AUS vs IND : ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने विजय, टीम इंडियाचा मेलबर्नमध्ये दुसरा पराभव
Australia vs India 2nd T20I Match Result : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर मात करत मालिकेत विजयी सुरुवात केली. भारताचा हा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमधील तिसरा टी 20I पराभव ठरला.

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली आहे. ऑस्ट्रेलियाने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये टीम इंडियावर 4 विकेट्सने मात करत या मालिकेतील पहिला विजय मिळवला आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर दुसऱ्या सामन्यात 125 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 13.2 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. उभयसंघातील पहिला सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे 4 सामन्यांतून मालिकेचा निकाल लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाने विजयी धावा सहज पूर्ण केल्या. मात्र भारतीय बॉलिंगची धार पाहता फलंदाजांनी आणखी 30-40 केल्या असत्या तर या सामन्याचा निकाला वेगळा लागला असता. भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगली सुरुवात करता आली नाही. मात्र अखेरच्या काही षटकात भारताने ऑस्ट्रेलियाला झटपट 3 झटके दिले. त्यामुळे थोड्या धावा असत्या तर भारताने हा सामना जिंकलाही असता. मात्र तसं होऊ शकलं नाही.
कॅप्टन मार्शची महत्त्वपूर्ण खेळी
ऑस्ट्रेलियाच्या विजयात कॅप्टन मिचेल मार्श याने प्रमुख भूमिका बजावली. तर ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस आणि मिचेल ओवन यांनीही योगदान दिलं. मार्शने सर्वाधिक धावा केल्या. मार्शने 26 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 2 फोरसह46 रन्स केल्या. हेडने 28 धावा जोडल्या. जोश इंग्लिस याने 20 रन्स केल्या. तर मिचेल ओवन याने 14 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.
टीम इंडियाची घसरगुंडी
त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि भारताला बॅटिंगसाठी बोलावलं. भारताने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. ओपनर अभिषेक शर्मा आणि लोअर ऑर्डरमधील हर्षित राणा या दोघांचा अपवाद वगळता भारताच्या एकूण 9 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यापैकी तिघांना भोपळाही फोडता आला नाही.
अभिषेक-हर्षितची निर्णायक खेळी
अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा या दोघांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 47 बॉलमध्ये 57 रन्सची पार्टनरशीप केली. अभिषेकने भारतासाठी 68 रन्स केल्या. तर हर्षितने 35 धावांची खेळी केली. तर ऑस्ट्रेलियासाठी जोश हेझलवूड याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.
तिसरा सामना केव्हा?
दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा टी 20i सामना हा रविवारी 2 नोव्हेंबरला होणार आहे. हा सामना होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल येथे होणार आहे.
