Osho: स्मशानात मृत्यूचा शोध घेणारा अवलिया, सोन्याच्या ताटात जेवणारा फकीर ते ‘सेक्स गुरू’; ओशो एक फक्कड मसिहा!

'कोई विचार नहीं, कोई बात नहीं, कोई विकल्प नहीं, शांत रहो, अपने आप से जुड़ो...' अत्यंत साध्या सोप्या भाषेत टेन्शनमुक्त जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या आचार्य रजनीश ओशोंकडे एक फक्कड मसिहा म्हणून पाहिले जाते.

Osho: स्मशानात मृत्यूचा शोध घेणारा अवलिया, सोन्याच्या ताटात जेवणारा फकीर ते 'सेक्स गुरू'; ओशो एक फक्कड मसिहा!
osho
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 7:51 AM

मुंबई: ‘कोई विचार नहीं, कोई बात नहीं, कोई विकल्प नहीं, शांत रहो, अपने आप से जुड़ो…’ अत्यंत साध्या सोप्या भाषेत टेन्शनमुक्त जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या आचार्य रजनीश ओशोंकडे एक फक्कड मसिहा म्हणून पाहिले जाते. स्टायलिश राहणारा आचार्य… सोन्याच्या ताटात जेवणारा फकीर… मृत्यूनंतर काय होते याचा शोध घेण्यासाठी वारंवार स्मशानात जाणारा अवलिया… अन् ‘संभोगातून समाधी’कडे जाण्याचा मंत्र दिल्याने ‘सेक्स गुरू’ ठरवला गेलेला दार्शनिक… कधी थोतांड, अंधश्रद्धेवर टीका कर, कधी धर्मगुरुंपासून पोपपर्यंतच्या धर्माच्या ठेकेदारांना खुल्या चर्चेचं आव्हान दे, कधी गांधीपासून ते मार्क्सपर्यंतच्या तत्त्वज्ञानाचा किस पाड, तर कधी ताओ, कन्फ्युशिअस, लाओत्से, बुद्ध, कबीर आणि रविदासांच्या तत्त्वज्ञानातील सौंदर्य दाखव…ओशोंच्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे ते नेहमीच चर्चेत आणि वादग्रस्त राहिले. कोण होता हा फक्कड मसिहा? कसं होतं त्यांचं जगणं? त्यावर टाकलेला हा प्रकाश.

जन्मल्यानंतर तीन दिवस ना रडले, ना दूध प्यायले

ओशो हे आध्यात्मिक गुरू आहेत. महान दार्शनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ओशोंचं पूर्ण नाव रजनीश चंद्रमोहन जैन होतं. 11 डिसेंबर 1931 रोजी मध्यप्रदेशातील कुचवाडा येथे त्यांचा जन्म झाला. ओशोच्या जन्मावेळी एक विचित्र घटना घडली होती. जन्मल्यानंतर तीन दिवस ओशो रडले नव्हते. तीन दिवस ते आईचं दूधही प्यायले नव्हते. त्याचवेळी ओशो हे जगावेगळे असल्याचा अंदाज त्यांच्या कुटुंबीयांना आला होता.

त्यांनी मध्यप्रदेशातील जबलपूर महाविद्यालयातून दर्शनशास्त्राचं शिक्षण घेतलं. 1957मध्ये सागर विद्यापीठातून ते दर्शनशास्त्रात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांना गोल्ड मेडल मिळालं. त्यानंतर ते दर्शनशास्त्रातच एमए झाले. पुढे काही वर्ष त्यांनी जबलपूर विद्यापीठात दर्शनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून अध्यापनाचं काम केलं. विद्यार्थ्यांमध्ये आचार्य रजनीश नावाने ते प्रसिद्ध होते.

पक्षी पिंजऱ्यातून उडाला

संबोधी प्राप्त झाल्याचं सांगत 1966मध्ये त्यांनी प्राध्यापकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आपलं आयुष्य लोकांसाठी समर्पित केलं. ओशो आयुष्यभर खूप फिरले. गावोगावी, देशोदेशी जाऊन प्रवचने दिली. आयुष्यातील 25 टक्के भाग त्यांनी प्रवासावर खर्च केला. भारत भ्रमण केल्यानंतर 1970मध्ये ते मुंबईत आले. मुंबईत देशी-विदेशी भक्तांना त्यांनी प्रवचन देण्यास सुरुवात केली. त्यानंतर हिमाचल प्रदेशातील मनालीत त्यांनी ध्यान शिबिर घेऊन नव सन्यासाची दीक्षा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1974 मध्ये त्यांनी पुण्यात ‘श्री रजनीश आश्रमा’ची स्थापना केली.

