मृतदेह, चिता अन् 94 अंकाचं रहस्य, राखेवर हा अंक नेमही का काढला जातो?
काशीमध्ये एखाद्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले की उरलेल्या राखेवर 94 हा अंक आवश्य काढला जातो. यामागचे नेमके कारण अनेकांना माहिती नाही. मणिकर्णिका घाटावर तर हे दृश्य अनेकवेळा पाहायला मिळते.

Manikarnika Ghat : काशी नगरीला भगवान महादेवाची नगरी म्हणून ओळखलं जातं. या शहरात मोक्ष मिळतो, असे म्हटले जाते. या शहरात जीवन आणि मृत्यूच्या संगामाची साक्ष म्हणून गेल्या कित्येक दशकांपासून मणिकर्णिका घाट अस्तित्त्वात आहे. याच मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्काराच्या काही प्रथा आणि परंपरा आहेत. मृत्यूनंतर व्यक्तीला मोक्ष मिळावा म्हणून याच घाटावर रोज शेकडो प्रेतं जळत असलेली दिसतात. याच घाटावर एक आगळीवेगळी अशी एक परंपरा आहे. व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर उरलेलेल्या राखेवर 94 हा अंक लिहिला जातो. हा अंक लिहण्याचे नेमके कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. 94 अंक आणि मणिकर्णिका घाटावरील प्रथा याविषयी जाणून घेऊ या..
मानवाचे एकूण 100 कर्म, त्यातील…
मणिकर्णिका घाट मोक्षाचं प्रवेशद्वार आहे, असे म्हटले जाते. याच घाटावर एक प्रथा आहे. अंत्यसंस्कारानंतर उरलेल्या राखेवर तिथे नेहमी 94 हा अंक लिहिला जातो. ही परंपरा आजही अनेक लोकांसाठी रहस्य आहे. व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर मुखाग्नी देणारी किंवा तेथील एखादी व्यक्ती हाताच्या बोटाने किंवा लाकडाने राखेवर 94 हा अंक लिहिते. त्यानंतर अस्थिविसर्जन केलं जातं. स्थानिक मान्यतनेनुसार मानवाचे एकूण 100 कर्म असतात. त्याचे 94 कर्म हे स्वत:चे असतात. म्हणजेच 94 कर्मांना तो माणूस स्वत: जबाबदार असतो. उर्वरित जीवन, मृत्यू, यश, अपयश, लाभ, हानी 6 कर्म व्यक्तीच्या हातात नसून त्यावर ईश्वराचे नियंत्रण असते असे बोलले जाते.
म्हणून अंत्यसंस्कारानंतर काढला जातो 94 अंक
म्हणूनच अंत्यसंस्कार झाल्यानंतर उरलेल्या राखेवर 94 हा अंक लिहिला जातो. व्यक्तीच्या मृत्यूनंतर चितेवर त्याने केलेल्या 94 कर्मांचेही दहन केले जाते. या प्रकियेकडे मोक्ष म्हणून पाहिले जाते. व्यक्तीचे उरलेले 6 कर्म देवाच्या इच्छेवर सोडली जातात, असाही त्यातून अर्थ काढला जातो. दरम्यान, मणकर्णिका गाटावर चितेच्या राखेवर 94 हा अंक लिहिण्यामागे कोणत्याही शास्त्रीय कारणाचा उल्लेख नाही. ही परंपरा तेथील स्थानिक लोकांनी चालू केलेली आहे.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.
