AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aus vs Ind 3rd Test | ‘दस का दम’, डेव्हिड वॉर्नरला बाद करत अश्विनची विक्रमी कामगिरी

अशी कामगिरी करणारा अश्विन हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

Aus vs Ind 3rd Test | 'दस का दम', डेव्हिड वॉर्नरला बाद करत अश्विनची विक्रमी कामगिरी
अश्विनने डेव्हिड वॉर्नरला दुसऱ्या डावात 13 धावांवर आऊट केलं.
| Updated on: Jan 09, 2021 | 2:05 PM
Share

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया  (Aus vs Ind 3rd Test)  यांच्यात सिडनीत तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसावर कांगारुंचं वर्चस्व राहिलं. कांगारुंनी दिवसखेर एकूण 2 विकेट्स गमावून 103 धावा केल्या. कांगारुंनी विल पुकोव्हसकी आणि डेव्हिड वॉर्नर या दोन सलामीवीरांचे विकेट्स गमावले. पुकोव्हस्कीला मोहम्मद सिराजने आऊट केलं. तर फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) डेव्हिड वॉर्नरला (David Warner) एलबीडबल्यू आऊट केलं. वॉर्नरला आऊट करत अश्विनने विक्रमी कामगिरी केली आहे. (aus vs ind 3rd test r ashwin gets david warner out for the 10th time in Test cricket)

काय आहे विक्रम?

अश्विनने वॉर्नरला कसोटी सामन्यात बाद करण्याची ही 10 वेळ ठरली आहे. अश्विन वॉर्नरला कसोटीमध्ये सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. तसेच अश्विनने आतापर्यंत वॉर्नरला तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून एकूण 12 वेळा आऊट केलं आहे. अश्विनने वॉर्नर व्यतिरिक्त इंग्लडंच्या एलिस्टर कुकला 9 तर बेन स्टोक्सला 7 वेळा आऊट केलं आहे.

अश्विन चौथ्या क्रमांकावर

अश्विनने गेल्या दशकभरात (2011-2020) आपल्या फिरकीने अनेक फलंदाजांना गुंडाळलं आहे. अश्विन दशकभरात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. अश्विनने (2011-2020) या वर्षांमध्ये कसोटी सामन्यात एकूण 375 विकेट्स घेतल्या आहेत.

सामन्याचा धावता आढावा

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी तिसऱ्या दिवसाच्या सुरुवात चांगली केली. गोलंदाजांनी टीम इंडियाचा पहिला डाव 244 धावांवर गुंडाळला. यामुळे ऑस्ट्रेलियाला 94 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली.

यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया फलंदाजासाठी आली. ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात राहिली नाही. ऑस्ट्रेलियाने पहिले 2 विकेट्स लवकर गमावल्या. यामुळे 35-2 अशी स्थिती झाली. पण यानंतर मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात तिसऱ्या दिवसखेर नाबाद 68 धावांची भागीदारी झाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाची 2 बाद 103 अशी धावसंख्या होती. तसेच लाबुशेन 47 तर स्टीव्ह स्मिथ 29 धावांवर नॉट आऊट आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाकडे 197 धावांची आघाडी आहे. यामुळे चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर कांगारुंना रोखण्याचे आव्हान असणार आहे.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 3rd Test | टीम इंडियासाठी वाईट बातमी, रिषभ पंत दुखापतग्रस्त

Australia vs India, 3rd Test | पंत पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूला दुखापत

Ravichandran Ashwin | अश्विनच्या फिरकीवर भल्याभल्यांची गिरकी, मुरलीधरनचा विक्रम मोडला

(aus vs ind 3rd test r ashwin gets david warner out for the 10th time in Test cricket)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.