घोरवाचक, पदव्याही जाळल्या

ओशोंना पुस्तकं वाचण्याचं प्रचंड वेड होतं. ते घोरवाचक होते. त्यामुळे ते पुस्तके खरेदी करण्यासाठी चोर बाजारात जायचे. दिवसाला तीन पुस्तके ते वाचायचे. त्यांनी संपूर्ण आयुष्यात एक लाखाहून अधिक पुस्तके वाचली होती. त्यांना जर्मनी, मार्क्स आणि भारतीय दर्शनशास्त्रावरील पुस्तके वाचणं अधिक आवडायचं. विशेष म्हणजे जबलपूरच्या महाकौशल कॉलेजात असताना त्यांनी त्यांच्या पदव्या जाळल्या होत्या. पदव्यांवरून ज्ञान ठरत नसतं, असं त्यांचं मत होतं.

स्मशानात भटकंती, मृत्यूचीही वाट पाहिली

ओशो अत्यंत जिज्ञासू होते. केवळ एखादी गोष्ट माहीत करून घेणेच त्यांना आवडत नसे, तर त्या घटनेमागची संपूर्ण हकिकत जाणून घेण्यासाठी ते नेहमी उत्सुक असायचे. 12 वर्षाचे असताना त्यांना मृत्यूचं कुतुहूल वाटलं होतं. त्यामुळे मृत्यूनंतर काय होतं? माणूस नेमका कुठे जातो? हे जाणून घेण्यासाठी ते सतत स्मशानभूमीत जायचे. तिथे गेल्यावर तुम्ही कुठे गेला आहात? असं ते आत्म्यांना विचारायचे. अनेक वर्ष त्यांनी हा प्रकार केला. त्यामुळे ओशोंचे आई-वडिलांना काळजी वाटू लागली. त्यामुळे त्यांनी एका ज्योतिषाला ओशोंचं भविष्य विचारलं. तेव्हा, 14 वं वर्ष सुरू होताच सात दिवसाच्या आत ओशोंचा मृत्यू होणार असल्याची भविष्यवाणी या ज्योतिषाने वर्तवली. 14 व्या वर्षात येताच ओशो स्वत: एका मंदिरात गेले. सात दिवस मंदिरात बसून ते मृत्यूची वाट पाहत होते. मृत्यूनंतर काय होतं हे जाणून घेण्यासाठी ते मंदिरात बसले होते. पण त्यांना मृत्यू काही आला नाही. या सात दिवसात एक साप मंदिरात आला होता. पण या सापानेही त्यांना काही केलं नव्हतं.

‘सेक्स गुरू’ म्हणून हिणवलं

ओशोंनी आचार्य रजनीश नावाने गाणीही लिहिली होती. धार्मिक अंधश्रद्धा, सामाजिक अंधश्रद्धा आणि राजकीय व्यवस्थेच्या ते विरोधात होते. ओशो काहीच लिहीत नव्हते. पण ते प्रवचनं द्यायचे. त्यांनी दिलेली प्रवचने नंतर लेखी स्वरुपात प्रकाशित होत होती. त्यांनी धर्म, राजकारण, मानवता, शिक्षण, समाज, कुटुंब व्यवस्था, स्त्रियांचं शोषण, मार्क्स, गांधी, आंबेडकर, तत्त्वज्ञान, दर्शनशास्त्रापासून ते संभोगावरही प्रवचने दिली होती. त्यांच्या प्रवचनं तर्कशुद्ध असायची. त्यांचा युक्तिवाद भलेभले खोडून काढण्यात असमर्थ ठरायचे. जगभरातील तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला होता. त्यामुळे सर्वच धर्मसत्ता हादरून गेल्या होत्या. ओशोंनी संभोगावर प्रवचन दिलं. संभोगातून समाधीकडे हे त्यांचं पुस्तक सर्वाधिक वादग्रस्त ठरलं. त्यानंतर त्यांच्या बद्दल वावड्या उठवल्या गेल्या. इतकच नव्हे तर त्यांना ‘सेक्स गुरू’ म्हणूनही संबोधलं जाऊ लागलं.

