AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs IRE: आयर्लंडविरुद्ध पराभवामागे कोण जबाबदार? अर्धशतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माने सांगितली भलतीच कारण

भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना रंगला आणि हा सामना आयर्लंडने जिंकला. हा सामन्यातील पराभवामागे कोण जबाबदार आहे आता यावर अभिषेक शर्माने स्पष्टच सांगितले आहे.

IND vs IRE: आयर्लंडविरुद्ध पराभवामागे कोण जबाबदार? अर्धशतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माने सांगितली भलतीच कारण
abhishek sharma
| Updated on: Jun 27, 2026 | 12:39 PM
Share

बेलफास्ट येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. अभिषेक शर्मा वगळता, कोणताही भारतीय फलंदाज लक्षणीय खेळी करू शकला नाही. भारताच्या पराभवासाठी विविध कारणे दिली जात आहेत. काही जण फलंदाजांना दोष देत आहेत, तर काही जण गोलंदाजांना. आयर्लंडने प्रथमच भारतीय संघाला पराभव करुन इतिहास रचला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच मैदानात उतरला होता आणि पण त्यांना सामना जिंकता आला नाही. मात्र, टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्माने या पराभवासाठी आयर्लंडमधील कोणत्या गोष्टीला जबाबादार धरले ते पाहा…

बेलफास्ट येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अभिषेक शर्मा म्हणाला, “आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही हवामान आणि खेळपट्टीच्या परिस्थितीशी किती लवकर जुळवून घेतो. जेव्हा सामने एकापाठोपाठ एक होत असतात, तेव्हा संपूर्ण संघाला त्वरीत समन्वय साधावा लागतो. सराव सत्र असो वा सामना, आम्हाला परिस्थिती त्वरीत समजून घेणे आवश्यक असते. आज आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करत होतो, पण दुर्दैवाने ते जमले नाही.”

भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड संघाने भारतासमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने 20 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या, परंतु त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ न मिळाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अखेरीस, भारतीय संघ 20 षटके फलंदाजी करू शकला नाही आणि 148 धावांवर सर्वबाद झाला. आता भारतीय संघ दुसऱ्या टी-20 सामन्यात पुनरागमन करू शकतो का, हे पाहणे बाकी आहे.

भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना 28 जून रोजी खेळला जाईल. भारतीय संघ मालिका पराभव टाळण्याच्या उद्देशाने या सामन्यात उतरेल. ही मालिका केवळ दोन सामन्यांची असल्याने, भारतीय संघ आता मालिका जिंकू शकत नाही. पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघावर मालिका गमावण्याचा मोठा धोका आहे. अशा परिस्थितीत, भारतीय संघ दुसऱ्या टी-20 मध्ये जोरदार पुनरागमन करून कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवू इच्छितो.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...