PAK vs SL : पाकिस्तानात बॉम्बस्फोट, श्रीलंकन बोर्डाला खेळाडू प्यारे की पैसा? अखेर मनातलं बाहेर आलं, सत्य जगाला कळलं
PAK vs SL : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये मंगळवारी 11 नोव्हेंबरला कोर्टाबाहेर बॉम्बस्फोट झाले. या स्फोटाने श्रीलंकन टीम हादरुन गेली आहे. या घटनेनंतर श्रीलंकेचे 8 ते 10 खेळाडू सीरीज अर्ध्यावर सोडून पाकिस्तान सोडणार असल्याच्या बातम्या आल्या.

इस्लामाबादमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्याचा पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या वनडे सीरीजवर परिणाम झाला आहे. पाकिस्तानच्या राजधानीत झालेल्या कार स्फोटाने श्रीलंकन क्रिकेट टीमच्या मनात दहशत निर्माण झाली. त्यामुळे अनेक श्रीलंकन खेळाडूंनी पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय बदलावा यासाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्ड खेळाडूंवर कारवाई करण्याची धमकी देत आहे. त्याचा परिणाम पूर्ण सीरीजच्या शेड्युलवर होणार आहे. या परिस्थितीमुळे बॅकफुटवर आलेल्या पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने सीरीजचे उर्वरित दोन सामने एक-एक दिवसाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये मंगळवारी 11 नोव्हेंबरला कोर्टाबाहेर बॉम्बस्फोट झाले. या स्फोटाने श्रीलंकन टीम हादरुन गेली आहे. या घटनेनंतर श्रीलंकेचे 8 ते 10 खेळाडू सीरीज अर्ध्यावर सोडून पाकिस्तान सोडणार असल्याच्या बातम्या आल्या. श्रीलंकन खेळाडूच्या या पावलाने पाकिस्तानी बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. ते श्रीलंकन टीमची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे.
दीर्घ चर्चेनंतर सीरीजच्या कार्यक्रमात बदल करण्याचा निर्णय
गुरुवारी 13 नोव्हेंबरला वनडे सीरीजचा दुसरा सामना होणार आहे. श्रीलंकन खेळाडूंच्या निर्णयामुळे हा सामना आणि सीरीज संकटात आहे. PCB चे बॉस नकवी यांनी बुधवारी 12 नोव्हेंबरच्या रात्री दीर्घ चर्चेनंतर सीरीजच्या कार्यक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला. नव्या कार्यक्रमानुसार 13 आणि 15 नोव्हेंबरला होणारे वनडे सीरीजचे उर्वरित सामने आता शुक्रवारी 14 नोव्हेंबर आणि रविवारी 16 नोव्हेंबरला होऊ शकतात.
SLC ने आपल्या आदेशात काय म्हटलय?
हे सामने होणार की नाही या बद्दल अजूनही स्पष्टता नाहीय. कारण श्रीलंकन खेळाडूंनी उपलब्ध राहणं महत्वाचं आहे. हा दौरा पूर्ण करण्यासाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाकडून आपल्या खेळाडूंवर दबाव आणला जातोय. बोर्डाकडून धमकीच्या शब्दात आदेश देण्यात आला आहे. सीरीज अर्ध्यावर सोडू नका असं श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने म्हटलय. त्यांना आपल्या खेळाडूंच्या आयुष्याची चिंता नाहीय. कुठला खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ दौऱ्याच्या अर्ध्यावरुन परतला तर SLC कडून कारवाई करण्याची धमकी देण्यात आली आहे.