स्टारडम सोडून विनोद खन्ना ओशो चरणी

देशविदेशातील लोक ओशोंचे अनुयायी होते. त्यात डॉक्टर, इंजीनियरपासून ते संगीतकार, गीतकार आणि चित्रकारही होते. बॉलिवूडचे अभिनेते विनोद खन्नाही ओशोंचे शिष्य होते. 70-80 च्या दशकात विनोद खन्ना बॉलिवूडमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर होते. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच विनोद खन्ना यांनी अचानक संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संपत्ती, घरदार या सर्वांचा त्याग करून संन्यास घेतला आणि अमेरिकेत असलेल्या ओशोंचं शिष्यत्व पत्करलं. या आश्रमात ते वृक्षांची देखभाल करायचे. बराच काळ ते ओशोंच्यासोबत होते. इतकं की मीडियात त्यांच्या बातम्या यायच्या बंद झाल्या होत्या. बॉलिवूडही त्यांना विसरत आले होते. नंतर 1985मध्ये त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली. आता विनोद खन्ना पुन्हा बॉलिवूडमध्ये येणार नाही असं वाटत असतानाच पाच वर्षानंतर ते पुन्हा आले. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर त्यांनी इन्साफ नावाच सिनेमा केला. पुढे अनेक हिट सिनेमे दिले आणि राजकारणातही पाऊल ठेवले होते.

अन् अमेरिकन सरकार हादरले

1980मध्ये त्यांच्या परदेशातील संन्यासींनी अमेरिकेतील ओरेगनमध्ये 64 हजार एकर पडिक जमीन खरेदी करून त्यावर ‘रजनीशपूरम’ची स्थापना केली. या संन्यासींनीनी ओशोंना इथे येऊन राहण्याचं आमंत्रणही दिलं. ओशोंचा हा कम्यून सॅन फ्रान्सिस्कोपेक्षा तिप्पट मोठा होता. या ‘रजनीशपूरम’चं वैशिष्ट्ये म्हणजे त्याकाळी या कम्यूनकडे स्वत:चं खासगी विमान होतं. त्यांचं स्वतंत्र विमानतळ होतं. तसेच त्या काळातील सर्वात महागड्या रोल रॉयस कारचा ताफा होता. अमेरिकेत ओशोंची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. त्यांचा अनुयायी वर्ग तरुण युवक होता. हे तरुण ओशोंना समर्पित होते. त्यामुळे अमेरिकन सरकार घाबरले होते. त्यांनी ओशोंच्या आश्रमावर कारवाईस सुरुवात केली. संन्यासींना व्हिसा नाकारला जाऊ लागला. आश्रमाबाबत अफवा उडवल्या गेल्या. त्यानंतर ओशोंवर आरोप ठेवून त्यांना अटक करण्यात आली. 12 दिवस त्यांना अज्ञातवासात ठेवलं गेलं.

21 देशांनी प्रवेश नाकारला

त्यानंतर 14 नोव्हेंबर 1985 रोजी ओशोंनी अमेरिका सोडली. त्यांनी जगातील 21 देशांमध्ये जाऊन राहण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक देशांनी त्यांना प्रवेश नाकारला. त्यामुळे अखेर ते भारतात परतले. 1987मध्ये पुण्यातील आश्रमात येऊन त्यांनी वास्तव्य केलं. याच ठिकाणी त्यांनी प्रवचनं देण्यास सुरुवात केली.

थेलियम देऊन मारलं?

ओशोंच्या मृत्यूबाबतचंही गूढ आहे. अचानक त्यांची तब्येत बिघडली अन् त्यांचं शरीर कमजोर झालं होतं. 1985मध्ये त्यांना अमेरिकेच्या तुरुंगात ठेवलं होतं. त्यावेळी त्यांना थेलियम नावाचं स्लो पॉयझन दिलं गेलं होतं. त्यांना प्राणघातक रेडिएशनमधूनही जावं लागलं होतं, तेच त्यांच्या मृत्यूचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. 1989मध्ये ओशो अचानक मौनात गेले. शरीर थकल्याने ते अशक्त झाले होते. त्यामुळे त्यांनी प्रचन देणं बंद केलं होतं. केवळ रात्री थोडावेळ संन्यासींसोबत काही वेळ मौनात बसायचे. या रात्रीच्या सत्संगाला त्यांनी “ओशो व्हाईट रॉब ब्रदरहुड” असं नाव दिलं.

