अर्जुन तेंडुलकरची अष्टपैलू कामगिरी, एकाच ओव्हरमध्ये 5 षटकारांसह अर्धशतक, गोलंदाजीतही कमाल

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने 73 व्या Police Invitation Shield Cricket Tournament मध्ये अष्टपैलू कामगिरी केली आहे.

अर्जुन तेंडुलकरची अष्टपैलू कामगिरी, एकाच ओव्हरमध्ये 5 षटकारांसह अर्धशतक, गोलंदाजीतही कमाल
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 11:00 PM

मुंबई : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने 14 फेब्रुवारीला 73 व्या Police Invitation Shield Cricket Tournament मध्ये त्याचा जलवा दाखवला. त्याने ग्रुप ए च्या दुसऱ्या सामन्यात 31 चेंडूत नाबाद 77 धावांची धडाकेबाज खेळी केली. तसेच गोलंदाजीत 41 धावा देत 3 विकेट्सही मिळवल्या. अर्जुनच्या या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एमआयजी क्लबने इस्लाम जिमखाना संघावर 194 धावांनी विजय मिळवला. ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आयोजित केली होती. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार 21 वर्षीय अर्जुन तेंडुलकरने त्याच्या धडाकेबाज खेळीत 5 चौकार आणि 8 षटकार ठोकले. तसेच अर्जुनने फिरकीपटू हाशिर दाफेदारच्या एकाच षटकात पाच षटकार ठोकले. (Arjun Tendulkar shines with bat and ball in police shield)

अर्जुनच्या शानदार फलंदाजीसह सलामीवीर केविन डीएलमेडा (96) आणि चौथ्या क्रमांकावरील फलंदाज प्रगनेश खांडिलेवार (112) या दोघांनी एमआयजी संघाला शानदार विजय मिळवून दिला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या एमआयजी संघाने 45 षटकांमध्ये 7 बाद 385 धावांपर्यंत मजल मारली होती. त्याच्या प्रत्युत्तरात इस्लाम जिमखाना संघाला 41.5 षटकांमध्ये केवळ 191 धावा करता आल्या. एमआयजीकडून अंकुश जयसवाल याने 31 धावा देत 3 श्रेयस गुरवने 34 धावा देत 3 आणि अर्जुनने 41 धावा देत 3 बळी घेतले.

मुंबईच्या सीनियर टीममधून डेब्यू

दरम्यान, अर्जुनने नुकताच मुंबईच्या सीनियर टीममधून (वरीष्ठ संघाकडून) त्याचा टी-20 डेब्यू केला आहे. अर्जुनला सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy) हरियाणाविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली होती. याआधी तो 2018 मध्ये भारताच्या 19 वर्षाखालील संघाचा भाग होता. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये संधी मिळावी, यासाठी अर्जुन प्रयत्न करत राहिला. 21 वर्षीय अर्जुन तेंडुलकर अष्टपैलू खेळाडू आहे. तो डावखुरा जलदगती गोलंदाज आणि फलंदाज आहे. यापूर्वी तो इंग्ल्डंमध्ये क्लब क्रिकेट खेळला आहे. दरम्यान, मुंबईच्या संघासाठी डेब्यू करणाऱ्या अर्जुनला यंदाच्या आयपीएलमध्ये संधी मिळणार आहे.

अर्जुन तेंडुलकर आयपीएलसाठी उपलब्ध

अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएल (IPL 2021) लिलावासाठी उपलब्ध असणार आहे. अर्जुन तेंडुलकरची बेस प्राइस 20 लाख रुपये इतकी असणार आहे. 18 फेब्रुवारीला यंदाच्या आयपीएलसाठी लिलाव (IPL Auction 2021) होणार आहे. यात अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली जाईल.

18 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव

आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा 18 फेब्रुवारीला होणार आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. त्यातच आता अर्जुन तेंडुलकर या लिलावासाठी उपलब्ध होणार असल्याने अर्जुनला आपल्या ताफ्यात सामील करुन घेण्यासाठी अनेक संघांमध्ये स्पर्धा पाहायला मिळेल.

डेब्यू सामन्यात अर्जुनला चमकदार कामगिरी करता आली नाही

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबई विरुद्ध हरियाणा सामन्यात अर्जुनने डेब्यू केला होता. या सामन्यात हरियाणाने मुंबईवर 8 विकेट्सने शानदार विजय (Mumbai vs Haryana) मिळवला. अर्जुनकडून या सामन्यात चमकदार कामगिरीची अपेक्षा होती. मात्र त्यानेही निराशा केली. प्रथम बॅटिंग करताना अर्जुन डायमंड डक ( diamond duck) झाला. म्हणजेच एकही चेंडू न खेळता तो रनआऊट झाला. गोलंदाजी करताना त्याने 1 विकेट घेतली. पण त्याने 3 ओव्हर्समध्ये 11 पेक्षा अधिकच्या इकोनॉमी रेटने 34 धावा लुटवल्या. तसेच एक कॅचही त्याने सोडला.

जुळून आला योगायोग

टी-20 क्रिकेटमध्ये अर्जुनने हरयाणाविरोधात पदार्पण केलं. यासह एक भन्नाट योगायोग जुळून आला आहे. अर्जुन तेंडुलकरचा पिता आणि दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने डोमेस्टेक क्रिकेटमधील अखेरचा सामना हा हरयाणाविरोधात खेळला होता. तर आता 8 वर्षानंतर अर्जुनने हरयाणाविरोधात पदार्पण केले आहे. यामुळे पिता पुत्रांचा 8 वर्षानंतर हरयाणाविरोधातील योगायोग जुळून आला आहे.

हेही वाचा

Mumbai vs Haryana | अर्जुन तेंडुलकर शून्यावर बाद, गोलंदाजीही चोपली, 3 ओव्हरमध्ये धावांचा पाऊस

अर्जून तेंडुलकर मुंबईच्या संघात, पण निवडीवर का वाद?

Vijay Hazare Trophy साठी मुंबईकडून अर्जुन तेंडुलकरसह एकूण 103 खेळाडूंची निवड

(Arjun Tendulkar shines with bat and ball in police shield)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.