Arjun Tendulkar- Sania Chandok : सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेबाबत या 7 गोष्टी माहीत आहेत का? सानियाचे इन्स्टावर फॉलोअर्स किती?
Who is Saaniya Chandok : क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या, सर्वांचा लाडका क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच शहनाईचे सूर वाजणार आहेत. कारण त्याचा मुलगा अर्जुन यांचा नुकताच सानिया चंडोकशी साखरपुडा झाला. प्रसिद्ध उद्योगपतींची नात असलेल्या सानियाबद्दल तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत का ?

सर्वांचा लाडका क्रिकेटर, महान फलंदाज सचिन तेंडुलकर नेहमी चर्चेत असतोच. फक्त भारतात नव्हे तर जगभरात त्याचे कोट्यावधी चाहते असून त्याची मुलं सारा आणि अर्जुनची चर्चेत असतात, मात्र सध्या अर्जुन तेंडुलकरची खूप चर्चा सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे नतो लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊस टाकून क्रिकेटमध्येच करिअर करणारा युवा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याचा नुकताच सानिया चंडोक हिच्याशी साखरपुडा झाला. मुंबईतील अतिशय प्रतिष्ठित उद्योगपती रवी घई यांची नात असलेली सानिया हिचीही सगळीकडे चर्चा सुरू आहे. अर्जुन-सानियाचा नुकताच साखरपुडा झाला, ज्याला दोन्ही कुटुंबातील व्यक्ती आणि अगदी जवलचे लोक, काही खास पाहुणेच या सोहळ्यात उपस्थित होते.
सचिनच्या होणाऱ्या सूनबाईंबद्दल या खास गोष्टी मााहीत आहेत का ?
अर्जुन आणि सानियाचा 12 ऑगस्ट रोजी साखरपुडा झाला. ही बातमी आणि त्यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर, लोकांना जाणून घ्यायचे आहे की सानिया चांडोक कोण आहे? तिचे कुटुंब कोण आहे, ती किती शिक्षित आहे, ती आता काय करते इत्यादी. तिच्याबद्दलच्या या 7 खास गोष्टी आहेत.
– सानिया चांडोक ही घई कुटुंबातील आहे, जे मुंबईतील एक मोठे व्यावसायिक कुटुंब आहे.
– सानिया चांडोक ही प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात आहे.
– रवी घई हे इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी (कमी कॅलरीज असलेले आईस्क्रीम ब्रँड) चे मालक आहेत.
– अर्जुन तेंडुलकरची मंगेतर सानिया ही मुंबईस्थित मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपीची संचालक आहे.
– सानिया चांडोक इंस्टाग्रामवर अतिशय कमी सक्रिय आहे, तिचे 804 फॉलोअर्स आहेत, आणि तिचे अकाउंट प्रायव्हेट आहे.
– सानिया आणि अर्जुन तेंडुलकर हे बालपणीचे मित्र आहेत. तिने कॅथेड्रल आणि जॉन कॅनन स्कूलमधून शिक्षण घेतले आहे.
– सानिया चांडोकने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी प्राप्त केली आहे. तिने 2020 मध्ये पदवी प्राप्त केली, त्यानंतर ती भारतात परतली.
अर्जुनची होणारी बायको सोशल मीडियावर कमी ॲक्टिव्ह
क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि त्याची लेक सारा हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतात, जरवेळेस ते चाहत्यांसाठी काही ना काही पोस्ट शेअर करत असतात. मात्र सचिनचा मुलगा अर्जुन आणि त्याची होणारी सून सानिया हे दोघे मात्र इन्स्टाग्रामवर फारसे ॲक्टिव्ह दिसत नाहीत.
अर्जुनच्या इन्स्टाग्रामवर त्याचे बरेच फॉलोअर आहेत, मात्र तेथे त्याने आत्तापर्यंत फक्त 55 पोस्टस टाकल्या आहेत. तर त्याची भावी वधू सानिया हिला अर्जुन आणि सारा तेंडुलकर दोघेही इन्स्टाग्रावर फॉलो करतात. मात्र तिचं इन्स्टा अकाऊंट प्रायव्हेट आहे. तिचे एकूण 804 फॉलोअर्स असून तिने तिच्या अकाऊंटवर केवळ 26 पोस्ट केल्या आहेत.
🚨 Saaniya Chandhok, Arjun Tendulkar’s life partner is an 𝗲𝗻𝘁𝗿𝗲𝗽𝗿𝗲𝗻𝗲𝘂𝗿 and the founder of 𝗠𝗿. 𝗣𝗮𝘄𝘀 𝗣𝗲𝘁 𝗦𝗽𝗮 & 𝗦𝘁𝗼𝗿𝗲 𝗟𝗟𝗣, a Mumbai-based premium 𝗽𝗲𝘁 𝗴𝗿𝗼𝗼𝗺𝗶𝗻𝗴 and 𝗿𝗲𝘁𝗮𝗶𝗹 𝗯𝗿𝗮𝗻𝗱. She is also a certified Veterinary Technician. pic.twitter.com/vPLfT2Nkk9
— Indian Cricket & Venues (@INDCricketGuide) August 14, 2025
अर्जुन तेंडुलकरचं क्रिकेट करिअर
अर्जुन तेंडुलकर पुढील महिन्यात (24 सप्टेंबर) त्याचा 26 वा वाढदिवस साजरा करणार आहे, तो सध्या 25 वर्षांचा आहे. तो गोलंदाज असून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. त्याने 2023 साली एमआयसाठी 4 सामने आणि 2024 मध्ये 1 सामना खेळला, ज्यामध्ये त्याच्या नावावर एकूण 3 विकेट आहेत.
अर्जुन तेंडुलकरने 17 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 37 विकेट्स घेतल्या आहेत, त्याशिवाय त्याने 18 लिस्ट ए सामन्यांमध्ये 25 विकेट्स आणि 24 टी20 सामन्यांमध्ये 27 विकेट्स घेतल्या आहेत.
