Chanakya Neeti : कोणावर विश्वास ठेवायचा अन् कोणापासून राहायचं सावधान? चाणक्य यांनी शेकडो वर्ष आधीच सांगून ठेवलंय
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांचे विचार आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात, आयुष्यात कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून सावध राहायचं याबाबत चाणक्य यांनी माहिती दिली आहे.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्या यांनी असे अनेक विचार मांडले आहेत, जे की आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य हे एक कुटनीती तज्ज्ञ देखील होते, त्यामुळे चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती ग्रंथामध्ये या संदर्भानं अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मानवानं आयुष्यात कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर ठेवू नये? याबाबत देखील चाणक्य यांनी मार्गदर्शन केलं आहे.
चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं?
चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हा एखाद्यावर विश्वास ठेवतात तेव्हा तो विश्वास तुम्हाला ताकद देतो, जगण्याची एक नवी उमेद देतो. पण लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवा, मात्र अंधविश्वास ठेवू नका, डोळे झाकून ठेवलेला विश्वास तुम्हाला विनाशाच्या दिशेनं घेऊ जातो. त्यामुळे तुम्हाला प्रचंड नुकसान होऊ शकतं.
दरम्यान चाणक्य यांनी पुढे असं देखील म्हटलं की, कोणावर विश्वास ठेवायचा याची पारख ही नेहमी त्याच्या कामावरून करावी, जर एखादा व्यक्ती तुमच्याशी नेहमी गोड बोलतो मात्र तो जे बोलतो ते करत नाही, तर अशा व्यक्तीवर तुम्ही कधीही विश्वास ठेवता कामा नये. या उलट जर एखादा व्यक्ती हा बोलण्यास थोडासा कठोर असेल मात्र तो जे बोलतो ते करतो त्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकतात.
लक्षात ठेवा जे लोक तुमच्याशी गोड बोलून मैत्री करून तुमचंच नुकसान करतात ते लोक तुमच्या शत्रूंपेक्षाही अधिक भयानक असतात. कारण तुम्हाला हे माहीत असतं की एखादी व्यक्ती तुमचा शत्रू आहे तर तो शंभर टक्के तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे तुम्ही त्याच्यापासून सावध राहतात. मात्र जे मित्र तुमच्याशी गोड बोलून तुमचाच घात करतात, त्यांच्यापासून सावध राहाता येत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