16 जानेवारी 1990 पर्यंत त्यांनी रात्रीच्या सत्संगात भाग घेतला. 17 जानेवारीला नेहमीप्रमाणे ते सत्संगात आले. पण क्षणभरही थांबले नाहीत. नमस्कार केला आणि निघून गेले. त्यामुळे त्यांच्या अनुयायांच्या काळजात धस्स झालं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 18 जानेवारी 1990ला त्यांचे डॉक्टर स्वामी प्रेम अमृतो यांनी ओशोंच्या शरीरात प्रचंड वेदना होत असल्याचं सांगितलं. त्यामुळे ओशो आपल्यात येऊ शकणार नाहीत. पण 7 वाजता आपल्या सोबत ते ध्यानाला बसतील असं त्यांनी सांगितलं. ओशोंना वेदना असह्य होत होत्या. त्यामुळे त्यांनी पुण्याती आश्रमात 19 जानेवारी 1990 रोजी शरीर सोडलं. ओशोंचं निर्वाण झालं. एका महान आत्म्याची प्राणज्योत मालवली. मात्र, ओशो अस्तित्वात विलीन झाल्याची घोषणा संध्याकाळी करण्यात आली.

माझा मृत्यू एक महोत्सव म्हणून साजरा करा

जेव्हा मी निर्वाणाला जाईल तेव्ही कुणीही शोक करायचा नाही. रडायचं नाही. माझा मृत्यू एक महोत्सव म्हणून साजरा करा, अशी शेवटची इच्छा ओशोंनी बोलून दाखवली होती. त्यानुसारच त्यांना अंतिम निरोप दिला गेला. त्यांचं पार्थिव बुद्ध ऑडिटोरियममध्ये दहा मिनिटासाठी ठेवलं गेलं. त्याच्या दहा हजार अनुयायांनी संगीताच्या तालावर नृत्य करत, काहींनी ध्यान साधना करत तर काहींनी मौन राहून आपल्या लाडक्या ओशोंना अखेरचा निरोप दिला.

ओशोंबाबत ऐकावं ते नवलच

ओशोंना बूट वापरणं आवडत नसायचं. ते नेहमी चप्पल वापरायचे.

ओशो डावखुरे होते. ते डाव्या हाताने लिहायचे.

फोटो काढणे आणि सुंदर पेन गोळा करण्याची त्यांना आवड होती.

जेवणासाठी सोने आणि चांदीचे भांडे ते वापरायचे.

त्यांना माती आणि धुळीची अॅलर्जी होती. दुर्गंधी युक्त जागेत त्यांना झोप लागत नसे.

मला 365 रोल्स रॉयल कार खरेदी करायच्या आहेत, असं ते एका मुलाखतीत म्हणाले होतं. विशेष म्हणजे त्यांच्याकडे दहा-बारा नव्हे तर 90 रोल्स रॉयल कार होत्या.

ऐशोआरामात जगायला त्यांना आवडायचं. लहान असताना हत्तीवर बसून शाळेत जाण्याचा हट्ट त्यांनी धरला होता. त्यानुसार त्यांच्या वडिलांनी हत्ती आणून त्यांना हत्तीवर बसवून शाळेत नेऊन सोडले होते.

ओशोंच्या वडिलांकडे 1400 एकर जमीन होती.

ओशोंनी त्यांच्या वडिलांनाही संन्यास दिला होता. संन्यास घेतल्यानंतर त्यांच्या वडील ओशोंच्या पायावर पडून रडू लागले होते.

संबंधित बातम्या:

Secrets of Ravana | उत्तम राजकरणी, शिव भक्त लंकापती रावणाशी संबंधित कधीही समोर न आलेल्या रंजक गोष्टी

Vastu | सावधान ! हातातून या गोष्टी पडणे म्हणजे संकटांना आमंत्रण, एकदा नजर माराच कोणत्या आहेत त्या गोष्टी

Vastu tips for Sleep | पैशांची कमतरता भासतेय ? , झोपेसंबंधी वास्तु नियम नक्की लक्षात ठेवा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.