लिंबू-मिरचीमुळे नाकारात्मक उर्जा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. घर, दुकान आणि वाहनाला कोणाचीही वाईट नजर लागत नाही. पण याचा फक्त एक अध्यात्मिक कारण नाहीये तर त्याचे वैज्ञानिक कारण देखील आहे. चला जाणून घेऊयात.

अनेकदा लोकांच्या घराच्या, दुकानाच्या किंवा वाहनाच्या मागे काळ्या धाग्याने काही हिरव्या मिरच्या आणि लिंबू लटकलेले पाहिले असेल. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की असे केल्याने घर, दुकान आणि वाहनाला कोणाचीही वाईट नजर लागत नाही. पण ही फक्त अंधश्रद्धा आहे का? जर आतापर्यंत तुम्ही लिंबू मिरच्या लटकवण्यामागे हेच कारण मानत असाल तर त्याचे अध्यात्मिक कारण नाही तर वैज्ञानिक कारणही आहे. घराच्या आणि दुकानाच्या बाहेर लिंबू मिरची लटकवण्यामागे अंधश्रद्धा नाही तर विज्ञानाशी संबंधित कारणे आहेत.
घर आणि दुकानाबाहेर लिंबू आणि हिरव्या मिरच्या लटकवण्यामागील खरे कारण
जुन्या काळात जेव्हा डास आणि कीटकांना दूर ठेवण्यासाठी कोणतेही स्प्रे नव्हते किंवा कोणतीही पावडर नव्हती, तेव्हा लिंबू-मिरचीचा वापर नैसर्गिक कीटकनाशक म्हणून केला जात असे. होय, लिंबू आणि मिरची दोन्हीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण चांगले असते, जे बॅक्टेरिया मारण्यास मदत करते. लिंबूचा तीव्र आंबट वास आणि मिरचीमध्ये असलेले तिखट ‘कैप्साइसिन’ एकत्रितपणे रस सोडतात, ज्याचा वास कीटक आणि डासांना दूर ठेवतो. तेव्हापासून ही परंपरा सुरुच आहे म्हणूनच घर आणि दुकानांबाहेर लिंबू-मिरची आजही टांगली जाते.
हवा साफ ठेवण्यासाठी देसी जुगाड़
लिंबू आणि मिरची दोघांनाही तीव्र वास असतो. जो हवेत विरघळतो आणि आजूबाजूचा हा गंध पसरतो त्यामुळे बॅक्टेरिया आणि येणारा आजुबाजूचा घाण वास स्वच्छ करण्यास मदत करतो. एअर फ्रेशनर म्हणून लिंबू-मिरची वापरण्याची ही एक सोपी अन् गुणकारी पद्धत मानली जाते.
ओलावा आणि बुरशी कमी करण्यासाठी
लिंबू आणि मिरची हवेतील काही ओलावा शोषून घेताता त्यामुळे ओल्याव्यामुळे पसरणारी बुरशी आणि जीवाणू वाढू देत नाहीत. तसेच तेथील पृष्ठभागांना कोरडे ठेवण्यास मदत करतात. यामुळे या सूक्ष्मजीवांची वाढ मंदावण्यास मदत होते.
वैज्ञानिक कारणे
लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हा लिंबू आणि मिरची सुकतात तेव्हा ते वाईट नजरेला स्वत:वर घेतात. त्यामुळे आपल्यावर आलेले संकट दूर जातं. म्हणून ते ताबडतोब बदलले पाहिजेत असही म्हणतात. पण प्रत्यक्षात हे एक नैसर्गिक लक्षण किंवा कारण आहे की, लिंबू आणि मिरचीचा प्रभाव कमी झाला की ते सुकतं त्यामुळे ते बदलणे गरजेचं असतं.
अध्यात्मानुसार जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी
बहुतेक लोक वाईट नजर आणि नकारात्मक उर्जेचा प्रवेश रोखण्यासाठी त्यांच्या घराबाहेर किंवा दुकानाबाहेर लिंबू आणि 7 मिरच्या ठेवतात. असे केल्याने घरात शांती राहते असे त्यांचे मत आहे. पण लिंबूसोबत 7 मिरच्या ठेवण्याचे एक वेगळेच कारण आहे. नकारात्मक उर्जेपासून दूर राहण्यासाठी लिंबू आणि मिरच्या एक प्रभावी मार्ग मानला जातात. खरं तर, 7 हा आकडा खूप पवित्र मानला जातो. आठवड्यात 7 दिवस असतात, इंद्रधनुष्यात 7 रंग देखील असतात. म्हणूनच, मिरचीची संख्या देखील सात ठेवली जाते जेणेकरून व्यक्तीच्या आयुष्यात नेहमीच सकारात्मकता राहील. असा हा पूर्वपार चालत आलेला विश्वास आहे. जो आजही त्याचपद्धतीने वापरला जातो.
